
फोटो सौजन्य: Gemini
भारतीय ऑटो बाजारात अनेक उत्तम वाहन उत्पदक कंपन्या आहेत, ज्या बेस्ट कार आणि बाईक ऑफर करत असतात. अशीच एक कंपनी म्हणजे Honda. होंडाने विविध सेगमेंटमध्ये उत्तम कार आणि बाईक ऑफर केल्या आहेत. कंपनीच्या बाईक तर नेहमीच मार्केटमध्ये लोकप्रिय ठरत असतात. मात्र, होंडाने त्यांच्या प्रीमियम सिंगल-सिलेंडर पोर्टफोलिओमधील होंडा CB300R ही निओ-रेट्रो बाईक भारतीय बाजारातून बंद केली आहे.
फेब्रुवारी 2019 मध्ये लाँच झालेल्या या बाईकने भारतातील CB लाइनअपसाठी एक नवीन सुरुवात केली. ही बाईक आता कंपनीच्या अधिकृत भारतीय वेबसाइटवरून काढून टाकण्यात आली आहे, ज्यामुळे असे दिसून येते की ती फक्त सहा वर्षांनी बंद करण्यात आली आहे. चला या बाईकचे प्रमुख फीचर्स आणि ती बंद करण्यामागील कारणे जाणून घेऊयात.
Honda CB300R ची भारतीय बाजारपेठेत पहिली एंट्री फेब्रुवारी 2019 मध्ये झाली होती. त्यावेळी याची एक्स-शोरूम किंमत 2.41 लाख रुपये ठेवण्यात आली होती. त्यानंतर जुलै 2020 मध्ये हे मॉडेल बंद करण्यात आले आणि BS6 अपडेटेड व्हर्जनची प्रतीक्षा सुरू झाली. अखेर जानेवारी 2022 मध्ये अधिक लोकलाइज्ड पार्ट्स आणि काही अपडेट्ससह हे मॉडेल पुन्हा लाँच करण्यात आले, ज्याची किंमत 2.77 लाख रुपये (एक्स-शोरूम) होती.
ऑक्टोबर 2023 मध्ये कंपनीने या बाईकची किंमत 37,000 रुपयांनी कमी करत 2.40 लाख रुपये केली. पुढे सप्टेंबर 2025 मध्ये नवीन GST दर लागू झाल्यानंतर या बाईकची किंमत आणखी घसरून 2.19 लाख रुपये झाली, ज्यामुळे ती अधिक आकर्षक पर्याय ठरली. मात्र, किंमतीत अनेक बदल होऊनही CB300R ही Honda च्या सर्वात कमी विकल्या जाणाऱ्या बाईकमध्ये राहिली आहे, आणि हेच याच्या संभाव्य बंद होण्यामागील मुख्य कारण ठरू शकते.