फोटो सौजन्य: @RenaultIndia/X.com
भारतात कार खरेदी करणे म्हणजे आयुष्यातील अनेक आनंदाच्या क्षणांपैकी एक क्षण. कार खरेदीचे हेच सुखद स्वप्न अनुभवण्यासाठी अनेक जण दिवस-रात्र काम करत असतात. मात्र, कोणती कार खरेदी करावी? हा प्रश्न नेहमीच वाहन खरेदीदारांच्या मनात असतो.
भारतात अनेक ऑटो कंपन्या आहेत. अशीच एक कंपनी म्हणजे Renault. कंपनीने रेनॉल्ट ट्रायबर ही बजेट एमपीव्ही सेगमेंटमध्ये उपलब्ध करून दिली आहे. जर तुम्ही या कारचा बेस व्हेरिएंट खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर 2 लाखांच्या डाउन पेमेंट भरल्यानंतर या कारसाठी तुम्हाला किती EMI द्यावा लागेल? त्याबद्दल आपण जाणून घेऊयात.
2024 मध्ये रेनॉल्ट ट्रायबरचे नवीन व्हर्जन सादर केले होते. या एमपीव्हीच्या बेस व्हेरिएंटची किंमत 5.76 लाख आहे. जर तुम्ही दिल्लीमध्ये खरेदी केली असेल, तर तुम्हाला आरटीओ शुल्कासाठी अंदाजे 23 हजार आणि इंश्युरन्ससाठी 28 हजार द्यावे लागतील. यामुळे रेनॉल्ट ट्रायबर ऑथेंटिकची ऑन-रोड किंमत अंदाजे 6.27 लाख रुपये होईल.
जर तुम्ही या कारचा Authentic व्हेरिएंट खरेदी करत असाल, तर बँक एक्स-शोरूम किंमतीवरच फायनान्स देईल. अशा परिस्थितीत 2 लाख रुपये डाउन पेमेंट केल्यानंतर तुम्हाला सुमारे 4.27 लाख रुपये बँकेतून फायनान्स घ्यावे लागतील. बँक जर तुम्हाला 9% व्याजदराने 7 वर्षांसाठी 4.27 लाख रुपये कर्ज देते, तर तुम्हाला पुढील 7 वर्षे दरमहा 6877 रुपये EMI भरावा लागेल.
जर तुम्ही 9% व्याजदराने 7 वर्षांसाठी 4.27 लाख रुपयांचे Car Loan घेतले, तर दरमहा 6877 रुपये EMI द्यावी लागेल. अशा प्रकारे 7 वर्षांत तुम्ही Renault Triber Authentic साठी सुमारे 1.50 लाख रुपये व्याज भराल. त्यामुळे कारची एकूण किंमत मिळून अंदाजे 7.77 लाख रुपये इतकी होईल.
Toyota Kirloskar Motor च्या वाहनांना ग्राहकाचा कसा प्रतिसाद? सप्टेंबर 2025 मध्ये किती वाहनं विकली?
रेनॉल्ट ट्रायबरला बजेट एमपीव्ही म्हणून ऑफर करते. ही कार Maruti Ertiga, आणि Kia Carens सारख्या बजेट एमपीव्हीशी थेट स्पर्धा करेल. याला एन्ट्री-लेव्हल एसयूव्हींकडूनही स्पर्धा करावी लागते.