Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

केकेआर फॅन्ससाठी Hero ने खास लाँच केला VIDA VX2 Plus KKR Edition, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

हिरोने खास KKR फॅन्ससाठी खास VIDA VX2 Plus KKR Edition इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली आहे. या ई-स्कूटरची किंमत 1.16 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 26, 2026 | 09:58 PM
फोटो सौजन्य: X.com

फोटो सौजन्य: X.com

Follow Us
Follow Us:

Hero MotoCorp च्या इलेक्ट्रिक ब्रँड VIDA ने Kolkata Knight Riders (KKR) चाहत्यांसाठी खास स्कूटर लाँच केला आहे. या स्कूटरचं नाव VIDA VX2 Plus KKR Limited Edition असं आहे. हा स्कूटर KKR च्या थीमवर आधारित असून, पर्पल, गोल्ड आणि पर्ल ब्लॅक रंगांचा आकर्षक कॉम्बिनेशन देण्यात आला आहे. यावर KKR च्या तीन IPL विजेतेपदांचे प्रतीक दर्शवणारी खास चिन्हेही देण्यात आली आहेत. हा लिमिटेड एडिशन स्कूटर असल्याने तो फक्त निवडक VIDA स्टोअर्समध्येच उपलब्ध असेल.

डिझाइन आणि किंमत

डिझाइनच्या बाबतीत हा स्कूटर अत्यंत स्पोर्टी आणि प्रीमियम दिसतो. मात्र, त्याच्या मेकॅनिकल फीचर्समध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही आणि तो स्टँडर्ड VX2 Plus सारखाच आहे. यामध्ये LED हेडलाइट, DRLs आणि इंटिग्रेटेड इंडिकेटर्स दिले आहेत. कंपनीने KKR थीम असलेला हेल्मेटही लाँच केला आहे, जो याच रंगसंगतीत उपलब्ध आहे. या स्कूटरची एक्स-शोरूम किंमत सुमारे 1.16 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.

बाईक की स्कूटर? Suzuki ने सोशल मीडियावर रिलीज केला एक खास टिझर

बॅटरी, रेंज आणि परफॉर्मन्स

या स्कूटरमध्ये रिमूवेबल बॅटरी देण्यात आली आहे, जी सहज काढून घरात चार्ज करता येते. कंपनीच्या माहितीनुसार, याची रेंज 142 किमीपर्यंत आहे, मात्र दैनंदिन वापरात ती सुमारे 100 किमीपर्यंत मिळू शकते. याची टॉप स्पीड 80 किमी/तास आहे आणि हा स्कूटर 0 ते 40 किमी/तास वेग फक्त 3.1 सेकंदात गाठतो.

चार्जिंगबाबत बोलायचे झाल्यास, AC चार्जरने हा स्कूटर 4 तास 13 मिनिटांत 80% पर्यंत चार्ज होतो, तर फास्ट चार्जरने हेच काम केवळ 62 मिनिटांत पूर्ण होते.

TATA Sierra की Maruti Victoris? देशात Power Lockdown लागलाच कोणती कार देईल सुसाट मायलेज?

फीचर्स आणि स्मार्ट टेक्नोलॉजी

फीचर्सच्या बाबतीत हा स्कूटर खूपच प्रगत आहे. यामध्ये फुल डिजिटल TFT डिस्प्ले दिला आहे, ज्यामध्ये स्पीड, बॅटरी स्टेटस आणि नेव्हिगेशनसारखी माहिती दिसते. याशिवाय ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, कॉल आणि SMS अलर्ट तसेच मोबाइल अ‍ॅप सपोर्टही मिळतो. रायडिंगसाठी Eco, Ride आणि Sport असे विविध मोड्स देण्यात आले आहेत, ज्यामुळे वापरकर्ता आपल्या गरजेनुसार परफॉर्मन्स निवडू शकतो. यासोबतच की-लेस स्टार्ट, USB चार्जिंग आणि OTA अपडेट्ससारखे फीचर्सही देण्यात आले आहेत.

सेफ्टी

सुरक्षिततेसाठी या स्कूटरमध्ये कॉम्बी ब्रेकिंग सिस्टम (CBS), फ्रंट डिस्क ब्रेक आणि रियर ड्रम ब्रेक देण्यात आले आहेत. तसेच LED लाईट्स आणि लो बॅटरी अलर्टसारखी फीचर्सही दिली आहेत. यामध्ये 27 लिटरपेक्षा जास्त अंडरसीट स्टोरेज उपलब्ध आहे.

Web Title: Herp electric two wheeler brand vida vx2 plus kkr edition launched know price and features

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2026 | 09:58 PM

Topics:  

  • electric scooter
  • Hero MotoCorp
  • KKR

संबंधित बातम्या

Honda QC3 vs TVS iQube, Bajaj Chetak, VIDA VX2 आणि Ather Konarc; फॅमिली, ऑफिस आणि लांब प्रवासासाठी कोणती स्कूटर योग्य?
1

Honda QC3 vs TVS iQube, Bajaj Chetak, VIDA VX2 आणि Ather Konarc; फॅमिली, ऑफिस आणि लांब प्रवासासाठी कोणती स्कूटर योग्य?

इलेक्ट्रिक टू-व्हीलर मार्केटमध्ये तेजी; ऑगस्टमध्ये चेतकची आघाडी, विक्रीत 146% वाढ
2

इलेक्ट्रिक टू-व्हीलर मार्केटमध्ये तेजी; ऑगस्टमध्ये चेतकची आघाडी, विक्रीत 146% वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.