फोटो सौजन्य: @BlueHyundaiBLR/X.com
भारतीय मार्केटमध्ये इलेक्ट्रिक वाहनांना चांगली मागणी मिळताना दिसत आहे. इंधनावर चालणाऱ्या वाहनांपेक्षा ग्राहक इलेक्ट्रिक वाहनांना जास्त प्राधान्य देत आहे. ग्राहकांच्या याच मागणीमुळे इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये अनेक ऑटो कंपन्या उत्तम रेंज देणाऱ्या कार ऑफर करत आहे.
ह्युंदाई ही देशातील आघाडीची कार उत्पादक कंपनी आहे. कंपनीच्या Creta कारला मार्केटमध्ये चांगली मागणी मिळते. कंपनीने या कारचे इलेक्ट्रिक व्हर्जन सुद्धा आणले आहे. जर तुम्हाला घर घ्यायचे असेल, तर 2 लाख रुपयांचे डाउन पेमेंट केल्यानंतर, 7 वर्षांसाठी तुम्हाला दरमहा किती ईएमआय भरावा लागेल. त्याबद्दल आपण जाणून घेऊयात.
Kawasaki Eliminator 400 चा नवा स्पेशल एडिशन लाँच, आता चक्क बाईकमध्ये मिळणार ड्युअल कॅमेरा
हुंडाईकडून Hyundai Creta Electric विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. याच्या Smart व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 19.98 लाख रुपये आहे. जर ही कार दिल्लीमध्ये खरेदी केली, तर अंदाजे 79 हजार रुपये इन्शुरन्ससाठी द्यावे लागतील. त्याशिवाय 19 हजार रुपये टीसीएस चार्ज म्हणून भरावे लागतील. या सर्वांसह याची ऑन-रोड किंमत सुमारे 19.97 लाख रुपये इतकी होते.
जर तुम्ही हुंडई क्रेटा इलेक्ट्रिकचा स्मार्ट व्हेरिएंट खरेदी केला तर बँक तुम्हाला फक्त एक्स-शोरूम किमतीवर फायनान्स करेल. अशा परिस्थितीत, 2 लाख रुपयांचे डाउन पेमेंट केल्यानंतर, तुम्हाला बँकेकडून सुमारे 17.97 लाख रुपयांची रक्कम फायनान्स करावी लागेल. जर बँक तुम्हाला सात वर्षांसाठी नऊ टक्के व्याजासह 17.97 लाख रुपये देत असेल, तर तुम्हाला पुढील सात वर्षांसाठी दरमहा फक्त 28924 रुपयांचा ईएमआय भरावा लागेल.
जर तुम्ही बँकेकडून सात वर्षांसाठी नऊ टक्के व्याजदराने 17.97 लाख रुपयांचे कार लोन घेतले तर तुम्हाला सात वर्षांसाठी दरमहा 28924 रुपयांचा ईएमआय भरावा लागेल. अशा परिस्थितीत, सात वर्षांत तुम्हाला Hyundai Creta Electric च्या स्मार्ट व्हेरिएंटसाठी सुमारे 6.31 लाख रुपये व्याज द्यावे लागेल. त्यानंतर तुमच्या कारची एकूण किंमत एक्स-शोरूम, ऑन रोड आणि व्याजासह सुमारे 26.29 लाख रुपये असेल.