फोटो सौजन्य: Honda Motorcycles Europe (YouTube)
भारतासह संपूर्ण जगभरात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी झपाट्याने वाढत आहे. या वाढत्या मागणीमुळे अनेक वाहन उत्पादक कंपन्या आपल्या रणनीतीत बदल करत असून, पारंपरिक पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या वाहनांऐवजी आता इलेक्ट्रिक वाहनांकडे वळताना दिसत आहेत.
ग्राहकांमध्ये पर्यावरणपूरक व इंधन खर्च वाचवणाऱ्या वाहनांची पसंती वाढत असल्याने ज्या कंपन्या पूर्वी केवळ इंधनावर चालणारी वाहने सादर करत होत्या, त्या आता इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन सुरू करत आहेत. जगभरात इलेक्ट्रिक दुचाकीला सुद्धा जास्त मागणी मिळत आहे. यातच आता आघाडीची वाहन उत्पादक कंपनी Honda आपली पहिली इलेक्ट्रिक बाईक सादर करण्याच्या तयारीत आहे.
August 2025 मध्ये नवीन वाहनांचा धुमधडाका ! एक दोन नव्हे तर तब्बल 8 कार होणार लाँच
होंडा त्यांची पहिली पहिली इलेक्ट्रिक बाईक आणण्याच्या तयारीत आहेत. कंपनी 2 सप्टेंबर 2025 रोजी ही बाईक सादर करणार आहे. ही होंडाची पहिली मोठ्या क्षमतेची इलेक्ट्रिक बाईक असेल, ज्यात अनेक उत्तम फीचर्स पाहायला मिळू शकतात. नुकतेच या इलेक्ट्रिक बाईकचा टिझर YouTube वर रिलीज करण्यात आला आहे.
होंडाने त्यांच्या इलेक्ट्रिक बाईकचा टीझर रिलीज केला आहे. टीझरमध्ये एका बाईकचा स्पीड दाखवण्यात आला आहे. जवळून पाहिल्यावर समजते की ही बाईक गेल्या वर्षी सादर केलेल्या EV Fun संकल्पनेसारखे दिसते. जेव्हा ही बाईक सादर करण्यात आली होती तेव्हा कंपनीने म्हटले होते की EV Fun मध्यम आकाराच्या इंटरनल कंबशन इंजन (ICE) च्या सामान असेल, म्हणजेच या बाईकचा परफॉर्मन्स 500cc बाईकसारखाच असेल. यात सुमारे 50bhp पॉवर आउटपुट असू शकते, परंतु टॉर्क आउटपुट खूप जास्त असण्याची शक्यता आहे.
चीनच्या बॅटरी इंडस्ट्रीचे टेन्शन वाढले, Tesla चा LG Energy सोबत 35,000 कोटींचा बॅटरी करार
होंडाच्या पहिल्या इलेक्ट्रिक बाईकच्या टीझरमध्ये, क्लिप-ऑन हँडलबारवर TFT स्क्रीन, रुंद DRL आणि बार-एंड मिरर दिसले आहेत. त्याचा सीटिंग ट्रायअँगल थोडा स्पोर्टी दिसतो. होंडाने या इलेक्ट्रिक बाईकबद्दल म्हटले आहे की ती CCS2 चार्जिंग वापरून चार्ज केली जाईल, जी मुळात इलेक्ट्रिक कार चार्ज करण्यासाठी वापरली जाते. जर असे झाले तर ही बाईक खूप लवकर चार्ज होईल. तसेच ही इलेक्ट्रिक बाईक लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी आणखी सोयीस्कर होईल.
भारतात Honda Electric Bike कधी लाँच होणार याबाबत तरी कंपनीने अद्याप कुठलीही माहिती दिलेली नाही. मात्र, भारतात EVs ची वाढती क्रेझ लक्षात घेत कंपनी लवकरच ही बाईक लाँच करेल अशी आशा आहे.