Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 16 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘Freelander 8’ च्या हायटेक इंटीरियरची पहिली झलक समोर! अत्याधुनिक फीचर्ससह लग्जरी फिनिशिंग! घ्या पाहून

चेरी-जेएलआरने आपल्या आगामी 'Freelander 8' प्रीमियम एसयूव्हीचे हायटेक इंटीरियर सादर केले असून, यात ४६.३ इंचाचा प्रचंड 8K डिस्प्ले आणि हुवावेचे ड्रायव्हिंग तंत्रज्ञान देण्यात आले आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jul 16, 2026 | 05:42 PM
‘Freelander 8’ च्या हायटेक इंटीरियरची पहिली झलक समोर! अत्याधुनिक फीचर्ससह लग्जरी फिनिशिंग! घ्या पाहून
Follow Us
Follow Us:

‘चेरी-जेएलआर’ कंपनीने आपल्या मोस्ट अवेटेड ‘Freelander 8’ या प्रीमियम एसयूव्हीच्या इंटीरियरची पहिली अधिकृत झलक सादर केली आहे. या वर्षाच्या शेवटी चीनच्या बाजारपेठेत प्रवेश करण्यापूर्वी या कारच्या केबिनचे लूक समोर आले आहे. ही गाडी नवनवीन तंत्रज्ञानाने सुसज्ज असून, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या कारच्या प्लॅटफॉर्मचा प्रभाव टाटा मोटर्सच्या आगामी ‘Tata Avinya EV’ सिरीजवर पाहायला मिळू शकतो, असे संकेत काही रिपोर्ट्समधून मिळाले आहेत, आणि बोललं जात आहे.

केबिनमध्ये ४६.३ इंचाचा मोठा 8K डिस्प्ले

इतर प्रीमियम एसयूव्हींप्रमाणे डॅशबोर्डवर वेगवेगळ्या स्क्रीन लावण्याऐवजी, ‘Freelander 8’ मध्ये एक अतिशय मिनिमलिस्टिक रचना करण्यात आली आहे.

  • डॅशबोर्डवर डावीकडून उजवीकडे पसरलेला ४६.३ इंचाचा प्रचंड 8K पॅनोरामिक डिस्प्ले देण्यात आला आहे.
  • इन्फोटेनमेंट आणि कारच्या इतर फंक्शन्ससाठी मध्यभागी वेगळी १५.६ इंचाची टचस्क्रीन आहे.
  • डॅशबोर्डच्या ‘ब्रिज-इन्स्पायर्ड’ रचनेमुळे सेंटर कन्सोलच्या खाली सामान ठेवण्यासाठी स्टोरेज स्पेस मिळते.
महिंद्राच्या चाकणमधील कारखान्यातून ३० लाख वाहनांचे उत्पादन पूर्ण, ‘BE 6’ च्या रोल-आउटसह ऐतिहासिक विक्रम पूर्ण

लक्झरी घड्याळांप्रमाणे फिजिकल बटन्स आणि क्रिस्टल नोब्स

आजकालच्या बहुतांश गाड्यांमधून बटन्स गायब होत असताना, चेरी-जेएलआरने मात्र ग्राहकांच्या सोयीसाठी महत्त्वाचे फिजिकल बटन्स तसेच ठेवले आहेत.

  • या बटन्सवर स्विस लक्झरी घड्याळांवर असते तशी ‘Clous de Paris’ पॅटर्नची फिनिशिंग दिली आहे. आणि ही कारची अजून एक खासियत म्हणून याकडे पाहिलं जात आहे.
  • कारच्या सेंटर कन्सोलवर फिरणारे रोटरी कंट्रोल्स असून, ते ‘K9 ऑप्टिकल क्रिस्टल’पासून बनवले आहेत. त्याभोवती २५६ रंगांची ॲम्बियंट लायटिंग दिली आहे.
ड्रायव्हर आणि सहप्रवाशासाठी खास डिझाइन

कारच्या पुढच्या सीटिंग एरियामध्ये दोन्ही प्रवाशांना वेगळा अनुभव मिळेल,

  • ड्रायव्हर सीट: ड्रायव्हरची सीट अशा प्रकारे डिझाइन केली आहे, जेथून रस्त्याचे उत्तम दृश्य आणि उंचावरून गाडी चालवल्याचा अनुभव मिळेल.
  • पॅसेंजर सीट: पुढील सहप्रवाशाच्या सीटला आरामाच्या दृष्टीने जास्त प्राधान्य दिले आहे. इथे १,२०० मिमीचा खूप मोठा लेगरूम मिळतो, ज्यामुळे ६ फुटांपेक्षा जास्त उंचीची व्यक्तीही पाय पसरून बसू शकते. तसेच सहप्रवाशासाठी स्वतंत्र डिस्प्ले आणि गाडीत सुगंध देणारी इन-बिल्ट फ्रॅग्रन्स सिस्टीम दिली आहे.
लुकमध्ये खतरनाक अन् थारपेक्षाही भारी; पाहा Chery iCar V25 चा जलवा! लवकरच मार्केटमध्ये येण्याची शक्यता

