Tata ने ग्राहकांचे मन ओळखले! 'या' तारखेपर्यंत मिळेल बंपर बचतीची संधी,
भारतीय मार्केटमध्ये अनेक ऑटो कंपन्या आहेत ज्या बेस्ट कार ऑफर करत असतात. मात्र, यातही खूप कमी अशा कार आहेत, ज्यांच्या फक्त नावावर विश्वास ठेवून ग्राहक कार खरेदी करतात. अर्थात ही कंपनी म्हणजे Tata Motors.
टाटाने देशात विविध सेगमेंट कार ऑफर केल्या आहे. तसेच त्यांच्या इलेक्ट्रिक कारला सुद्धा चांगली मागणी मिळताना दिसत आहे. यासोबतच कंपनी त्यांच्या कारवर डिस्काउंट देखील ऑफर करत असते. आता देखील कंपनी त्यांच्या कार आणि एसयूव्हीवर लक्षणीय डिस्काउंट ऑफर करत आहे. कंपनीच्या मते, अतिरिक्त ऑफर्ससह जीएसटी बेनिफिट्स दिल्याने कार खरेदी अधिक फायदेशीर होईल. चला जाणून घेऊयात की कोणत्या टाटा कारवर कोणत्या प्रकारच्या ऑफर्स दिल्या जात आहेत.
कार खरेदीदारांचे सुगीचे दिवस आले! GST 2.0 मुळे Maruti पासून Toyota पर्यंतच्या ‘या’ कार झाल्या स्वस्त
टाटा मोटर्स त्यांच्या कार आणि एसयूव्हीवर दादर डिस्काउंट देत आहे. कंपनीच्या मते, 30 सप्टेंबरपर्यंत Tiago ते Safari पर्यंतच्या मॉडेल्सवर जीएसटी फायदे आणि अतिरिक्त डिस्काउंट दिले जात आहे.
कंपनीकडून दिलेल्या माहितीनुसार जीएसटीमुळे केवळ किंमतीत घट झाली नसून अतिरिक्त फायद्यांसह टाटाच्या गाड्यांवर तब्बल 2 लाखांपर्यंतची बचत करता येणार आहे.
GST कमी झाल्याने ‘ही’ एसयूव्ही झाली एकदमच स्वस्त, किंमत 1.55 लाख रुपयांनी झाली कमी
टाटा मोटर्सकडून दिलेल्या माहितीनुसार,
टाटा मोटर्सच्या माहितीनुसार, टाटा पंचची सुरुवातीची किंमत ₹5.49 लाख निश्चित करण्यात आली असून ती 2021 मध्ये लॉन्च झालेल्या पंचच्या किमतीइतकीच आहे.
तसेच, टाटा टियागोची किंमत इतकी कमी झाली आहे की ती आता 2020 मध्ये लॉन्चवेळी ठरवलेल्या किमतीपेक्षाही कमी झाली आहे.
याशिवाय, हॅरियर आणि सफारीच्या ॲडव्हेंचर एक्स व्हेरिएंट्समध्ये आधीच आकर्षक फीचर्स उपलब्ध होते, परंतु जीएसटीतील बदलामुळे आता या गाड्याही ग्राहकांसाठी अधिक किफायतशीर ठरल्या आहेत.
GST बदलांनंतर, कारवर आता 28 टक्क्यांऐवजी 18 टक्के कर आकारला जाईल. सध्या महागड्या कारवर जास्तीत जास्त 40 टक्के कर आकारला जातो. परिणामी, कार खरेदी करणे पूर्वीपेक्षा कमी खर्चाचे होईल.