Oben Rorr EZ ही इलेक्ट्रिक बाईक 5 ऑगस्ट 2025 रोजी लाँच होणार
भारतात इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीत झपाट्याने वाढ होत आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे रस्त्यांवर इलेक्ट्रिक वाहनांचे वाढते प्रमाण. तसेच, देशात अनेक ऑटो कंपन्या कार्यरत आहेत, ज्या बेस्ट इलेक्ट्रिक बाईक, स्कूटर आणि कार ऑफर करत आहे.
देशात इलेक्ट्रिक कारसोबतच, ई बाईक आणि स्कूटरला सुद्धा ग्राहकांचा चांगला पाठिंबा मिळत आहे. देशात अनेक उत्तम इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपन्या आहेत, Oben Electric ही त्यातीलच एक दुचाकी उत्पादक कंपनी.
आता ओबेन इलेक्ट्रिक 5 ऑगस्ट 2025 रोजी त्यांची नेक्स्ट जनरेशन हाय-परफॉर्मन्स बाईक Rorr EZ लाँच करणार आहे. ही तीच बाईक आहे जी पहिल्यांदा नोव्हेंबर 2024 मध्ये सादर करण्यात आली होती, परंतु आता ती अपडेटेड व्हर्जन म्हणून बाजारात आणण्यात येईल, ज्यामध्ये पूर्वीपेक्षा चांगली बॅटरी टेक्नॉलॉजी आणि प्रगत स्मार्ट फीचर्स असतील. खरं तर, कंपनीने माहिती दिली आहे की बाईकची डिलिव्हरी 15 ऑगस्ट 2025 पासून सुरू होईल. चला या बाईकबद्दल जाणून घेऊयात.
Honda कडून पहिल्या वाहिल्या इलेक्ट्रिक बाईकचा टिझर लाँच, ‘या’ दिवशी होणार सादर
ओबेन म्हणतात की त्यांचे नवीन मॉडेल विशेषतः अशा लोकांसाठी डिझाइन करण्यात आलेले आहे ज्यांना बाईककडून चांगला परफॉर्मन्स आणि नवीन तंत्रज्ञान अपेक्षित आहे. या बाईकमध्ये, कंपनीने स्वतःची विकसित LFP बॅटरी टेक्नॉलॉजी वापरली आहे, जी पूर्वीपेक्षा 50% जास्त उष्णता प्रतिरोधक असण्यासोबतच याची बॅटरी लाइफ देखील दुप्पट असल्याचे म्हटले जाते.
Rorr EZ ही दोन बॅटरी व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. पहिले 3.4 kWh व्हर्जन आहे, ज्याची किंमत 1,19,999 रुपये आहे आणि दुसरे 4.4 kWh व्हर्जन आहे, ज्याची किंमत 1,29,999 रुपये आहे. ही इलेक्ट्रिक बाईक IDC-प्रमाणित रेंज देते आणि याचा टॉप स्पीड 95 किमी प्रतितास आहे. ही बाईक फक्त 3.3 सेकंदात 0 ते 40 किमी प्रतितास स्पीड वाढवू शकते आणि 52 Nm चा टॉर्क जनरेट करते, ज्यामुळे रायडिंगचा अनुभव अधिक पॉवरफुल होतो.
चीनच्या बॅटरी इंडस्ट्रीचे टेन्शन वाढले, Tesla चा LG Energy सोबत 35,000 कोटींचा बॅटरी करार
ही नवीन इलेक्ट्रिक बाईक कंपनीच्या अलीकडेच लाँच झालेल्या O100 प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली आहे, जी ओबेनने त्यांच्या बंगळुरूस्थित संशोधन आणि विकास केंद्रात इन-हाऊस विकसित केली आहे. हे प्लॅटफॉर्म पूर्णपणे मॉड्यूलर आहे आणि त्यात अनेक बॅटरी कॉन्फिगरेशनना सपोर्ट करण्याची क्षमता आहे. कंपनीचे म्हणणे आहे की हे प्लॅटफॉर्म भविष्यातील गरजा लक्षात घेऊन डिझाइन केले गेले आहे.