हुवावे आणि स्नॅपड्रॅगनचे अत्याधुनिक तंत्रज्ञान

तंत्रज्ञानाच्या बाबतीत ही कार खूप पुढे आहे,

  • यात Huawei Qiankun ADS 5.0 ही अत्याधुनिक इंटेलिजंट ड्रायव्हिंग असिस्टन्स सिस्टीम (ADAS) कारच्या सर्व व्हेरिएंट्समध्ये स्टँडर्ड म्हणून दिली जाईल.
  • कारमधील डेटा प्रोसेसिंग वेगाने होण्यासाठी यात लेटेस्ट Qualcomm Snapdragon 8397 ऑटोमोटिव्ह चिप वापरण्यात आली आहे.
  • ही कार ८००-व्होल्टच्या इलेक्ट्रिकल आर्किटेक्चरवर आधारित असून, यात CATL कंपनीच्या सहकार्याने विकसित केलेली ‘Freevoy’ रेंज-एक्सटेंडर हायब्रिड बॅटरी दिली आहे. तसेच यात हुवावेची ‘i-ATS’ इंटेलिजंट ऑल-टेरेन सिस्टीम देखील समाविष्ट आहे. खास म्हणजे यात ऑफ रोडींग ही समाविष्ट आहे.
टाटा अविन्या वर काय होणार परिणाम?

ऑटोमोबाईल जगतातील चर्चांनुसार, ज्या प्लॅटफॉर्मवर ही ‘Freelander’ रेंज तयार होत आहे, त्याच प्लॅटफॉर्मचा वापर टाटा मोटर्स आपल्या आगामी ‘Avinya EV’ गाड्यांसाठी करणार आहे. त्यामुळे आता ‘Freelander 8’ चे हे हायटेक इंटीरियर आणि केबिन डिझाईन टाटाच्या आगामी आलिशान इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये पाहायला मिळणार का, याकडे भारतीय ऑटोमोबाईल प्रेमींचे लक्ष लागले आहे.

 

Web Title: Freelander 8 advanced interior visuals automobile news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2026 | 05:42 PM

Topics:  

  • automobile

संबंधित बातम्या

बुलेट प्रेमींसाठी खुशखबर! RE रॉयल एनफिल्ड क्लासिक 350 2026, नवीन फीचर्ससह लाँच, किंमत ₹1.87 लाखांपासून सुरु
1

बुलेट प्रेमींसाठी खुशखबर! RE रॉयल एनफिल्ड क्लासिक 350 2026, नवीन फीचर्ससह लाँच, किंमत ₹1.87 लाखांपासून सुरु

महिंद्राच्या चाकणमधील कारखान्यातून ३० लाख वाहनांचे उत्पादन पूर्ण, ‘BE 6’ च्या रोल-आउटसह ऐतिहासिक विक्रम पूर्ण
2

महिंद्राच्या चाकणमधील कारखान्यातून ३० लाख वाहनांचे उत्पादन पूर्ण, ‘BE 6’ च्या रोल-आउटसह ऐतिहासिक विक्रम पूर्ण

भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्र होतोय ‘आत्मनिर्भर’! सुट्या भागांच्या स्थानिक उत्पादनासाठी ‘ऑटो पीएलआय’ योजनेचा निधी केला दुप्पट!
3

भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्र होतोय ‘आत्मनिर्भर’! सुट्या भागांच्या स्थानिक उत्पादनासाठी ‘ऑटो पीएलआय’ योजनेचा निधी केला दुप्पट!

विदेशी कार कंपन्यांसाठी भारताची ‘टॅरिफ पॉलिसी’ काय आहे? गाड्या आयात करण्यासाठी जास्त शुल्क, तर फॅक्टरी सुरु करण्यासाठी सवलती!
4

विदेशी कार कंपन्यांसाठी भारताची ‘टॅरिफ पॉलिसी’ काय आहे? गाड्या आयात करण्यासाठी जास्त शुल्क, तर फॅक्टरी सुरु करण्यासाठी सवलती!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.