Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 15 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Freelander 8 ची चीनमध्ये 19 सप्टेंबरपासून डिलिव्हरी सुरु! लॉन्चनंतर 12 तासांत मिळाले 5000 पेक्षा जास्त ऑर्डर्स

चेरी जग्वार लँड रोव्हरची फ्रीलँडर 8 चीनमध्ये 19 सप्टेंबरपासून ग्राहकांना मिळण्यास सुरुवात होणार आहे. या एसयूव्हीमध्ये 60.3 kWh बॅटरी, ड्युअल-मोटर फोर-व्हील-ड्राइव्ह आणि 818 hp पॉवर देण्यात आली आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Sep 15, 2026 | 09:11 PM
Freelander 8 ची चीनमध्ये 19 सप्टेंबरपासून डिलिव्हरी सुरु! लॉन्चनंतर 12 तासांत मिळाले 5000 पेक्षा जास्त ऑर्डर्स
Follow Us
Follow Us:
  • फ्रीलँडर 8 ला लॉन्चनंतर अवघ्या 12 तासांत चीनमध्ये 5000 पेक्षा जास्त पक्के ऑर्डर्स मिळाले आहेत.
  • या एसयूव्हीमध्ये 60.3 kWh बॅटरी असून 800V प्लॅटफॉर्ममुळे जलद चार्जिंगची सुविधा मिळते.
  • ड्युअल-मोटर फोर-व्हील-ड्राइव्ह सिस्टम 818 hp पॉवर आणि 813 Nm टॉर्क तयार करते.
लग्झरी एसयूव्ही सेगमेंटमध्ये दमदार एन्ट्री करणारी चेरी जग्वार लँड रोव्हरची फ्रीलँडर 8 सध्या चर्चेत आहे. चीनमध्ये 3 सप्टेंबर रोजी लॉन्च झालेल्या या एसयूव्हीची अधिकृत डिलिव्हरी 19 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. विशेष म्हणजे लॉन्चनंतर अवघ्या 12 तासांत या कारला 5000 पेक्षा जास्त पक्के ऑर्डर्स मिळाले. चीनमध्ये फ्रीलँडर 8 ची किंमत 289,900 ते 379,900 युआन दरम्यान आहे.

बॉक्सी डिझाइन आणि आलिशान केबिन

फ्रीलँडर 8 चे डिझाइन कंपनीच्या बॉक्सी स्टाइलवर आधारित असून ते कॉन्सेप्ट 97 पासून प्रेरित आहे. समोर रेक्टेंगुलर हेडलाइट्स आणि क्लोज्ड-ऑफ फ्रंट दिल्यामुळे कारला आधुनिक इलेक्ट्रिक एसयूव्हीसारखा लूक मिळतो. तिची लांबी 5118 mm, रुंदी 2050 mm, उंची 1898 mm आणि व्हीलबेस 3040 mm आहे. आतमध्ये 46.3-इंच पॅनोरमिक डिस्प्ले आणि 15.6-इंच सेंट्रल स्क्रीन देण्यात आली आहे. दुसऱ्या रोमधील जीरो-ग्रॅविटी सीट्समध्ये हीटिंग, व्हेंटिलेशन आणि मसाज फंक्शनही मिळते.

Mahindra XUV 7XO Sales: महिंद्रा XUV 7XO ने लाँच झाल्यानंतर अवघ्या ७ महिन्यांतच गाठला ७०,००० युनिट्स विक्रीचा टप्पा

हुआवेईच्या तंत्रज्ञानाचा वापर

या एसयूव्हीमध्ये रूफ-माउंटेड LiDAR सेंसर असून सर्व व्हेरिएंटमध्ये हुआवेई कियानकून ADS 5.0 इंटेलिजेंट ड्रायव्हिंग सिस्टम देण्यात आली आहे. ही प्रणाली क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8397 चिपवर काम करते. हुआवेईसोबत विकसित केलेले i-ATS इंटेलिजेंट ऑल-टेरेन सिस्टम हेही आकर्षण आहे. यामध्ये 20 टेरेन मोड्स आणि फ्रंट, सेंटर व रिअर लॉकिंग डिफरेंशियल देण्यात आले आहेत.

Jawa 42 Bobber VS Royal Enfield Himalayan 450? कोणती बाइक आहे तुमच्यासाठी योग्य?

818 एचपीची ताकद

फ्रीलँडर 8 मध्ये 800V हाय-व्होल्टेज रेंज-एक्स्टेंडेड प्लॅटफॉर्म वापरण्यात आला आहे. 60.3 kWh कॅटल टर्नरी लिथियम बॅटरी 310 km ची CLTC इलेक्ट्रिक रेंज देते. बॅटरी 20% ते 80% पर्यंत चार्ज करण्यासाठी फक्त 12 मिनिटे लागतात, असा दावा आहे. 1.5-लिटर 4-सिलिंडर रेंज एक्स्टेंडर आणि ड्युअल-मोटर फोर-व्हील-ड्राइव्ह मिळून 818 hp पॉवर आणि 813 Nm टॉर्क देतात. 0-100 km/h वेग गाठण्यासाठी या एसयूव्हीला केवळ 4.6 सेकंद लागतात. त्यामुळे लक्झरीसोबत वेग आणि नव्या टेक्नोलॉजीचा दमदार मेळ या कारमध्ये पाहायला मिळतो.

Web Title: Freelander 8 china delivery price features orders auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2026 | 09:11 PM

Topics:  

  • automobile
  • China

संबंधित बातम्या

Jawa 42 Bobber VS Royal Enfield Himalayan 450? कोणती बाइक आहे तुमच्यासाठी योग्य?
1

Jawa 42 Bobber VS Royal Enfield Himalayan 450? कोणती बाइक आहे तुमच्यासाठी योग्य?

होंडा युनिकॉर्नसाठी कोणती Accessories किती रुपयांना? पाहा संपूर्ण यादी
2

होंडा युनिकॉर्नसाठी कोणती Accessories किती रुपयांना? पाहा संपूर्ण यादी

प्रीमियम इलेक्ट्रिक बाइक घ्यायचीय तेही 2 ते 3 लाखांच्या बजेटमध्ये? Ola ते Royal Enfieldच्या या बाइक्सची किंमत आहे परवडणारी
3

प्रीमियम इलेक्ट्रिक बाइक घ्यायचीय तेही 2 ते 3 लाखांच्या बजेटमध्ये? Ola ते Royal Enfieldच्या या बाइक्सची किंमत आहे परवडणारी

Space War : पृथ्वीवर नाही, आता अंतराळातही महासंग्रामाची तयारी? चीन-अमेरिका आमनेसामने
4

Space War : पृथ्वीवर नाही, आता अंतराळातही महासंग्रामाची तयारी? चीन-अमेरिका आमनेसामने

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.