फोटो सौजन्य: @BharatTechIND (X.com)
मार्केटमध्ये इलेक्ट्रिक वाहनांना इंधनावर चालणाऱ्या वाहनांपेक्षा जास्त मागणी मिळत आहे. यामागील मोठे कारण म्हणजे इंधनाच्या वाढत्या किमती. ज्याप्रमाणे भारतात इलेक्ट्रिक कार ऑफर केल्या जात आहे. त्याप्रमाणे, इलेक्ट्रिक दुचाक्या सुद्धा ऑफर केल्या जात आहे.
Ola Electric, TVS आणि Hero Motocorp भारतात दमदार रेंज आणि फीचर्स असणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटर ऑफर करत आहे. मात्र, आज आपण अशा एक बजेट फ्रेंडली इलेक्ट्रिक स्कूटरबद्दल जाणून घेणार आहोत, जी तुम्ही फक्त 10,000 रुपयांच्या डाउन पेमेंट वर खरेदी करू शकतात.
ऑगस्ट 2025 मध्ये Tata Motors ‘या’ कारवर देतेय बंपर डिस्काउंट, लाखो रुपये वाचवण्याची सुवर्ण संधी
जर तुम्हाला स्टायलिश, किफायतशीर आणि कुटुंबासाठी अनुकूल इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करायची असेल, तर Ather Rizta तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो. ही स्कूटर मोठी सीट, चांगली जागा आणि प्रगत फीचर्ससह येते. त्याची सुरुवातीची किंमत 1.15 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे आणि तुम्ही फक्त 10,000 रुपयांचे डाउन पेमेंट देऊन त्यासाठी फायनान्स करू शकता.
राजधानी दिल्लीमध्ये Ather Rizta च्या बेस व्हेरिएंटची ऑन-रोड किंमत सुमारे 1.22 लाख आहे, ज्यामध्ये आरटीओ शुल्क आणि इंश्युरन्स समाविष्ट आहे. जर तुम्ही 10,000 डाउन पेमेंट म्हणून दिले तर तुम्ही उर्वरित 1.12 लाखांचे कर्ज बँकेकडून घेऊ शकता. कर्ज घेण्यासाठी, तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असणे महत्वाचे आहे. उदाहरणार्थ, जर बँक तुम्हाला 3 वर्षांसाठी 9% व्याजदराने 1.12 लाखांचे कर्ज देत असेल, तर तुमचा ईएमआय दरमहा सुमारे 4,000 असेल. या काळात, तुम्हाला एकूण व्याज म्हणून सुमारे 30,000 रुपये अतिरिक्त द्यावे लागतील.
दोन बॅटरी पर्यायांसह Ather Rizta उपलब्ध आहे. 2.9 kWh क्षमतेची बॅटरी एका चार्जवर 123 किमीपर्यंत तर 3.7 kWh बॅटरी 160 किमीपर्यंतचा रेंज देते. या स्कूटरचा टॉप स्पीड 80 किमी प्रतितास असून, ही कार फक्त 4.7 सेकंदांत 0 ते 40 किमी प्रतितास स्पीड गाठू शकते.
Elon Musk आता थांबणार नाही ! बंगळुरूमध्ये Tesla चा उघडणार नवीन शोरूम
Ather Rizta आधुनिक आणि स्मार्ट फीचर्सने सुसज्ज आहे. यात 7-इंचाचा रंगीत TFT डिस्प्ले असून तो ब्लूटूथ, नेव्हिगेशन आणि स्मार्ट कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करतो. डिस्प्लेवर व्हॉट्सॲप नोटिफिकेशन्स आणि लाईव्ह लोकेशन ट्रॅकिंग पाहता येते. तसेच यात मल्टी-डिव्हाइस चार्जर, मॅजिक ट्विस्ट आणि तब्बल 56 लिटर स्टोरेज उपलब्ध आहे. सुरक्षिततेसाठी कम्बाइंड ब्रेकिंग सिस्टीम (CBS) देण्यात आली आहे.
रिझ्टाची ऑन-रोड किंमत, कर्ज रक्कम आणि EMI शहर, व्हेरिएंट आणि बँकेच्या पॉलिसीनुसार बदलू शकतात. त्यामुळे खरेदीपूर्वी जवळच्या डीलर आणि बँकेकडून अचूक माहिती घेणे आवश्यक आहे.
रिझ्टाची ऑन-रोड किंमत, कर्ज रक्कम आणि EMI शहर, व्हेरिएंट आणि बँकेच्या पॉलिसीनुसार बदलू शकतात. त्यामुळे खरेदीपूर्वी जवळच्या डीलर आणि बँकेकडून अचूक माहिती घेणे आवश्यक आहे.