फोटो सौजन्य: @ashishpol86 (X.com)
भारतीय मार्केटमध्ये अनेक ऑटो कंपन्या आहेत, ज्या बेस्ट कार्स ऑफर करत असतात. आता मार्केटमध्ये इलेक्ट्रिक कार्सना चांगली मागणी मिळताना दिसत आहे. या मागणीनुसार अनेक वाहन उत्पादक कंपन्या बाजारात उत्तम फीचर्स असणाऱ्या इलेक्ट्रिक कार लाँच करत आहे .
BYD सारख्या विदेशी कंपन्या सुद्धा भारतात इलेक्ट्रिक कार ऑफर करत आहे.आता लवकरच Tesla ही एलोन मस्कची कंपनी भारतीय बाजारात आपल्या कार्स लाँच करण्यास सज्ज होत आहे. गेल्या काही काळापासून अशी चर्चा होती की एलोन मस्कची टेस्ला लवकरच भारतात एंट्री मारणार आहे. अलिकडेच सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओवरूनही ही गोष्ट खरी आहे याची पुष्टी होतेय. या व्हिडिओमध्ये कोणत्या प्रकारची माहिती मिळाली आहे? टेस्ला भारतात कोणती इलेक्ट्रिक कार लाँच करू शकते? त्याबद्दल आपण जाणून घेऊयात.
भारतीय बाजारात इलेक्ट्रिक कारचा बोलबाला; मात्र ‘या’ कारकडे ग्राहकांनी ढुंकूनही पहिले नाही
@volklub Tesla testing on Mumbai pune express way pic.twitter.com/2s2FWiyJ2B
— Ashish Pol (@ashishpol86) April 15, 2025
एलोन मस्कच्या मालकीची इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपनी टेस्ला लवकरच भारतात औपचारिकपणे एंट्री मारण्याची तयारी करत आहे. याआधीही टेस्ला भारतात येण्याबाबत अनेक वेळा चर्चेत आली होती. पण आता सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या आणखी एका व्हिडिओमुळे याची पुष्टी होत आहे.
सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. ज्यामध्ये भारतीय रस्त्यांवर टेस्टिंग दरम्यान टेस्ला कार दिसली आहे. महाराष्ट्रातील पुणे येथील आशिष पोळ यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवरून दोन व्हिडिओ पोस्ट केले आहेत. या व्हिडिओंमध्ये, टेस्लाची नवीन इलेक्ट्रिक कार मुंबई-पुणे महामार्गावर टेस्टिंग दरम्यान धावताना दिसली आहे.
व्हिडिओमध्ये स्पॉट झालेली ही कार टेस्लाची मॉडेल वाय आहे. परंतु, व्हिडिओमध्ये दाखवलेली कार पूर्णपणे झाकलेली दिसत आहे. पण ही Model Y असण्याची दाट शक्यता आहे. रिपोर्ट्सनुसार, या एसयूव्हीसोबत, Model 3 देखील भारतात लाँच केली जाऊ शकते.
आता ‘या’ कंपनीची टू व्हीलर खरेदी करण्यासाठी शोरूमला जाण्याची गरज नाही, घरबसल्या मिळेल डिलिव्हरी
टेस्लाची मॉडेल वाय रियर व्हील ड्राइव्ह आणि लांब पल्ल्याच्या ऑल व्हील ड्राइव्ह पर्यायांसह येते. एकदा चार्ज केल्यावर ही कार 719 किलोमीटर पर्यंत चालवता येते. कारमधील असलेली मोटार 0-100 किलोमीटरची स्पीड गाठण्यासाठी 5.9 सेकंद घेते. पण त्याचे ऑल-व्हील ड्राइव्ह व्हेरियंट फक्त 4.3 सेकंदात 0-100 किलोमीटर प्रति तास वेगाने चालवता येतो. फीचर्सनुसार, त्यात एलईडी हेडलाइट्स, एलईडी टेल लाईट्स, 15.4 इंचाची इन्फोटेनमेंट सिस्टम, मागील प्रवाशांसाठी आठ इंचाची स्क्रीन असे फीचर्स दिले आहेत.