फोटो सौजन्य: Gemini
भारतातील ऑटो बाजारात Tata Motors च्या कार्सची एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळते. कंपनीने आतपर्यंत अनेक कार ऑफर केल्या आहेत, ज्या ग्राहकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. अशीच एक कार म्हणजे टाटा पंच. मात्र, कंपनीने या कारचे दोन व्हेरिएंट वेबसाईटवरून हटवले आहे. चला याबद्दल जाणून घेऊयात.
सणासुदीच्या काळात विक्रमी विक्री झाल्यानंतर, टाटा मोटर्स आता त्यांच्या प्रॉडक्ट लाइनअपमध्ये आणखी सुधारणा करत आहे. कंपनीने Punch, Nexon आणि Tiago एनआरजीचे काही व्हेरिएंट बंद केले आहेत. उत्पादन अधिक कार्यक्षम बनवणे आणि जास्त मागणी असलेल्या मॉडेल्ससाठी डिलिव्हरी टाइमलाइन कमी करणे हे यामागील उद्दिष्ट आहे. कोणत्या कारचे कोणते व्हेरिएंट यापुढे बाजारात उपलब्ध राहणार नाहीत त्याबद्दल जाणून घेऊयात.
नवीन Hero Xtreme 160R लवकरच होणार लाँच? मिळणार धमाकेदार लूक
टाटा पंच ही सध्या कंपनीची दुसरी सर्वाधिक विक्री होणारी कार आहे (ICE + EV मिळून). पंच चार मुख्य ट्रिममध्ये विकली जाते (प्युअर, ॲडव्हेंचर, अकम्प्लिश्ड आणि क्रिएटिव्ह). टाटाने आता ॲडव्हेंचर आणि ॲडव्हेंचर एस व्हेरिएंट लाइनअपमधून काढून टाकले आहेत.
टाटा पंच ॲडव्हेंचरमध्ये 3.5-इंच इन्फोटेनमेंट सिस्टम, स्टीअरिंग-माउंटेड कंट्रोल्स, सर्व पॉवर विंडो, रिअर एसी व्हेंट्स, फॉलो-मी-होम हेडलॅम्प, यूएसबी चार्जिंग पोर्ट आणि इलेक्ट्रिक ओआरव्हीएमएस सारख्या फीचर्ससह आले.
Mahindra XEV 9S ची पहिली झलक सबसे अलग! ‘या’ दिवशी होणार लाँच, Tata Curvv ला मिळणार जोरदार टक्कर
अॅडव्हेंचर एस मध्ये सनरूफ, ऑटो हेडलॅम्प, रेन-सेन्सिंग वायपर आणि उंची-अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट यासारख्या अतिरिक्त वैशिष्ट्यांचा समावेश होता. हे व्हेरिएंट बंद झाल्यानंतर, पंच आता डिलिव्हरी वेळ कमी करण्यासाठी टॉप व्हेरिएंटवर लक्ष केंद्रित करेल.
टाटा पंचची किंमत 5,49,990 (एक्स-शोरूम) पासून सुरू होऊन 9,30,390 (एक्स-शोरूम) रुपयांपर्यंत आहे. ही किंमत तुमच्या जवळील शोरुमनुसार बदलू शकते.






