कसा असेल देशाचा फ्युचर ट्रान्सपोर्ट प्लॅन? Nitin Gadkari म्हणतात,"भारताचा प्रवास...
भारतीय ट्रान्सपोर्ट क्षेत्रात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. अनेक जणांचे रोजगार देखील या क्षेत्रावर अवलंबून आहे. अशातच देशाचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी देशाच्या फ्युचर ट्रान्सपोर्ट प्लॅनबद्दल भाष्य केले आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी अलिकडेच दिलेल्या मुलाखतीत PTI ला सांगितले की, भारताचे वाहतूक क्षेत्र एका मोठ्या बदलातून जात आहे. त्यांचे दृष्टिकोन केवळ महानगरांपुरते मर्यादित नसून दुर्गम ग्रामीण भागांचाही यात समावेश आहे. देशातील प्रवास अधिक कार्यक्षम, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक बनवणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. भारताच्या वाहतूक भविष्याबद्दल नितीन गडकरी अजून काय म्हणाले त्याबद्दल जाणून घेऊयात.
मुकेश अंबानी नाही तर ‘या’ व्यक्तीकडे आहे 100 कोटीची कार, नाव वाचून व्हाल थक्क!
नितीन गडकरींच्या योजनेचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे शहरांमध्ये इलेक्ट्रिक रॅपिड ट्रान्सपोर्ट आणि हायपरलूप सारख्या सिस्टीम आणणे. दिल्ली आणि बेंगळुरूसारख्या शहरांसाठी मेट्रोनो पॉड टॅक्सी आणि पिलर-आधारित मास रॅपिड ट्रान्सपोर्टसारखे पायलट प्रकल्प आधीच पाइपलाइनमध्ये आहेत.
यासोबतच, दुर्गम भागांसाठी रोपवे, केबल कार आणि फ्युनिक्युलर रेल्वे बांधली जात आहेत. केदारनाथसह एकूण 360 ठिकाणी अशा प्रकल्पांची आखणी केली जात आहेत. यापैकी 60 प्रकल्पांवर काम आधीच सुरू झाले आहे. तसेच फ्युनिक्युलर रेल्वे सिस्टीम आणण्याची योजना देखील आखली जात आहेत, जी लिफ्ट आणि रेल्वे तंत्रज्ञानाचे मिश्रण आहे, जेणेकरून डोंगराळ किंवा खडकाळ भागात लोकांना आणि त्यांच्या वस्तुंना सहजपणे वर आणि खाली नेले जाऊ शकते. या प्रकल्पांची किंमत 200 कोटी रुपयांपासून 5000 कोटी रुपयांपर्यंत आहे.
भारतातील रस्त्यांची पायाभूत सुविधा मजबूत करण्यावरही पूर्ण लक्ष दिले जात आहे. याअंतर्गत, 25000 किमी लांबीचे दोन-लेन महामार्ग चार-लेनमध्ये अपग्रेड केले जातील. नितीन गडकरी यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की त्यांचे लक्ष्य दररोज 100 किमी रस्ते बांधण्याचे आहे. 2013-14 मध्ये राष्ट्रीय महामार्गांची लांबी 91,287 किमी होती, जी आता 1,46,204 किमी झाली आहे, जी सुमारे 60% वाढली आहे. राष्ट्रीय हाय-स्पीड कॉरिडॉरची लांबी देखील 2014 मध्ये 93 किमीवरून आता 2,474 किमी झाली आहे. सरकार रस्ते बांधणीत प्रीकास्ट कन्स्ट्रक्शन, तीन-फूट रॉड बॅरिअर, ड्रोन आणि कॅमेरा मॉनिटरिंग सिस्टमसारख्या AI-आधारित गोष्टींचा वापर करत आहे.