फोटो सौजन्य: iStock
GST कमी झाल्याने ऑटो इंडस्ट्री आणि वाहन खरेदीदारांना चांगला दिलासा मिळाला आहे. ज्या वाहनांवर पूर्वी 28 टक्के जीएसटी लागू होता, त्याच वाहनांवर आता 18 टक्के जीएसटी लागू झाला आहे. यामुळे जर तुम्ही बाईक किंवा कार खरेदी करणार असाल तर तुमची हजारो रुपयांची बचत होईल.
भारतामध्ये सर्वाधिक विक्री होणारी बाईक Hero Splendor Plus आता पूर्वीपेक्षा अधिक स्वस्त झाली आहे. GST 2.0 लागू झाल्यानंतर या बाईकची किंमत कमी झाली असून ती सामान्य ग्राहकांसाठी आणखी किफायतशीर ठरली आहे. जर तुम्ही या फेस्टिव्ह सीझनमध्ये नवी बाईक घेण्याचा विचार करत असाल, तर हा उत्तम मौका आहे.
पूर्वी Hero Splendor Plus ही 28% GSTसह ₹80,166 (एक्स-शोरूम, दिल्ली) इतक्या किमतीत मिळत होती. आता कर कमी होऊन तो 18% झाला आहे. परिणामी ही बाईक फक्त ₹73,764 पासून उपलब्ध झाली आहे. म्हणजेच ग्राहकांना 6,402 ची रुपयांची थेट बचत होत आहे.
Hero Splendor Plus चे डिझाइन नेहमीच साधे आणि क्लासिक राहिले आहे, ज्याला सर्व वयोगटातील लोक पसंत करतात. नव्या मॉडेलमध्ये आकर्षक ग्राफिक्स आणि ड्युअल-टोन कलर ऑप्शन्स दिले आहेत, जसे हेवी ग्रे विथ ग्रीन, ब्लॅक विथ पर्पल, आणि मॅट शील्ड गोल्ड याची कॉम्पॅक्ट बॉडी आणि हलके वजन यामुळे ही बाईक शहरात तसेच ग्रामीण भागात चालवण्यासाठी अत्यंत सोयीची ठरते.
या बाईकमध्ये 97.2cc BS6 फेज-2 OBD2B कंप्लायंट एअर-कूल्ड इंजिन मिळते. हे इंजिन 8.02 PS पॉवर आणि 8.05 Nm टॉर्क निर्माण करते, तसेच 4-स्पीड गिअरबॉक्ससह येते. याची टॉप स्पीड सुमारे 87 kmph आहे. सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे मायलेज. ही बाईक 70–80 kmpl मायलेज देते आणि त्यामुळेच ती भारतातील सर्वाधिक फ्युएल-इफिशियंट कम्यूटर बाईक मानली जाते.
कार खरेदीदारांचे सुगीचे दिवस आले! GST 2.0 मुळे Maruti पासून Toyota पर्यंतच्या ‘या’ कार झाल्या स्वस्त
भारताच्या टू-व्हीलर बाजारात या श्रेणीत अनेक पर्याय उपलब्ध आहेत –
TVS Raider : किंमत ₹87,625 पासून सुरू; ₹7,700 पर्यंतची बचत
Hero HF Deluxe : GST कटनंतर सुरुवातीची किंमत ₹60,738; ₹5,805 पर्यंतची बचत
Honda Shine 125 : ₹85,590 पासून सुरू; ₹7,443 पर्यंत बचत
Honda SP 125 : ₹93,247 पासून सुरू; ₹8,447 पर्यंतची बचत (सर्वाधिक फायदा)
कमी बजेट आणि जास्त मायलेज हवे असेल, तर Hero HF Deluxe किंवा Splendor Plus सर्वोत्तम पर्याय. स्टाइल आणि ॲडव्हान्स फीचर्सची आवड असेल, तर TVS Raider किंवा Honda SP 125 योग्य ठरतील. टिकाऊ आणि आरामदायी 125cc बाईक हवी असल्यास Honda Shine 125 हा उत्तम पर्याय आहे.