प्रवाशांच्या सुरक्षेसाठी डिझाइन केलेल्या या फीचरचा अनेकदा गैरवापर होताना दिसतो. गाडीचे स्टीअरिंग सोडून व्हिडीओ बनवणाऱ्या चालकांचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. ज्यात चालक स्टीअरिंग व्हील सोडून गाडी चालवताना दिसतात.
होंडा इंडियाने अनेक विभागांमध्ये ADAS तंत्रज्ञान सादर केले आहे. होंडा ही भारतात मॅन्युअल ट्रान्समिशन व्हेरिएंटमध्ये ADAS सादर करणारी पहिली कंपनी होती. २०२३ मध्ये होंडा सिटीने त्याची सुरुवात होते.