Honda Cars India कडून ADAS सेफ्टी फीचर्स असणाऱ्या 50,000 कार विक्रीचा टप्पा पार
होंडा कार्स इंडिया लि. (एचसीआयएल) ने भारतातील रस्त्यांवर 50000 एडीएएस सक्षम होंडा कार्स धावण्यासह महत्त्वपूर्ण विक्रीचा टप्पा गाठला आहे. यशस्वी विक्रीमुळे एचसीआयएलच्या ‘सर्वांसाठी सुरक्षितता’ या जागतिक दृष्टिकोनात अधिक वृद्धी झाली आहे. 2050 पर्यंत होंडा बाईक्स व ऑटोमोबाइल्सशी संबंधित शून्य वाहतूक अपघातांकरिता त्यांचे ध्येय आहे. सुरक्षिततेला प्राधान्य देणारी होंडा ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी व प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करत असते.
एचसीआयएलने भारतात Honda Sensing नावाचे अॅडव्हान्सड ड्रायव्हर असिस्टंट सिस्टम (ADAS) तंत्रज्ञान सादर केले आहे. हे तंत्रज्ञान होंडा सिटी ई:एचईव्ही, एलीव्हेट, सिटी आणि अमेझसह विविध मॉडेल्समध्ये उपलब्ध आहे. भारतात याचे महत्त्वाचे विक्रीदृष्ट्या यश दिसून आले आहे, जिथे सिटी, एलीव्हेट आणि अमेझचे एडीएएस-सुसज्ज व्हेरियंट्स त्यांच्या विक्रीमध्ये ६०%, ९५% आणि ३०% योगदान देतात.
एचसीआयएलने २०२३ मध्ये मॅन्युअल ट्रान्समिशन व्हेरियंट्समध्ये एडीएएस तंत्रज्ञान लाँच करणारी पहिली कंपनी ठरली. भारतातील सुरक्षिततेला महत्व देत, हे तंत्रज्ञान सर्व व्हेआण्ट्समध्ये उपलब्ध करण्याचा उद्देश आहे. एडीएएस-सुसज्ज होंडा सिटीचे व्ही, व्हीएक्स आणि झेडएक्स ग्रेड्स तसेच एलीव्हेटच्या झेडएक्स ग्रेड व अमेझच्या झेडएक्स ग्रेडसारख्या व्हेअरिएण्ट्समध्ये अॅडवांसड ड्रायव्हर असिस्टंट सिस्टम (ADAS) वैशिष्ट्य उपलब्ध आहे.
होंडा सेन्सिंग एडीएएस तंत्रज्ञान उच्च कार्यक्षमतेसह काम करत असून, फ्रंट वाइड-व्ह्यू कॅमेर्याच्या सहाय्याने रस्त्याची सखोल तपासणी करते. यामुळे दिवसा आणि रात्री रोड लाइन्स, रोड बाऊंडरीज आणि विविध वस्तूंचे निरीक्षण होऊ शकते. या सिस्टममधून अपघातांचा धोका कमी करण्याचे कार्य केले जाते. काही केसेसमध्ये, अपघाताची तीव्रता टाळण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी हस्तक्षेप होतो.
होंडा सेन्सिंगच्या सिग्नेचर वैशिष्ट्यांमध्ये कोलिजन मिटिगेशन ब्रेकिंग सिस्टम (CMB), अॅडप्टिव्ह क्रूझ कंट्रोल (ACC), रोड डिपार्चर मिटिगेशन (RDM), लेन किपिंग असिस्ट सिस्टम (LKAS), लीड कार डिपार्चर नोटिफिकेशन (LCDN) आणि ऑटो हाय-बीम (AHB) यांचा समावेश आहे.
March 2025 मध्ये कार खरेदी करण्याची सुवर्ण संधी, Tata Cars वर मिळतोय भरघोस डिस्काउंट !
सुरक्षिततेवर जोर देणारी एचसीआयएल प्रत्येक ग्राहकाला अधिक सुरक्षित ड्रायव्हिंग अनुभव देण्यासाठी सतत कार्यरत आहे. होलिस्टिक दृष्टिकोनातून एडीएएस तंत्रज्ञानाची वाढती लोकप्रियता दर्शवते की भारतीय ग्राहक सुरक्षिततेला प्राधान्य देत आहेत, आणि होलिस्टिक सुधारणा होत असलेल्या कार तंत्रज्ञानामुळे त्यांची पसंती वाढत आहे. या तंत्रज्ञानामुळे, होंडा कार्स इंडिया भारतातील सर्वाधिक सुरक्षित कार ब्रँड्सपैकी एक ठरली आहे.