फोटो सौजन्य: iStock
‘आपली स्वतःची कार असावी’ हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक जण दिवस रात्र कष्ट करत असतात. मात्र, अनेक जण कार खरेदी करताना योग्य डिस्काउंटच्या प्रतीक्षेत असतात. जर तुम्ही सुद्धा अशाच एका ऑफरची वाट बघत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.
भारतात Tata Motors ने दमदार कार ऑफर केल्या आहेत. मात्र, कंपनी फक्त दमदार कार ऑफर करत नाही तर त्यावर आकर्षित असे ऑफर्स सुद्धा देते. अशातच आता मार्केटमध्ये टाटा मोटर्स त्यांच्या काही चारसववर बंपर डिस्काउंट देत आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
टाटा सफारी ही प्रीमियम एसयूव्ही सेगमेंटमधील उत्पादक कंपनीकडून ऑफर केली जाते. जर ही कार या महिन्यात खरेदी केली तर तुमच्या पैश्यांची सर्वाधिक बचत होऊ शकते. रिपोर्ट्सनुसार, या महिन्यात ही एसयूव्ही खरेदी केल्यावर तुम्हाला 1.05 लाख रुपयांपर्यंतच्या ऑफर मिळू शकतात. ही ऑफर त्याच्या जुन्या व्हर्जनवर दिली जात आहे. या महिन्यात नवीन सफारी खरेदी केल्यावर 1 लाख रुपयांपर्यंतची बचत होऊ शकते.
Elon Musk आता थांबणार नाही ! बंगळुरूमध्ये Tesla चा उघडणार नवीन शोरूम
मिड साइझ एसयूव्ही सेगमेंटमधील टाटा हॅरियरच्या जुन्या व्हर्जनवर या महिन्यात 1.05 लाख रुपयांपर्यंतची सूट मिळू शकते. तर नवीन व्हर्जन खरेदी केल्यास जास्तीत जास्त 1 लाख रुपयांची बचत होईल.
प्रीमियम हॅचबॅक सेगमेंटमधील अल्ट्रोजच्या प्री-फेसलिफ्ट मॉडेलवर 85 हजार रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. मात्र, त्याच्या नवीन व्हर्जनवर कोणतीही ऑफर नाही.
टाटाची सर्वात परवडणारी एसयूव्ही पंचच्या सीएनजी व्हेरिएंटवर 85 हजार रुपयांपर्यंतची सूट मिळू शकते. तर पेट्रोल व्हेरिएंट खरेदी केल्यास जास्तीत जास्त 65 हजार रुपयांची बचत होईल.
होय हे शक्य आहे! महिना 25 हजार कमावणारा सुद्धा विकत घेईल Royal Enfield Hunter 350, असा असेल हिशोब
कॉम्पॅक्ट सेडान टिगोर खरेदी केल्यास ग्राहकांना 60 हजार रुपयांपर्यंत फायदा मिळू शकतो.
टाटा कॉम्पॅक्ट सेडान सेगमेंटमध्ये टाटा टिगोर विकते. जर तुम्ही या महिन्यात ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही जास्तीत जास्त 60000 रुपये वाचवू शकता.
लोकप्रिय कॉम्पॅक्ट एसयूव्ही नेक्सॉन खरेदी करणाऱ्यांना 50 हजार रुपयांची बचत होईल.
कूप स्टाईल एसयूव्ही कर्व्हवर देखील ऑफर असून, ग्राहकांना 30 हजार रुपयांपर्यंत सूट मिळू शकते.