
फोटो सौजन्य: Gemini
भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये अनेक उत्तम कंपन्या आहेत, ज्या बेस्ट कार ऑफर करत असतात. अशीच एक कंपनी म्हणजे Honda. होंडाने देशात अनेक उत्तम कार्स ऑफर केल्या आहेत. ग्राहक नेहमीच SUV विभागातील वाहनांना चांगला प्रतिसाद देत असतात. या सेगमेंटमध्ये कंपनीने Honda Elevate ऑफर केली आहे. नुकतेच या कारचे ADV Edition एडिशन देखील लाँच करण्यात आले आहे. चला जाणून घेऊयात की दोन लाखांच्या डाउन पेमेंटनंतर दरमहा तुम्हाला या कारसाठी किती EMI द्यावा लागेल?
अलिकडेच Honda Elevate SUV ADV Edition एडिशन लाँच केले आहे. कंपनी या मध्यम आकाराच्या एसयूव्हीचा बेस व्हेरिएंट 15.29 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत विकत आहे. जर ही कार दिल्लीमध्ये खरेदी तर 15.29 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीसह रजिस्ट्रेशन टॅक्स आणि आरटीओ शुल्क देखील भरावे लागेल. हे वाहन खरेदी करण्यासाठी 1.53 लाख रुपये आरटीओ आणि 69 हजार रुपये इंश्युरन्स द्यावे लागतील. टीसीएस शुल्क म्हणून 15290 रुपये देखील द्यावे लागतील. त्यानंतर या कारची ऑन-रोड किंमत 17.66 लाख रुपये होईल.
Honda Elevate SUV च्या ADV Edition ची खरेदी केल्यास बँक तुमच्यासाठी एक्स-शोरूम किंमत आधार मानूनच कर्ज उपलब्ध करून देईल. 2 लाख रुपये डाउन पेमेंट केल्यानंतर तुम्हाला सुमारे 15.66 लाख रुपये बँकेतून कर्ज घ्यावे लागतील. बँक जर तुम्हाला 9% व्याजदराने आणि 7 वर्षांच्या कालावधीसाठी 15.66 लाख रुपये कर्ज देते, तर पुढील सात वर्षे दर महिन्याला तुम्हाला 25,199 रुपयांचा EMI भरवा लागेल.
इतका कठोर निर्णय! Tata Punch चे ‘हे’ व्हेरिएंट कायमचे बंद, कंपनीच्या वेबसाईटवरूनही नावं गायब
जर तुम्ही 9% व्याजदराने, 7 वर्षांसाठी, 15.66 लाख रुपयेचे Car Loan घेतले, तर दर महिन्याला 25,199 रुपयांचा EMI सात वर्षे भरणे तुम्हाला बंधनकारक आहे. या कालावधीत तुम्ही एकूण सुमारे 5.50 लाख रुपये व्याजाच्या स्वरूपात भराल. त्यामुळे Honda Elevate च्या या नवीन एडिशनची एक्स-शोरूम + ऑन-रोड + व्याज मिळून एकूण किंमत साधारण 23.16 लाख रुपये इतकी पडेल.
Honda Elevate ला मिड-साइज SUV सेगमेंटमध्ये सादर केले आहे. या सेगमेंटमध्ये या कारची थेट स्पर्धा Hyundai Creta, Kia Seltos, Tata Harrier, Maruti Grand Vitara, आणि Toyota Urban Cruiser Hyryder अशा SUVs सोबत होते.