फोटो सौजन्य: Social Media
भारतीय मार्केटमध्ये दिवसेंदिवस बाईक्सच्या विक्रीत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. याच वाढत्या मागणीमुळे देशात अनेक दुचाकी उत्पादक कंपन्यानी उत्तम मायलेज देणाऱ्या बजेट फ्रेंडली बाईक लाँच केल्या आहेत. पण असे जरी असले तरी भारतात काही अशा बाईक देखील आहेत, ज्याकडे ग्राहकांनी पाठ फिरवली आहे. Honda CD 110 Dream ही बाईक त्यातीलच एक बंद पडलेली बाईक.
होंडाने भारतात त्यांची लोकप्रिय कम्युटर बाईक Honda CD 110 Dream बंद केली आहे. गेल्या 11 वर्षांपासून ही बाईक भारतीय मार्केटमध्ये परवडणाऱ्या कम्युटर सेगमेंटमध्ये एक विश्वासार्ह नाव आहे, परंतु आता याचा प्रवास संपला आहे. कंपनीने आता या बाईकचे उत्पादन बंद केले आहे. होंडा सीडी 110 ड्रीम का बंद करण्यात आली आहे आणि त्यात कोणते उत्तम फीचर्स आहेत त्याबद्दल जाणून घेऊया?
UP वाले ‘या’ बाबतीत महाराष्ट्राच्याही पुढे ! दिल्लीच्याही वरचढ ठरलंय उत्तर प्रदेश
होंडा मोटरसायकलने 2014 मध्ये भारतीय बाजारात ही बाईक लाँच केली आणि त्यानंतर ती होंडाची देशातील सर्वात स्वस्त बाईक होती. तिची एक्स-शोरूम किंमत 41,100 रुपये होती. परवडणारी, विश्वासार्ह आणि व्यावहारिक बाईक शोधणाऱ्या लोकांना लक्षात घेऊन ही बाईक डिझाइन करण्यात आली होती.
यात 109.51 सीसी एअर-कूल्ड इंजिन वापरले होते. त्याचे इंजिन 8.79 हॉर्सपॉवर आणि 9.30 न्यूटन-मीटर टॉर्क जनरेट करत होते, जे रोजच्या रायडिंगसाठी उत्तम होते. कंपनीने कालांतराने ही बाईक अपडेट केली आणि त्यात BS6 इंजिन, सायलेंट स्टॉप/स्टार्ट सिस्टम आणि कम्बाइंड ब्रेकिंग सिस्टम (CBS) सारख्या फीचर्ससह सुसज्ज केली होती. त्यानंतरही, बाजारात या बाईकची पकड कमी होऊ लागली.
Mahindra च्या ‘या’ SUV ची आभाळभर क्रेझ, वेटिंग पिरियड पोहोचला 3 महिन्यावर
अलिकडच्या वर्षांत, या बाईकच्या विक्रीत मोठी घट झाली आहे. SIAM (सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स) च्या अहवालांनुसार, फेब्रुवारी 2025 मध्ये या बाईकचे फक्त 1 युनिट विकले गेले, जे खरंच खूप धक्कादायक आहे. त्यानंतर, मार्च 2025 मध्ये 33 युनिट्सच्या विक्रीसह वाढ झाली, परंतु एप्रिल 2025 मध्ये एकही बाईक विकली गेली नाही.
एप्रिल 2025 मध्ये, CD 110 Dream ची एक्स-शोरूम किंमत 76,401 रुपये होती, जी होंडाच्या नवीन बाईक शाइन 100 पेक्षा 9,501 रुपये जास्त होती. त्यावेळी, शाइन 100 ची किंमत 66,900 रुपये होती. दोन्ही बाईकची डिझाइन सारखीच होती, परंतु सीडी 110 ड्रीममध्ये फक्त थोडे मोठे इंजिन आहे.