फोटो सौजन्य: @carandbike (X.com)
भारतात इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. हीच, वाढती मागणीकडे लक्ष देत, अनेक वाहन उत्पादक कंपन्या इलेक्ट्रिक कार, बाईक आणि स्कूटरचे उत्पादन करत आहे. ग्राहक देखील इंधनावर चालणाऱ्या वाहनांपेक्षा पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहनांना जास्त प्राधान्य देत आहे.
भारतीय ऑटो बाजारात इलेक्ट्रिक स्कूटरला देखील चांगली मागणी आहे. अशातच जर तुम्ही सुद्धा इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे. Hero मोटॉरकॉर्पने नुकतेच Vida VX2 च्या किमतीत कपात केली आहे. चला जाणून घेऊयात की Hero Vida VX2 च्या किमतीत किती रुपयांची कपात करण्यात आली आहे.
कसा असेल देशाचा फ्युचर ट्रान्सपोर्ट प्लॅन? Nitin Gadkari म्हणतात,”भारताचा प्रवास…
हिरो मोटोकॉर्पच्या इलेक्ट्रिक स्कूटर ब्रँड विडाने अलीकडेच VX2 लाँच केली आहे आणि त्याच्या दोन्ही व्हेरिएंटच्या किंमती कमी केल्या आहेत. कंपनीने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर ही माहिती दिली आहे. वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, हिरो विडाच्या VX2 Plus स्कूटरची किंमत 7 ते 10 हजार रुपयांनी कमी करण्यात आली आहे. VX2 Go ची किंमतही 14500 रुपयांनी कमी करण्यात आली आहे.
किंमत कमी झाल्यानंतर, VX2 Plus स्कूटर आता फक्त 99990 रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत खरेदी करता येईल. त्याच वेळी, BaaS सह ही स्कूटर 57990 रुपयांना खरेदी करता येईल.
Vida VX2 Go ची नवीन किंमत 84990 रुपये आणि BaaS सह 44990 रुपये निश्चित करण्यात आली आहे. या किमती इंट्रोडक्टरी ऑफर्ससह देण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत, लिमिटेड पिरियडसाठी या किमतीत स्कूटर खरेदी करता येईल.
Toyota Hyryder साठी लिमिटेड एडिशन Prestige Package लाँच, खास वैशिष्ट्ये आणि किंमत
Vida ने नवीन स्कूटरमध्ये अनेक उत्तम फीचर्स दिले आहेत. यात 4.3 इंच TFT स्क्रीन, सात कलर ऑप्शन, इको, राइड आणि स्पोर्ट्स मोड, डिस्क ब्रेक, 27.2 लिटर क्षमतेचे अंडरसीट स्टोरेज आणि 6.1 लिटर फ्रंक स्टोरेज, 12 इंच टायर, फोन चार्जिंग, एलईडी लाईट्स अशी फीचर्स आहेत.
निर्माता VX2 Plus स्कूटरमध्ये 3.4 kWh क्षमतेच्या दोन रिमूव्हेबल बॅटरी मिळतात, ज्या स्कूटरला 142 किमीची रेंज देतात. त्यात बसवलेली मोटर 6 किलोवॅटची पॉवर देते, ज्यामुळे तुम्ही ही स्कूटर 80 किमी प्रतितास या कमाल वेगाने चालवू शकतात. ती 3.1 सेकंदात 0-40 किमीचा वेग गाठते.