ओबेन इलेक्ट्रिकची जोरदार कामगिरी
ओबेन इलेक्ट्रिकची जोरदार कामगिरी
3.2 कोटी किमीचा आकडा गाठला
वेगाने वाढणारी ‘आर एंड डी’ इलेक्ट्रिक मोटारसायकल
मुंबई: ओबेन इलेक्ट्रिक, जी भारतातील सर्वात वेगाने वाढणारी आर एंड डी -आधारित इलेक्ट्रिक मोटारसायकल उत्पादक कंपनी आहे, त्यांनी आज जाहीर केले की ओबेन मोटारसायकलस्वारांनी कंपनीच्या देशव्यापी लाँचिंगनंतर केवळ दोन वर्षांत भारतीय रस्त्यांवर सामूहिकपणे ३.२ कोटींहून अधिक किलोमीटर अंतर पार केले आहे. ग्राहक आपल्या दैनंदिन प्रवासासाठी (Automobile News) प्राथमिक साधन म्हणून ओबेन मोटारसायकलींवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहेत, हेच यावरून स्पष्ट होते.
२०२४ च्या सुरुवातीपासून विविध बाजारपेठांमधील वाहनांच्या डेटावरून एकत्रित केलेले हे अंतर, कंपनीच्या ‘रोर’ पोर्टफोलिओमधील रोर, रोर ईझेड आणि रोर ईझेड सिग्मा या मॉडेल्सचा ग्राहकांकडून होणारा सातत्यपूर्ण वापर दर्शवते. विविध शहरांमधील वाहतूक, भूप्रदेश आणि हवामानाच्या परिस्थितीत पार केलेले हे किलोमीटर प्रत्यक्ष प्रवासातील विश्वासार्हता अधोरेखित करतात. ग्राहक शहरी भागातील रस्ते आणि वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये आपल्या दैनंदिन प्रवासासाठी ओबेन मोटारसायकलींना पसंती देत असल्याचे यावरून दिसून येते.
८५ हून अधिक शहरांमधील वाढत्या उपस्थितीमुळे, पार केलेल्या किलोमीटरचे हे प्रमाण ओबेन इलेक्ट्रिकच्या विस्तारत असलेल्या ग्राहक बेसचा दैनंदिन वापर प्रतिबिंबित करते. कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि दिल्ली यांसारख्या राज्यांचा या प्रवासात मोठा वाटा आहे, जे प्रमुख शहरी बाजारपेठांमधील ओबेनची पकड आणि दैनंदिन प्रवासातील त्यांचे महत्त्व अधोरेखित करते.
पेट्रोल-डिझेलच्या महागाईतून हवी असेल सुटका, तर ‘CNG’ ठरेल सर्वोत्तम पर्याय; जाणून घ्या 5 मोठे फायदे
दैनंदिन प्रवास सुलभ करण्यासोबतच, या बदलामुळे चालकांना आर्थिक लाभही मिळाले आहेत. एकत्रितपणे, ग्राहकांनी पेट्रोलच्या खर्चात रुपये ८ कोटींची बचत केली आहे. तसेच अंदाजे ३८५ मेट्रिक टन कार्बन उत्सर्जन कमी करण्यास योगदान दिले आहे. दैनंदिन प्रवासासाठी ओबेन मोटारसायकली निवडण्याचे हे आर्थिक आणि पर्यावरणीय फायदे आहेत.
या सातत्यपूर्ण वापराला ओबेन केअर कडून भक्कम पाठबळ मिळत आहे. ही कंपनीची समर्पित विक्रीपश्चात सेवा असून, ती रायडर्सना त्यांच्या दैनंदिन प्रवासासाठी मोटारसायकलवर आत्मविश्वासाने अवलंबून राहता येईल याची खात्री देते. विस्तारत असलेल्या सर्व्हिस इन्फ्रास्ट्रक्चर, प्रशिक्षित तंत्रज्ञ आणि २४×७ ग्राहक सहाय्य याद्वारे, ओबेन केअर मोटारसायकलींना रस्ते प्रवासासाठी सदैव सज्ज ठेवण्यास मदत करते आणि संपूर्ण भारतातील ग्राहकांना अखंड सेवा उपलब्ध करून देते.
या टप्प्यावर भाष्य करताना ओबेन इलेक्ट्रिकच्या संस्थापीका आणि सीईओ, मधुमिता अग्रवाल म्हणाल्या, “दैनंदिन प्रवासासाठी सातत्य, विश्वासार्हता आणि मालकीचा आत्मविश्वास असणे आवश्यक असते. विविध शहरांमध्ये आणि विविध परिस्थितीत रायडर्सनी ओबेन मोटारसायकलवर ३.२ कोटी किलोमीटरहून अधिक अंतर पार करणे हे ग्राहक या मोटारसायकलींना त्यांच्या रोजच्या प्रवासाचा अविभाज्य भाग कसे बनवत आहेत, याचेच प्रतिबिंब आहे. यामुळे भारतीय प्रवासाच्या खऱ्या गरजा लक्षात घेऊन उत्पादने विकसित करण्याच्या आमच्या उद्देशाला अधिक बळकटी मिळते.”
Renault Duster चा जलवा, लवकरच होणार भारतात लॉन्च, फक्त ‘इतकी’ किंमत…
ओबेन इलेक्ट्रिकच्या जबरदस्त विकास प्रक्रियेदरम्यान हा मैलाचा दगड गाठला गेला आहे. कॅलेंडर वर्ष २०२५ मध्ये, विस्तारती बाजारपेठ आणि ग्राहकांकडून वाढता प्रतिसाद यामुळे कंपनीने ३७६% वार्षिक वाढ नोंदवली आहे. कंपनी भारतात आपले रिटेल नेटवर्क सातत्याने मजबूत करत असून, येत्या दोन वर्षांत ५०० शोरूम्सपर्यंत विस्तार करण्याची त्यांची योजना आहे, ज्यामुळे त्यांच्या मोटारसायकली आणि सेवा परिसंस्था ग्राहकांसाठी अधिक सुलभ होईल.
या वाढीच्या केंद्रस्थानी ओबेन इलेक्ट्रिकचे ‘व्हर्टिकली इंटिग्रेटेड मॅन्युफॅक्चरिंग मॉडेल’ आहे. कंपनी बेंगळुरू येथील आपल्या ३.५ एकरच्या उत्पादन केंद्रात स्वतःची मालकी असलेलीएलएफपी बॅटरी सिस्टिम, मोटर्स, व्हेईकल कंट्रोल युनिट्स आणि फास्ट चार्जर्ससह महत्त्वाचे ईव्ही घटक स्वतः डिझाइन आणि विकसित करते. ५० हून अधिक गुणवत्ता तपासण्या आणि ९५ टक्के ‘स्ट्रेट पास रेशो’ असलेल्या झिरो-डिफेक्ट प्रॉडक्शन फ्रेमवर्क अंतर्गत कार्यरत असलेला हा प्रकल्प, सर्व बाजारपेठांमध्ये उत्पादनाची सातत्यपूर्ण विश्वासार्हता सुनिश्चित करतो.






