
युनिकॉर्नसाठी स्वस्त Accessories
होंडा युनिकॉर्नसाठी Rear License Plate Case ची किंमत ₹100 आहे, तर Front License Plate Case ₹105 मध्ये मिळतो. बाइकला धूळ आणि उन्हापासून वाचवण्यासाठी Black Body Cover ₹471 आणि Silver Body Cover ₹401 मध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे वापरानुसार मालकाला रंगाचा पर्यायही निवडता येतो.\
Honda City CVT Real Mileage: होंडा सिटी CVT किती मायलेज देते? रिअल-वर्ल्ड टेस्टमध्ये समोर आला आकडा
सीटचे संरक्षण करण्यासाठी Premium Seat Cover ₹473 मध्ये मिळतो, तर Black आणि Grey Seat Cover ची किंमत ₹318 आहे. फ्युल टँकभोवती संरक्षण आणि छोट्या वस्तू ठेवण्यासाठी Tank Cover देण्यात आला आहे. त्याची किंमत ₹426 आहे. या कव्हरमध्ये कागदपत्रे किंवा इतर लहान वस्तू ठेवण्यासाठी स्टोरेज स्पेस मिळते.
Engine Guard आणि Handlebar Grip
बाइकला जास्त सेफ्टी देण्यासाठी Front Pipe म्हणजेच Engine Guard उपलब्ध आहे. त्याची किंमत ₹932 आहे. पार्किंगदरम्यान किंवा कमी वेगात बाइकचा तोल गेल्यास हा गार्ड बाइकच्या काही भागांना आणि रायडरच्या पायांना संरक्षण देण्यास मदत करू शकतो. Handlebar Grip ची किंमत प्रति युनिट ₹61 आहे.
होंडाच्या 4 प्रीमियम पण परवडणाऱ्या बाईक्स याच वर्षी भारतात होणार लॉन्च! आत्ताच घ्या जाणून
सर्व Accessories घेणे किती महाग?
युनिकॉर्नच्या दिलेल्या अधिकृत अॅक्सेसरीजपैकी सर्व पर्याय एकत्र घेतले तरी एकूण खर्च ₹3,287 इतका होतो. म्हणजेच बाइकच्या किमतीच्या तुलनेत हा खर्च तुलनेने कमी आहे. रोजच्या वापरात बाइकचे संरक्षण आणि कम्फर्ट वाढवायचा असेल तर Engine Guard, Body Cover आणि Seat Cover हे उपयोगी पर्याय ठरू शकतात. नेव्हिगेशनसाठी बाइकमध्ये 15W USB-C पोर्ट स्टँडर्ड मिळतो; फोन सुरक्षितपणे लावण्यासाठी मात्र वेगळा फोन होल्डर घ्यावा लागू शकतो.