सर्वात स्वस्त किमतीची हार्ले डेव्हिडसन (फोटो सौजन्य - बाईकवाले)
हार्ले-डेव्हिडसन आतापर्यंत तिच्या हाय-एंड आणि प्रीमियम बाइक्ससाठी ओळखली जात होती, परंतु आता कंपनी एक नवीन पाऊल उचलणार आहे. हार्ले डेव्हिडसन यावेळी बजेट रेंजमध्ये एक नवीन मोटरसायकल स्प्रिंट लाँच करण्याची तयारी करत आहे. ही बाईक विशेषतः नवीन आणि तरुण रायडर्सना लक्षात घेऊन डिझाइन केली गेली आहे.
अनेकदा ही बाईक महाग असल्यामुळे तरूणांना विकत घेता येत नाही. मात्र आता खिशाला परवडणाऱ्या किमतीमध्ये ही बाईक मिळणार असून त्याची किंमत आणि फिचर्स नक्की कसे आहेत याबाबत आपण अधिक माहिती या लेखातून जाणून घेऊया (फोटो सौजन्य – Bikewale)
हा आतापर्यंतचा सर्वात स्वस्त हार्ले बाईक असेल
अहवालांनुसार, या नवीन स्प्रिंट बाईकची संभाव्य किंमत सुमारे $6,000 म्हणजे सुमारे 5 लाख रुपये असू शकते. जर असे झाले तर ती हार्ले-डेव्हिडसनच्या आतापर्यंतच्या सर्वात स्वस्त मोटारसायकलींपैकी एक असेल. कारण आतापर्यंत या बाईक्ससाठी काही लाखोंच्या घरात पैसे मोजावे लागत होते. ही नवीन बाईक पहिल्यांदा 2025 च्या EICMA मोटरसायकल शोमध्ये सादर केली जाईल. काही आठवड्यांनंतर, तिचे जागतिक पदार्पण देखील केले जाईल.
यावेळी कंपनीने बाईकसाठी पूर्णपणे नवीन आर्किटेक्चर डिझाइन केले आहे, जे येत्या काळात अनेक नवीन मॉडेल्ससाठी वापरले जाईल. यासह, हार्ले केवळ नवीन सेगमेंटमध्ये प्रवेश करणार नाही, तर त्या वर्गातील ग्राहकांना देखील लक्ष्य करेल जे पहिल्यांदाच हार्लेसारखी ब्रँडेड बाईक खरेदी करू इच्छितात.
160 किमी रेंज आणि 56 लिटर स्टोरेज, फक्त 10 हजारात बुक करता येणार ‘हा’ इलेक्ट्रिक स्कूटर
यापूर्वीही एंट्री-लेव्हल बाईक आणण्याचा प्रयत्न
खरं तर, हार्ले-डेव्हिडसनने कमी किमतीच्या बाईकसह बाजारात प्रवेश करण्याचा प्रयत्न करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी, कंपनीने भारतासारख्या देशांसाठी स्ट्रीट ७५० नावाची एंट्री-लेव्हल बाईक लाँच केली होती, जी भारतातच तयार केली जात होती. तथापि, स्ट्रीट ७५० ला अपेक्षित विक्री मिळाली नाही आणि कंपनीला ती बंद करावी लागली. आता हार्ले स्प्रिंटच्या माध्यमातून, कंपनी पुन्हा एकदा बजेट सेगमेंटमधील ग्राहकांना आकर्षित करण्याचा आणि अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे.
हार्ले डेव्हिडसनची माहिती
हार्ले-डेव्हिडसनच्या येणाऱ्या नवीन बाईकचे नाव स्प्रिंट असून ती २०२१ पासून बनवली जात आहे. ही एक छोटी डिस्प्लेसमेंट बाईक असून अमेरिकेसह जगातील अनेक देशांमध्ये विकली जाणार आहे. ही बाईक पुढील वर्षी म्हणजे २०२६ मध्ये बाजारात येणार आहे. परंतु, ही बाईक या वर्षाच्या अखेरीस, कदाचित २०२५ च्या EICMA मध्ये जगासमोर सादर केली जाऊ शकते असे सांगण्यात येत आहे.
होय हे शक्य आहे! महिना 25 हजार कमावणारा सुद्धा विकत घेईल Royal Enfield Hunter 350, असा असेल हिशोब