फोटो सौजन्य: iStock
देशात वाढत्या इंधनाच्या किंमतीमुळे अनेक जण इलेक्ट्रिक वाहनांना प्राधान्य देत आहेत. तसेच सरकार देखील EVs ची विक्री वाढावी म्हणून सबसिडी ऑफर करत आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढत आहे. नुकतेच जगप्रसिद्ध इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपनी टेस्लाने भारतात एंट्री मारली आहे.
Tesla Model Y ही इलेक्ट्रिक एसयूव्ही भारतात 15 जुलै 2025 रोजी लाँच झाली. तसेच कंपनीने त्यांचे पहिले शोरूम आणि चार्जिंग स्टेशन सुद्धा मुंबईत सुरु केले आहेत. अमेरिकन वाहन उत्पादक कंपनी टेस्लानेही भारतात आपले दोन शोरूम सुरू केले आहेत. आता तिसरे शोरूम कोणत्या शहरात उघडण्याची तयारी सुरू आहे. ते कधीपर्यंत सुरू करता येईल? त्याबद्दल आज आपण जाणून घेऊयात.
Hyundai Verna चा बेस व्हेरिएंटसाठी 2 लाखांचं डाउन पेमेंट केल्यास फक्त ‘एवढुसा’ असेल EMI
टेस्लाने लवकरच तिसरे शोरूम उघडण्याची तयारी सुरू केली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, नवीन शोरूम दक्षिण भारतातील बेंगळुरूमध्ये उघडले जाईल. तसेच कंपनी केवळ बंगळुरूमध्ये शोरूम उघडणार नाहीत तर तिथे एक सुपरचार्जर देखील स्थापित करतील. पुढील महिन्यापर्यंत कंपनी तिसरा शोरूम उघडू शकेल अशी अपेक्षा आहे.
एलोन मस्कच्या टेस्लाने भारतातील तिसऱ्या शोरूमसाठी बेंगळुरूची निवड केली आहे कारण ते देशातील सर्वात मोठे आयटी सेंटर आहे. जगभरातील अनेक मोठ्या कंपन्यांची ऑफिस येथे आहेत, जिथे लाखो लोक काम करतात. यापैकी बरेच लोक परदेशात प्रवास करतात आणि बरेच लोक तिथे टेस्ला कार वापरतात. याशिवाय, बेंगळुरू हे देशातील इलेक्ट्रिक वाहन उत्पादकांसाठी सर्वोत्तम शहर आहे. देशातील बहुतेक ईव्ही स्टार्टअप्स येथे नोंदणीकृत आहेत.
होय हे शक्य आहे! महिना 25 हजार कमावणारा सुद्धा विकत घेईल Royal Enfield Hunter 350, असा असेल हिशोब
या कंपनीने आतापर्यंत भारतात फक्त एकच इलेक्ट्रिक कार Tesla Model Y लाँच केली आहे. हे मॉडेल मुंबई, दिल्लीच्या शोरूममध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे आणि ते बेंगळुरूमध्ये देखील प्रदर्शित केले जाईल.
Tesla Model Y मध्ये अनेक उत्तम फीचर्स देण्यात येत आहेत. यात 15.4 इंच टचस्क्रीन, गरम आणि हवेशीर सीट्स, अँबियंट लाइट्स, रियर व्हील ड्राइव्ह, नऊ स्पीकर्स, एईबी, ब्लाइंड स्पॉट कोलिजन वॉर्निंग, टिंटेड ग्लास रूफ असे अनेक उत्तम फीचर्स आहेत.
Tesla Model Y ला कंपनीने शॉर्ट आणि लाँग रेंज बॅटरी पर्यायांसह ऑफर केली आहे. ही कार एकदा चार्ज केल्यानंतर 500 आणि 622 किलोमीटरपर्यंत चालवता येते.
टेस्लाने भारतात ऑफर केलेल्या मॉडेल वाय ची एक्स-शोरूम किंमत 59.89 लाख रुपये आहे. त्याच्या टॉप व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 67.89 लाख रुपये आहे.
टेस्लाच्या मॉडेल वायची किंमत, फीचर्स आणि रेंज पाहता, या सेगमेंटमध्ये ही कार थेट Hyundai Ioniq5, Kia EV6, Mercedes, Audi, BMW आणि Volvo च्या ईव्हीशी स्पर्धा करेल.