Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tata Punch EV च्या कोणत्या व्हेरिएंटमध्ये मिळेल सर्वाधिक फीचर्स? कार खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या महत्वाची माहिती

नुकतेच Tata Punch EV चे फेसलिफ्ट व्हर्जन भारतात लाँच झाले आहे. चला जाणून घेऊयात कोणत्या व्हेरिएंटमध्ये तुम्हाला सर्वात जास्त फीचर्स पाहायला मिळेल.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 23, 2026 | 07:44 PM
फोटो सौजन्य: X.com

फोटो सौजन्य: X.com

Follow Us
Close
Follow Us:
  • टाटा पंच ईव्ही फेसलिफ्ट लाँच
  • वेगवेगळ्या व्हेरिएंटमध्ये झाली लाँच
  • जाणून घ्या कोणत्या व्हेरिएंटमध्ये जास्त फीचर्स
भारतीय ऑटो बाजारात अनेक कार उत्पादक कंपन्या आहेत, ज्या बदलत्या काळानुसार त्यांच्या कार अपडेट करत असतात. नुकतेच टाटाने त्यांच्या लोकप्रिय इलेक्ट्रिक कारचे अपडेटेड व्हर्जन भारतात आणले आहे.

अलीकडेच, Tata Motors ने भारतात 2026 Tata Punch EV Facelift लाँच केली आहे. ही इलेक्ट्रिक मायक्रो एसयूव्ही आता नव्या डिझाइनसह आणि अपडेटेड फीचर्ससह बाजारात आली आहे. याची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 9.69 लाख रुपये असून टॉप व्हेरिएंटची किंमत 12.59 लाख रुपये एक्स-शोरूमपर्यंत जाते.

कंपनीने ही कार बॅटरी सबस्क्रिप्शन प्लॅनसहही सादर केली आहे. या प्लॅनअंतर्गत कारची किंमत 6.49 लाख रुपयांपासून सुरू होते, मात्र बॅटरीसाठी ग्राहकांना प्रति किलोमीटर 2.60 रुपये भाडे द्यावे लागेल. कमी सुरुवातीच्या खर्चात इलेक्ट्रिक कार खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी हा पर्याय फायदेशीर ठरू शकतो. चला तर मग, कोणत्या व्हेरिएंटमध्ये तुम्हाला जास्त फीचर्स मिळतात? त्याबद्दल जाणून घेऊयात.

पगार 40 हजार तर बिनधास्त डोळे झाकून खरेदी करा ‘या’ कार! सेफ्टी आणि परफॉर्मन्सची मिळेल हमी

बेस व्हेरिएंट ‘स्मार्ट’मध्ये काय खास?

2026 टाटा पंच EV चा बेस व्हेरिएंट ‘स्मार्ट’ या नावाने उपलब्ध आहे. या व्हेरिएंटमध्ये सेफ्टीला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. यात 6 एअरबॅग्स देण्यात आले आहेत, जे या सेगमेंटमध्ये महत्त्वाचे मानले जाते. याशिवाय हिल होल्ड असिस्ट, हाय बीम असिस्ट, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम (TPMS), आयएसओफिक्स चाइल्ड सीट माउंट, रिअर पार्किंग सेन्सर, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल (ESC) आणि ABS सोबत EBD असे फीचर्स देण्यात आले आहेत. त्यामुळे बेस मॉडेलही सुरक्षिततेच्या दृष्टीने मजबूत पर्याय ठरतो. बजेटमध्ये सुरक्षित इलेक्ट्रिक एसयूव्ही शोधणाऱ्यांसाठी हा चांगला पर्याय आहे.

Tata चा वेगळाच डाव! दाखवली खास AI आधारित टेक्नॉलॉजी, कारमध्ये मिळणार मोबाईलसारखी अपडेट सुविधा

अ‍ॅडव्हेंचर आणि एम्पावर्ड ट्रिममध्ये काय मिळते?

‘स्मार्ट प्लस’ व्हेरिएंटमध्ये काही अतिरिक्त फीचर्स देण्यात आले आहेत. यात डे-नाईट IRVM, रिअर व्ह्यू पार्किंग कॅमेरा आणि इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेकचा समावेश आहे. मात्र काही फीचर्स केवळ 40 किलोवॅट-तास बॅटरी असलेल्या मॉडेलमध्ये उपलब्ध आहेत. ‘अ‍ॅडव्हेंचर’ ट्रिममध्ये हिल डिसेंट कंट्रोल दिले आहे, जे उतारावर कार चालवताना मदत करते.

‘एम्पावर्ड’ ट्रिममध्ये रेन सेन्सिंग वायपर्स, रिअर वायपर, डिफॉगर आणि 360 डिग्री कॅमेरा मिळतो. टॉप मॉडेल ‘एम्पावर्ड+ S’ मध्ये ऑटो डिमिंग IRVM देखील देण्यात आले आहे.

जर तुम्हाला अधिक प्रगत फीचर्स आणि जास्त आराम हवा असेल, तर टॉप व्हेरिएंट अधिक योग्य पर्याय ठरू शकतो.

 

Web Title: Which variant of tata punch ev facelift will have the most features

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2026 | 07:44 PM

Topics:  

  • automobile
  • electric car
  • tata punch

संबंधित बातम्या

क्लासिक डिझाइन आणि हाय-टेक अंदाज; Royal Enfield ची पहिली e-bike, पाहा रेंज आणि भन्नाट फीचर्स
1

क्लासिक डिझाइन आणि हाय-टेक अंदाज; Royal Enfield ची पहिली e-bike, पाहा रेंज आणि भन्नाट फीचर्स

EMI फक्त 5000 रुपये! प्रत्येक मध्यम वर्गीय व्यक्तीला परवडेल ‘ही’ कार; किती कराल डाउन पेमेंट?
2

EMI फक्त 5000 रुपये! प्रत्येक मध्यम वर्गीय व्यक्तीला परवडेल ‘ही’ कार; किती कराल डाउन पेमेंट?

हायफाय टेक्नॉलॉजी आली अंगाशी! चीनमध्ये ड्रायव्हरलेस कारमुळे जोरदार राडा; एकाच वेळी थांबल्या 100 पेक्षा अधिक गाड्या
3

हायफाय टेक्नॉलॉजी आली अंगाशी! चीनमध्ये ड्रायव्हरलेस कारमुळे जोरदार राडा; एकाच वेळी थांबल्या 100 पेक्षा अधिक गाड्या

Toll Tax New Rule: कार मालकांनोsss जरा इकडे लक्ष द्या! 10 एप्रिल पासून ‘या’ लोकांना टोल नाक्यावर नो एंट्री
4

Toll Tax New Rule: कार मालकांनोsss जरा इकडे लक्ष द्या! 10 एप्रिल पासून ‘या’ लोकांना टोल नाक्यावर नो एंट्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.