
फोटो सौैजन्य: @Vinayak_ADX/ X.com
मारुती सुझुकीने विविध सेगमेंटमध्ये दमदार कार्स ऑफर केल्या आहेत. नुकतेच कंपनीने मिड साइझ एसयूव्ही सेगमेंटमध्ये Maruti Suzuki Victoris लाँच केली आहे. ही कार लाँच होताच मार्केटमध्ये सुपरहिट ठरली. जर तुम्ही या कारचे सीएनजी व्हर्जन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर चला जाणून घेऊयात 2 लाखांच्या डाउन पेमेंटनंतर तुम्हाला किती EMI द्यावा लागेल?
Hyundai Creta दारात उभी असेल! 3 लाखाच्या Down Payment नंतर ‘इतकाच’ असेल EMI?
Maruti Victoris अनेक व्हेरिएंटमध्ये ऑफर केली जाते. LXI ही त्याच्या CNG व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. या कारच्या CNG व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 11.50 लाख रुपये आहे. जर ही कार दिल्लीमध्ये खरेदी केले असेल तर आरटीओला अंदाजे 1.30 लाख रुपये आणि विम्यासाठी अंदाजे 35000 रुपये द्यावे लागतील. यासोबतच, टीसीएस शुल्क म्हणून 11499 रुपये देखील आकारले जातील. त्यानंतर मारुती व्हिक्टोरिसची ऑन-रोड किंमत सुमारे 13.26 लाख रुपये होते.
जर तुम्ही कारचा CNG व्हेरिएंट खरेदी करत असाल, तर बँक एक्स-शोरूम किंमतीवरच कर्ज मंजूर करेल. अशा परिस्थितीत, 2 लाख रुपये डाउन पेमेंट केल्यानंतर तुम्हाला सुमारे 11.26 लाख रुपये बँकेतून कर्ज घ्यावे लागतील. बँक जर तुम्हाला 9% व्याजदराने 7 वर्षांसाठी हे कर्ज मंजूर करत असेल, तर पुढील सात वर्षांपर्यंत तुम्हाला दर महिन्याला 18,123 रुपयांचा EMI भरवा लागेल.
ग्राहकांनो ‘या’ 2 Electric Cars ने तुमचं काय बिघडवलं! 30 दिवसात फक्त मोजून 1 कारची झाली विक्री
जर तुम्ही 9% व्याजदरासह सात वर्षांसाठी 11.26 लाख रुपये कार लोन घेतले, तर तुम्हाला सात वर्षे दर महिन्याला 18,123 रुपयांचा EMI भरावा लागेल. या हिशोबानुसार, तुम्ही एकूण सुमारे 3.95 लाख रुपये फक्त व्याज म्हणून भराल. यामुळे Maruti Victoris CNG ची एक्स-शोरूम किंमत, ऑन-रोड खर्च आणि व्याज मिळून तुमच्या कारची एकूण किंमत सुमारे 17.22 लाख रुपये इतकी होईल.