फोटो सौजन्य: Gemini
भारतीय ऑटो मार्केटमध्ये इलेक्ट्रिक वाहनांना जोरदार मागणी मिळताना दिसत आहे. ग्राहक देखील इंचावर चालणाऱ्या वाहनांपेक्षा पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहनांना आपला पाठिंबा दर्शवत आहे. या इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये Tata Motors ने सुद्धा दमदार कार ऑफर केल्या आहेत. कंपनीच्या अशाच एका इलेक्ट्रिक कारच्या मागणीत इतकी वाढ झाली आहे की त्याचा व्हेटिंग पिरियड वाढतच चालला आहे.
भारतीय वाहन निर्माता Tata Motors यांच्या फ्लॅगशिप इलेक्ट्रिक SUV Tata Harrier EV ची मागणी झपाट्याने वाढत आहे. जून 2025 मध्ये भारतात लाँच झाल्यापासून या SUV ने बाजारात आपली मजबूत पकड निर्माण केली आहे. सतत वाढत असलेल्या मागणीमुळे काही व्हेरिएंट्सचा व्हेटिंग पीरियड 8 ते 10 आठवडे इतका वाढला आहे.
इतका कठोर निर्णय! Tata Punch चे ‘हे’ व्हेरिएंट कायमचे बंद, कंपनीच्या वेबसाईटवरूनही नावं गायब
Tata Harrier EV चा व्हेटिंग पीरियड इतका वाढला आहे की विशेषतः हाय व्हेरिएंटसाठी ग्राहकांना जास्त प्रतीक्षा करावी लागत आहे. विशेषतः मिड-स्पेक Fearless+ आणि टॉप-स्पेक Empowered या व्हेरिएंट्ससाठी मागणी लक्षणीयरीत्या वाढली आहे. AC फास्ट चार्जर (ACFC) घेतला असो वा नसो, या दोन्ही व्हेरिएंट्सचा व्हेटिंग पीरियड 8 ते 10 आठवडे आहे.
Harrier EV च्या Stealth Edition ला देखील उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे. याचे आकर्षक आणि एक्सक्लूसिव डिझाइन पाहता ग्राहकांचा कल वाढला असून याचाही व्हेटिंग पीरियड इतर हाय व्हेरिएंट्ससारखाच आहे.
Mahindra XEV 9S ची पहिली झलक सबसे अलग! ‘या’ दिवशी होणार लाँच, Tata Curvv ला मिळणार जोरदार टक्कर
Tata Harrier EV मध्ये दोन बॅटरी पर्याय उपलब्ध आहेत:
दोन्ही बॅटरींसोबत एक रिअर-माउंटेड मोटर दिली आहे, जी 238hp आणि 315Nm आउटपुट देते.
टॉप-स्पेक Harrier EV Empowered 75 व्हेरिएंटमध्ये AWD (ऑल-व्हील-ड्राइव्ह) पर्याय देण्यात आला आहे. या मॉडेलमध्ये फ्रंट अॅक्सलवर अतिरिक्त मोटर दिली जाते, ज्यामुळे एकत्रित आउटपुट 313hp आणि 504Nm पर्यंत वाढतो.
भारतामध्ये Tata Harrier EV ची एक्स-शोरूम किंमत 21.49 लाख रुपये ते 30.23 लाख रुपये दरम्यान आहे. तसेच या सेगमेंटमध्ये या SUV ला Mahindra XEV 9e, BYD Atto 3 आणि Hyundai Creta EV सोबत जोरदार स्पर्धा करावी लागते.






