
जगातील सर्वात वेगवान आणि तांत्रिकदृष्ट्या प्रगत मोटरस्पोर्ट कार म्हणजे फॉर्म्युला वन (F1) ही कार. टीव्हीवर अवघ्या काही सेकंदांत 300 किमी/तासाहून अधिक वेगाने धावणारी ही कार पाहताना अनेकांच्या मनात प्रश्न येत असेल कि– “ही कार बनवण्यासाठी किती खर्च येत असावा?”
आजच्या आधुनिक F1 कारची किंमत साधारणपणे 12 ते 20 दशलक्ष अमेरिकन डॉलर (जवळपास 100 ते 170 कोटी रुपये) इतकी असते. काही तज्ज्ञांच्या अंदाजानुसार अत्याधुनिक कारची एकूण किंमत 20 दशलक्ष डॉलरपेक्षाही जास्त जाऊ शकते.
तरुणाईला भुरळ घालणाऱ्या रेसिंग कार्स का असतात एवढ्या खास? जाणून घ्या …
F1 कार इतकी महाग असण्याचे मुख्य कारण म्हणजे तिच्यामध्ये वापरले जाणारे हायटेक तंत्रज्ञान. कारचा कार्बन फायबर मोनोकोक (चेसिस) तयार करण्यासाठी लाखो डॉलर खर्च होतात. हा भाग अतिशय मजबूत आणि हलका असतो, ज्यामुळे चालकाचे संरक्षण होते.
याशिवाय 1.6 लिटर टर्बो-हायब्रिड पॉवर युनिट, एनर्जी रिकवरी सिस्टम (ERS), गिअरबॉक्स, एरोडायनॅमिक विंग्स, ब्रेक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स यांसारखे घटकही अतिशय महागडे असतात. विशेषतः इंजिन आणि हायब्रिड सिस्टम कारच्या एकूण किमतीतील सर्वात मोठा हिस्सा व्यापतात.
विजेसारखा वेग अन् अपघाताचा धोका असूनही ‘फॉर्म्युलावन’मध्ये एअरबॅग का …
केवळ कार तयार करणेच नव्हे, तर संपूर्ण वेळ तिच्यावर सतत संशोधन, चाचण्या आणि सुधारणा केल्या जातात. त्यामुळे एका F1 टीमचा वार्षिक खर्च शेकडो दशलक्ष डॉलरपर्यंत पोहोचू शकतो.
म्हणूनच F1 कार ही केवळ एक रेसिंग कार नसून अभियांत्रिकी, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा सर्वोच्च नमुना मानली जाते. तिच्या वेगामागे केवळ चालकाचे कौशल्य नसून शेकडो अभियंते, वैज्ञानिक आणि कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक दडलेली असते.