Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

फोर्स मोटर्सकडून भारतात २,००,००० वे मर्सिडीज-बेंझ इंजिन सादर

फोर्स मोटर्सने मर्सिडीज-बेंझसोबतच्या सहकार्यातून पुण्याच्या चाकण प्लांटमध्ये २,००,००० व्या इंजिनची निर्मिती करून एक ऐतिहासिक मैलाचा दगड पार केला आहे; हे विशेष ६-सिलिंडर एम२५६ इंजिन मर्सिडीज-बेंझ जीएलएस ४५० या मॉडेलमध्ये बसवण्यात आले आहे. ही भागीदारी भारतातील 'मेक इन इंडिया' आणि जागतिक दर्जाच्या ऑटोमोटिव्ह इंजिनिअरिंगचे एक उत्तम

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jun 18, 2026 | 04:20 PM
फोर्स मोटर्सकडून भारतात २,००,००० वे मर्सिडीज-बेंझ इंजिन सादर
Follow Us
Follow Us:

मुंबई, १८ जून २०२६: फोर्स मोटर्स लिमिटेडने आज पुण्‍यातील चाकण येथील आपल्या अत्याधुनिक इंजिन निर्मिती प्‍लांटमधून २,००,००० वे इंजिनच्या रोल-आऊटची घोषणा केली. मर्सिडीज-बेंझसोबत त्यांच्या उत्पादन सहयोगातील हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण टप्पा आहे.

इंजिन निर्मितीच्या क्षेत्रात फोर्स मोटर्स आणि मर्सिडीज-बेंझ यांच्यातील सहयोग १९९७ पासून सुरू झाला आहे आणि आता त्याचे रूपांतर एका व्यापक भागीदारीत झाले आहे. यामध्ये भारतात तयार होणाऱ्या मर्सिडीज-बेंझच्या सर्व कार आणि एसयूव्‍हींसाठी इंजिन आणि अॅक्सल्स तयार करण्याचा समावेश आहे.

२,००,००० व्या इंजिनचे हे संपादन विश्वास, तांत्रिक उत्कृष्टता, सामायिक मूल्ये आणि भारतातील उत्पादन क्षमता वाढवण्याच्या परस्पर कटिबद्धतेवर आधारलेले नाते अधोरेखित करतो. फोर्स मोटर्सने उत्पादित केलेले हे विशेष २,००,००० वे ६-सिलिंडर एम२५६ इंजिन मर्सिडीज-बेंझ जीएलएस ४५० या मॉडेलमध्ये बसवण्यात आले आहे.

फुल चार्जवर 926 किमीची रेंज! Mercedes-Benz च्या ‘या’ खास कारचा फेसलिफ्ट मॉडेल लाँच

या महत्त्वपूर्ण टप्‍प्‍याचे महत्त्व आणि मर्सिडीज-बेंझसोबत दीर्घकालीन सहयोगाबाबत मत व्‍यक्त करत फोर्स मोटर्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक प्रसन फिरोदिया म्हणाले, “मर्सिडीज-बेंझ भारतात आपला विस्तार करत असताना फोर्स मोटर्स सर्वोत्तम उत्पादन क्षमता, उत्कृष्ट कार्यपद्धती आणि भारतात जागतिक दर्जाच्या ऑटोमोटिव्ह घटकांच्या निर्मितीमध्ये योगदान देऊन त्यांच्या या वाढीला पाठबळ देण्यासाठी कटिबद्ध आहे. २,००,००० वे इंजिन हा केवळ उत्पादनाचा आकडा किंवा मैलाचा दगड नाही, तर विश्वास, अचूकता आणि सामायिक उद्दिष्टावर आधारलेल्या अर्ध्या शतकाच्या सहयोगाची गाथा आहे. फोर्स मोटर्सचा चाकण येथील प्‍लांट मर्सिडीज-बेंझच्या जागतिक मानकांची तंतोतंत पूर्तता करण्यासाठी खास उभारण्‍यात आला आहे. या प्‍लांटमधून बाहेर पडणारे प्रत्येक इंजिन फोर्स मोटर्सच्या इंजिनिअरिंग एक्सलन्स (अभियांत्रिकी उत्कृष्टता) आणि मॅन्युफॅक्चरिंग प्रिसिजन (उत्पादनातील अचूकता) प्रती असलेल्या अढळ कटिबद्धतेचे प्रतीक आहे. ही कटिबद्धता जवळपास २,००,००० वेळा यशस्वीपणे पाळणे, हा आमच्यासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे.”

