Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ह्युंदाईने दिल्लीत उघडले 120 kW चार्जिंग स्टेशन; ईव्ही मालकांना मिळणार खास ऑफर

दिल्लीत ह्युंदाईच्या ईव्ही ग्राहकांसाठी चार्जिंग आता आणखी सोपे होणार आहे. कंपनीने 120 kW फास्ट चार्जर सुरू केले असून 3 दिवस मोफत चार्जिंगची ऑफर जाहीर केली आहे. 2030 पर्यंत 600 चार्जिंग स्टेशन उभारण्याचे ह्युंदाईचे मोठे लक्ष्य आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Sep 10, 2026 | 09:45 AM
ह्युंदाईने दिल्लीत उघडले 120 kW चार्जिंग स्टेशन; ईव्ही मालकांना मिळणार खास ऑफर
Follow Us
Follow Us:
  • ह्युंदाईने दिल्लीत स्टॅटिकच्या भागीदारीत 120 kW क्षमतेचे नवीन DC फास्ट चार्जिंग स्टेशन सुरू केले आहेत.
  • 9 ते 11 सप्टेंबरदरम्यान ह्युंदाईच्या ईव्ही ग्राहकांना कंपनीच्या सार्वजनिक स्टेशनवर मोफत चार्जिंग मिळणार आहे.
  • 2030 पर्यंत ह्युंदाईचे चार्जिंग नेटवर्क देशभरातील 600 स्टेशनपर्यंत विस्तारण्याचे कंपनीचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य आहे.
इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग नेटवर्क मजबूत करण्याच्या दिशेने ह्युंदाई मोटर इंडियाने आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. कंपनीने दिल्लीमध्ये 120 kW क्षमतेचे नवीन DC फास्ट चार्जिंग स्टेशन सुरू केले आहेत. हे चार्जर चार्जिंग नेटवर्क कंपनी स्टॅटिकसोबतच्या भागीदारीत विकसित करण्यात आले असून, त्यांचा वापर करण्यासाठी मायह्युंदाई अॅपची सुविधा उपलब्ध आहे.

ह्युंदाई सध्या देशातील 105 शहरांमध्ये 185 DC फास्ट चार्जिंग स्टेशन चालवते. या नेटवर्कमध्ये 60 kW ते 240 kW क्षमतेचे चार्जर उपलब्ध आहेत. कंपनीचा हा विस्तार आगामी काळात ईव्ही वापरकर्त्यांना लांब पल्ल्याच्या प्रवासात अधिक सोयीस्कर चार्जिंग पर्याय उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.

New Hyundai Bayon: ह्युंदाई बायोनचे इंटीरियर झाले स्पाय; 360-डिग्री कॅमेरा आणि ड्युअल-टोन केबिनची झलक

कंपनीचे स्वतःचे चार्जिंग नेटवर्क 2030 पर्यंत 600 स्टेशनपर्यंत वाढवण्याचे लक्ष्य आहे. यामध्ये प्रमुख शहरे, महामार्ग आणि ह्युंदाईच्या डीलरशिपचा समावेश केला जाणार आहे. याशिवाय मायह्युंदाई अॅपद्वारे विविध चार्जिंग ऑपरेटरच्या भागीदारीत 38,000 पेक्षा जास्त चार्जिंग पॉइंट्सची माहिती मिळते. ग्राहक या अॅपवरून चार्जर शोधणे, लोकेशनपर्यंत नेव्हिगेशन, स्लॉट बुकिंग आणि डिजिटल पेमेंट करू शकतात.

विशेष म्हणजे ह्युंदाईने 9 सप्टेंबर ते 11 सप्टेंबर 2026 या कालावधीत आपल्या ईव्ही ग्राहकांसाठी मोफत चार्जिंगची घोषणा केली आहे. वर्ल्ड ईव्ही डेच्या निमित्ताने दिलेली ही सुविधा ह्युंदाईच्या स्वतःच्या सार्वजनिक चार्जिंग स्टेशनवर लागू असेल. मात्र चार्जिंग सेशन मायह्युंदाई अॅपमधून बुक करणे आवश्यक आहे. ही सुविधा केवळ ह्युंदाईच्या ईव्हीपुरती मर्यादित आहे.

Hyundai Aims Rural India Market: ग्रामीण बाजारपेठेत हुंडाईचा मोठा विस्तार; विक्रीत 30% वाट्याचे लक्ष्य

दरम्यान, भारतात नवीन मास-मार्केट इलेक्ट्रिक एसयूव्ही आणण्याची तयारीही ह्युंदाई करत आहे. ही एसयूव्ही समर्पित ईव्ही प्लॅटफॉर्मवर आधारित असेल. कंपनीने ईव्ही ग्राहकांसाठी 10,000 पेक्षा जास्त विक्री कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले असून, आर्थिक वर्ष 2026-27 अखेर ही संख्या 17,000 पेक्षा जास्त करण्याचे लक्ष्य आहे. तसेच 650 ईव्ही-रेडी वर्कशॉप्स उभारण्याची कंपनीची योजना आहे.

Web Title: Hyundai delhi 120kw fast chargers free ev charging auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2026 | 09:45 AM

Topics:  

  • automobile
  • Electric Vehicles
  • Hyundai

संबंधित बातम्या

JSW Group आणि Skoda Auto Volkswagen यांचा संयुक्त उपक्रम! भारतातील उत्पादनाला मिळणार मोठी चालना
1

JSW Group आणि Skoda Auto Volkswagen यांचा संयुक्त उपक्रम! भारतातील उत्पादनाला मिळणार मोठी चालना

कावासाकीच्या बाइक्सवर सप्टेंबरमध्ये मोठी सूट! तब्बल Rs. 2.89 लाखांपर्यंत सूट मिळणार! पाहा ऑफर्स
2

कावासाकीच्या बाइक्सवर सप्टेंबरमध्ये मोठी सूट! तब्बल Rs. 2.89 लाखांपर्यंत सूट मिळणार! पाहा ऑफर्स

BMW i5 लाँग व्हीलबेस भारतात लाँच! ₹79.60 लाखांत मिळणार ही लक्झरी इलेक्ट्रिक सेडान!
3

BMW i5 लाँग व्हीलबेस भारतात लाँच! ₹79.60 लाखांत मिळणार ही लक्झरी इलेक्ट्रिक सेडान!

शाओमीच्या नव्या SUVची एन्ट्री! 1,705 km रेंजसह N70 आणि N90  मार्केटमध्ये दाखल
4

शाओमीच्या नव्या SUVची एन्ट्री! 1,705 km रेंजसह N70 आणि N90  मार्केटमध्ये दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.