फोटो सौजन्य: @insanecreator83/ X.com
भारतीय मार्केटमध्ये विविध सेगमेंटमध्ये बाईक ऑफर केल्या जातात, ज्यांना ग्राहकांकडून दमदार मागणी मिळताना दिसते. यातही ॲडव्हेंचर बाईक सेगमेंटच्या बाईक्सना चांगली मागणी मिळताना दिसते. देशात अनेक दुचाकी उत्पादक कंपन्या आहेत, ज्या बेस्ट ॲडव्हेंचर बाईक ऑफर करतात. मात्र, काही वेळेस या बाईकमध्ये खराबी सुद्धा येत असते. अशीच खराबी होंडाच्या CRF1100L Africa Twin बाईकमध्ये आली आहे.
होंडा मोटरसायकलने त्यांच्या प्रमुख ॲडव्हेंचर बाईक CRF1100L आफ्रिका ट्विनसाठी स्वेच्छेने परत मागवण्याची सूचना जारी केली आहे. ही परत मागवण्याची प्रक्रिया केवळ भारतापुरती मर्यादित नाही तर गेल्या सहा वर्षांत (2019 ते 2025) जागतिक स्तरावर उत्पादित केलेल्या युनिट्सवर त्याचा परिणाम होत आहे. बाईकची वॉरंटी वैध आहे की नाही याची पर्वा न करता, कंपनी खराब झालेला पार्ट मोफत बदलेल.
‘या’ Electric Bike वर मिळतेय आतापर्यंतची मिळतेय बेस्ट डिस्काउंट, हजारो रुपयांची होणार बचत
होंडाच्या माहितीनुसार, डाव्या हँडलबारच्या स्विचगियरला जोडलेल्या वायरिंग हार्नेसमध्ये खराबी दिसून आली आहे. हँडलबार सतत हलत असल्यामुळे हे वायरिंग वारंवार वाकते आणि त्यामुळे कालांतराने जॉइंट टर्मिनल्सवर ऑक्सिडेशन होऊ शकते. परिणामी करंट कंडक्शनमध्ये अडचण निर्माण होते. यामुळे हॉर्न काम न करणे किंवा हेडलाइट लो बीमवरून हाय बीमवर स्विच करण्यात समस्या येऊ शकते. होंडाचे म्हणणे आहे की हा फक्त एक खबरदारीचा उपाय आहे, ज्यामुळे रायडर्सना दीर्घकाळ सुरक्षित आणि उत्कृष्ट अनुभव मिळू शकेल.
Honda च्या BigWing Topline डीलरशिप्स प्रभावित पार्ट्सची बदलणी करतील. ही बदलणी पूर्णपणे मोफत असेल आणि ग्राहकांना कोणताही अतिरिक्त खर्च करावा लागणार नाही. कंपनीने अद्याप प्रभावित वाहनांची अचूक संख्या जाहीर केलेली नाही. मात्र, ग्राहक आपल्या वाहनाचा VIN नंबर Honda च्या वेबसाइटवर टाकून त्यांची बाईक या रिकॉलचा भाग आहे की नाही, हे तपासू शकतात.
GST 2.0 मुळे लक्झरी कारच्या किमतीत सुद्धा मोठी घट, BMW ची ‘ही’ कार तर 7 लाख रुपयांनी स्वस्त झाली
Honda ने सांगितले आहे की खराब झालेल्या पार्ट्सची बदलणी प्रक्रिया जानेवारी 2026 च्या चौथ्या आठवड्यापासून सुरू होईल. मात्र, ग्राहकांना आधीच याबद्दलची माहिती नोटिफिकेशन (कॉल / ईमेल / एसएमएस) द्वारे कळवले जाईल. आजपासूनच डीलर्स ग्राहकांशी संपर्क साधून वाहनांची तपासणी प्रक्रिया सुरू करतील.