
फोटो सौजन्य: @PluginJourneys/ X.com
जगभरात आपल्या दमदार बाईक आणि स्कूटरसाठी ओळखल्या जाणाऱ्या हिरो मोटोकॉर्पने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सध्या वाढत्या इलेक्ट्रिक कार्सच्या मागणीकडे पाहून कंपनी देखील त्यांची स्वतःची Electric Car लाँच करणार आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
आता हिरो मोटोकॉर्प फोर-व्हील ड्राइव्ह सेगमेंटमध्ये प्रवेश करणार आहे. कंपनीने त्यांची कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक कार, Vida Nex 3 कॉन्सेप्ट सादर केली आहे. यावरून असे दिसते की की ही दुचाकी उत्पादक कंपनी आता फोर-व्हील ड्राइव्ह मार्केटमध्ये प्रवेश करणार आहे.
Honda ने सुमडीत ‘या’ 2 पॉवरफुल बाईक केल्या बंद! लाँच होऊन एक वर्ष देखील पूर्ण झाले नाही
हिरोची ही कॉन्सेप्ट कार दोन सीटर असेल. ही कार विशेषतः शहरी वापरासाठी डिझाइन केलेली दिसते. याचे फ्यूचरिस्टिक डिझाइन नक्कीच लक्ष वेधून घेईल. Vida Nex 3 Concept शहरी वाहतुकीतील आव्हाने लक्षात घेऊन डिझाइन करण्यात आली आहे.
या कॉन्सेप्ट कारमध्ये मॉड्यूलर सेंटर कन्सोल आहे जो आयताकृती आणि वर्तुळाकार दोन्ही इन्स्ट्रुमेंट क्लस्टर पर्याय देऊ शकतो. हे स्पष्टपणे सूचित करते की कस्टमायझेशन आणि ग्राहक -केंद्रित डिझाइन भविष्यात मोठी भूमिका बजावेल.
सध्या, शहरी वाहतुकीसमोरील सर्वात मोठी समस्या म्हणजे जागा आणि वाहतूक. मोठ्या शहरांमध्ये वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे, परंतु त्याच वेगाने पायाभूत सुविधांचा विस्तार होत नाहीये. लहान, दोन सीटर किंवा मायक्रो कार हा यावर उपाय असू शकतो.
पाकिस्तानातील महागाईचा नवा उच्चांक! Swift ची किंमत 44 लाखांवर तर Toyota Fortuner ची किंमत कोटींमध्ये
दुचाकी वाहने नेहमीच प्रत्येकासाठी योग्य पर्याय नसतात. अलिकडच्या काळात, भारतीय बाजारपेठेत मोठ्या कारकडे, विशेषतः सी-एसयूव्हीकडे मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. म्हणूनच, लहान ट्रिपसाठी लहान इलेक्ट्रिक कार एक उत्तम पर्याय असू शकतो.
Ola Electric नंतर आता Hero Motocorp नेही हे स्पष्ट संकेत दिले आहेत की भारतातील दुचाकी कंपन्या आता चौचाकी वाहनांच्या बाजारात पाऊल ठेवणार आहेत. जर त्यांच्या या कॉन्सेप्ट कार्स प्रत्यक्ष उत्पादनात आल्या, तर भारतीय ऑटोमोबाईल उद्योगात मायक्रो अर्बन इलेक्ट्रिक मोबिलिटी नावाचा एक नवा सेगमेंट तयार होऊ शकतो. यामुळे फक्त ट्रेंडच बदलणार नाही, तर इतर ब्रँडनाही या नव्या सेगमेंटमध्ये उतरायला प्रोत्साहन मिळू शकते.