हा ऐतिहासिक टप्पा केवळ प्‍लांटपर्यंत मर्यादित नसून त्याचे महत्त्व त्यापलीकडे देखील आहे. फोर्स मोटर्स आणि मर्सिडीज-बेंझ यांच्यातील हे नाते भारत-जर्मन औद्योगिक सहयोगाचे एक अत्यंत महत्त्वपूर्ण उदाहरण आहे, ज्याने भारतातील ऑटोमोटिव्ह उत्पादनाचे निकष शांतपणे आणि सातत्याने उंचावले आहेत. ऑटोमोटिव्ह क्षेत्र झपाट्याने बदलत असलेल्या आजच्या काळात, जिथे जागतिक पुरवठा साखळी प्रामुख्याने विश्वासार्हता, गुणवत्ता, अचूकता आणि जवळीक शोधत आहे, तिथे ‘मेक इन इंडिया’ संकल्पनेला अनुसरून भारतामध्‍ये जर्मन दर्जाचे इंजिनिअरिंग देण्याची फोर्स मोटर्सची ही क्षमता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर वाखाणण्याजोगी व आदर्श आहे.

‘मेक इन इंडिया’ मुळे मागच्या दशकभारत ऑटोमोबाईल उद्योगाला नेमका काय फायदा झाला? सविस्तरपणे जाणून घ्या

फोर्स मोटर्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक प्रसन फिरोदिया आणि मर्सिडीज-बेंझ एजीच्या व्यवस्थापन मंडळाचे सदस्य समाविष्ट असलेल्या मर्सिडीज-बेंझच्या एका उच्चस्तरीय शिष्टमंडळाच्या उपस्थितीत हा ऐतिहासिक टप्पा साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. जोर्ग बुर्झर, व्यवस्थापन मंडळाचे सदस्य, मर्सिडीज-बेंझ ग्रुप एजी. चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर, डेव्‍हलपमेंट अँड प्रोक्‍युरमेंट, मथायस गायसेन, व्यवस्थापन मंडळाचे सदस्य, मर्सिडीज-बेंझ ग्रुप एजी. सेल्‍स अँड कस्‍टमर एक्‍स्‍पीरिअन्‍स, मायकेल शिबे, व्यवस्थापन मंडळाचे सदस्य, मर्सिडीज-बेंझ ग्रुप एजी. प्रॉडक्‍शन, क्‍वॉलटी अँड सप्लाय चेन मॅनेजमेंट आदी मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी दोन्ही कंपन्यांचे इतर मान्यवर आणि पाहुणे उपस्थित होते, ज्यामध्ये प्रामुख्याने मर्सिडीज-बेंझ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ संतोष अय्यर, मर्सिडीज-बेंझ इंडियाचे कार्यकारी संचालक आणि ऑपरेशन्स प्रमुख व्यंकटेश कुलकर्णी आणि फोर्स मोटर्स लिमिटेडचे ऑपरेशन्‍सचे कार्यकारी संचालक प्रशांत इनामदार यांचा समावेश होता.

Web Title: Force motors presented 200000th mercedes benz engine auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2026 | 04:20 PM

Topics:  

  • automobile
  • Mercedes car

संबंधित बातम्या

निसान मॅग्नाइट vs महिंद्रा  XUV300; पेट्रोलमध्ये कोण देते जास्त मायलेज? प्रत्यक्ष टेस्टमध्ये समोर आलं सत्य!
1

निसान मॅग्नाइट vs महिंद्रा  XUV300; पेट्रोलमध्ये कोण देते जास्त मायलेज? प्रत्यक्ष टेस्टमध्ये समोर आलं सत्य!

अप्रिलिया ट्यूनो 457 vs GT 650; ₹4 लाखांच्या आसपासची लढाई; कोणती बाइक ठरते बॉस?
2

अप्रिलिया ट्यूनो 457 vs GT 650; ₹4 लाखांच्या आसपासची लढाई; कोणती बाइक ठरते बॉस?

फुल चार्जमध्ये 212km! पेट्रोलचा खर्च विसरा! फक्त 18 पैसे/km खर्च! जाणून घ्या 10 लाख कस्टमर्सनी का निवडला TVS iQube?
3

फुल चार्जमध्ये 212km! पेट्रोलचा खर्च विसरा! फक्त 18 पैसे/km खर्च! जाणून घ्या 10 लाख कस्टमर्सनी का निवडला TVS iQube?

फुल चार्जमध्ये 150+km रेंज! 6 कलर ऑप्शनसह फक्त ₹66,499 मध्ये मिळते ही इलेक्ट्रिक स्कूटर
4

फुल चार्जमध्ये 150+km रेंज! 6 कलर ऑप्शनसह फक्त ₹66,499 मध्ये मिळते ही इलेक्ट्रिक स्कूटर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.