Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिल्लीत E85 पेट्रोल पंपाचा शुभारंभ! भारताच्या ऑटोमोबाईल क्षेत्रासाठी तख्तापलट?

जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने 5 जून 2026 रोजी दिल्लीतील पूसा रोड येथील इंडियन ऑइलच्या पंपावर देशातील पहिला E85 इंधन पंप सुरू करण्यात आला. E85 हे इंधन 85 टक्के इथेनॉल आणि 15 टक्के पेट्रोलच्या मिश्रणापासून तयार होते. सध्या दिल्लीमध्ये E85 ची किंमत ₹82.12 प्रति लिटर असून ती E20 पेट्रोलपेक्षा सुमारे ₹20 ने स्वस्त आहे. केंद्र स

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jun 07, 2026 | 06:00 PM
दिल्लीत E85 पेट्रोल पंपाचा शुभारंभ! भारताच्या ऑटोमोबाईल क्षेत्रासाठी तख्तापलट?
Follow Us
Follow Us:

जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने 5 जून 2026 रोजी दिल्लीतील पूसा रोड येथील इंडियन ऑइलच्या पंपावर देशातील पहिला E85 इंधन पंप सुरू करण्यात आला. E85 हे इंधन 85 टक्के इथेनॉल आणि 15 टक्के पेट्रोलच्या मिश्रणापासून तयार होते. सध्या दिल्लीमध्ये E85 ची किंमत ₹82.12 प्रति लिटर असून ती E20 पेट्रोलपेक्षा सुमारे ₹20 ने स्वस्त आहे. केंद्र सरकारचा पुढे जाऊन भविष्यात E85 संपूर्ण देशभरात लागू करण्याचा मानस आहे, असे दिसते.

E85 कसे काम करते?

सामान्य पेट्रोल इंजिनमध्ये E85 वापरता येत नाही. यासाठी विशेष “फ्लेक्स-फ्युएल व्हेईकल्स” (FFV) आवश्यक असतात. इथेनॉलचे ऑक्टेन मूल्य पेट्रोलपेक्षा जास्त असल्याने इंजिन अधिक हाय कॉम्प्रेशन रेशोवर चालू शकते. मात्र इथेनॉलची ऊर्जा घनता कमी असल्याने E85 वापरणाऱ्या वाहनांचे मायलेज काही प्रमाणात कमी होऊ शकते.

Flex Fuel: पेट्रोलपेक्षा स्वस्त इंधनासाठी 2027 पर्यंत देशात उघडणार …

यामागे सरकारचा उद्देश काय?

भारत आपल्या गरजेपैकी सुमारे 85 टक्के कच्चे तेल आयात करतो. त्यामुळे परकीय चलनाचा मोठा खर्च होतो. इथेनॉल हे ऊस, मका आणि इतर कृषी उत्पादनांपासून देशांतर्गत तयार करता येत असल्याने आयातीत इंधनावरील असलेले अवलंबन कमी करणे, ऊर्जा सुरक्षा वाढवणे आणि शेतकऱ्यांना अतिरिक्त बाजारपेठ उपलब्ध करून देणे हा सरकारचा मुख्य उद्देश आहे. तसेच वाहनांमधून होणारे कार्बन उत्सर्जन कमी करण्याचाही हा कसोशीचा प्रयत्न ठरू शकतो.

E85 चे फायदे

  • पेट्रोलपेक्षा स्वस्त इंधन.
  • कच्च्या तेलाच्या आयातीवरील खर्चात घट.
  • ऊस व मका उत्पादक शेतकऱ्यांना नवीन मागणी.
  • कार्बन उत्सर्जन आणि प्रदूषणात संभाव्य घट.
  • देशाच्या ऊर्जा आत्मनिर्भरतेला चालना.
E85 चे तोटे
  • E85 वापरण्यासाठी विशेष फ्लेक्स-फ्युएल इंजिन आवश्यक.
  • इथेनॉलची ऊर्जा क्षमता कमी असल्याने मायलेज कमी मिळू शकते.
  • चुकीने सामान्य पेट्रोल वाहनात E85 भरल्यास इंजिन, फ्युएल लाईन्स व रबर सील्सना नुकसान होण्याचा धोका.
  • देशभर पायाभूत सुविधा उभारण्यासाठी मोठ्या गुंतवणुकीची गरज
आता तुमची कार सुद्धा मागेल दारू! पेट्रोल-डिझेल नव्हे चक्क दारूवर चालणार …

भारतातील जलसंकटावर होणारा परिणाम

E85 संदर्भातील सर्वात मोठी चिंता म्हणजे पाण्याचा वापर. भारतातील बहुतांश इथेनॉल ऊसापासून तयार केले जाते आणि ऊस हे अत्यंत पाणीखाऊ पीक मानले जाते. जर इथेनॉलची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली तर शेतीसाठी अधिक पाण्याची गरज भासू शकते. महाराष्ट्र, कर्नाटक आणि उत्तर भारतातील काही भाग आधीच जलटंचाईचा सामना करत आहेत. त्यामुळे इथेनॉल उत्पादन वाढवताना जलव्यवस्थापन आणि पर्यायी कच्च्या मालाचा वापर करणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.

ऑटोमोबाईल उद्योगावरील परिणाम

E85 मुळे भारतीय ऑटो उद्योगात मोठे तांत्रिक बदल अपेक्षित आहेत. वाहन उत्पादकांना फ्लेक्स-फ्युएल इंजिन, इथेनॉल-प्रतिरोधक फ्युएल सिस्टीम, नवीन इंजेक्टर आणि सुधारित ECU तंत्रज्ञान विकसित करावे लागेल. त्यामुळे संशोधन व विकास खर्च वाढेल. दुसरीकडे, फ्लेक्स-फ्युएल वाहनांचे नवीन मार्केट तयार होईल. विशेषतः दुचाकी आणि कार उत्पादकांसाठी ही एक मोठी व्यावसायिक संधी ठरू शकते.

एकूणच, E85 हे भारताच्या ऊर्जा धोरणातील महत्त्वाचे पाऊल असले तरी त्याचे यश जलव्यवस्थापन, वाहन तंत्रज्ञान आणि इथेनॉल उत्पादनाच्या शाश्वततेवर अवलंबून असेल

Web Title: E85 fuel pump inaugrated in delhi auto sector

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2026 | 06:00 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.