
फोटो सौजन्य: Gemini
नुकतेच, तिसऱ्या जनरेशनच्या Honda Amaze ला भारत एनसीएपीने 5-स्टार सेफ्टी रेटिंग दिले आहे. या सेफ्टी टेस्टमध्ये पास होणारी ही कार भारतीय बाजारात विकली जाणारी दुसरी सेडान कार आहे. होंडा अमेझला 5-स्टार ॲडल्ट ऑक्युपन्सी प्रोटेक्शन (एओपी) रेटिंग मिळाले आहे, तर तिला 4-स्टार चाइल्ड ऑक्युपन्सी प्रोटेक्शन (सीओपी) रेटिंग मिळाले आहे. भारत एनसीएपीचे हे सेफ्टी रेटिंग सध्या भारतीय बाजारात उपलब्ध असलेल्या तिसऱ्या जनरेशनच्या होंडा अमेझच्या सर्व सहा व्हेरिएंटसाठी आहे.
Tata Sierra की Honda Elevate, किमतीपासून फीचर्सपर्यंत कोणत्या SUV चा पगडा भारी?
होंडा अमेझला प्रौढ प्रवासी संरक्षण (Adult Occupant Protection) विभागात 32 पैकी 28.33 गुण मिळाले आहेत. फ्रंटल ऑफसेट डिफॉर्मेबल बॅरियर टेस्टिंगमध्ये या कारने 16 पैकी 14.33 गुण मिळवले, ज्यामुळे ड्रायव्हर आणि फ्रंट पॅसेंजरला चांगले संरक्षण मिळते, असे स्पष्ट होते. साइड मूवेबल डिफॉर्मेबल बॅरियर चाचणीतही अमेझला 16 पैकी 14 गुण मिळाले आहेत. साइड पोल इम्पॅक्ट चाचणीमध्येही ही कार उत्तीर्ण झाली आहे.
चाइल्ड ऑक्युपंट प्रोटेक्शनमध्ये Honda Amaze ला 49 पैकी 40.81 गुण मिळाले आहेत. तर याचा डायनॅमिक स्कोर 24 पैकी 23.81 होता. यात फक्त 0.19 गुण इतकी कपात झाली, कारण 18 महिन्यांच्या डमीला किरकोळ इजा झालेली नोंदवली गेली. तीन वर्षांच्या डमीला मात्र पूर्ण संरक्षण मिळाले. चाइल्ड रेस्ट्रेंट इंस्टॉलेशनमध्ये या कारने 12 पैकी 12 गुण मिळवले; मात्र व्हेईकल असेसमेंटमध्ये तिला 13 पैकी फक्त 5 गुण मिळाले.
होंडा अमेझच्या तिसऱ्या जनरेशन मॉडेलमध्ये सर्व सहा व्हेरिएंट्समध्ये 6 एअरबॅग्स देण्यात आले आहेत.
लहान मुलांच्या सुरक्षेसाठी ISOFIX चाइल्ड सीट अँकरिंग, तसेच ESC, ABS, रियर पार्किंग सेन्सर्स आणि सीट बेल्ट रिमाइंडर्स यांसारखी सुरक्षा वैशिष्ट्ये दिली आहेत. मिड-स्पेक व्हेरिएंटमध्ये रियर कॅमेरा आणि ब्लाइंड स्पॉट मॉनिटरिंग सिस्टीम मिळते, तर टॉप व्हेरिएंटमध्ये ADAS सिस्टमची सुविधाही उपलब्ध आहे.