Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Honda Elevate Faceliftची एंट्री! ६ ऑक्टोबरला होणार लॉन्च, बुकिंगही सुरू

Honda Elevate Facelift: होंडा आपली एलिव्हेट SUV नव्या रूपात 6 ऑक्टोबर 2026 रोजी भारतात लॉन्च करणार आहे. भारतात ही गाडी जगात सर्वप्रथम लॉन्च होणार असून 1 ऑक्टोबरपासून ₹21,000 मध्ये बुकिंग सुरू झाली आहे. गाडीची अंतिम किंमत आणि व्हेरिएंटनुसार फीचर्सची माहिती लॉन्चच्या दिवशी जाहीर होणार आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 04, 2026 | 02:59 PM
Honda Elevate Facelift (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Honda Elevate Facelift (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • 6 ऑक्टोबरला लॉन्च
  • ₹21,000 मध्ये बुकिंग
  • नवे फीचर्स
होंडा कार घ्यायचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक भारी बातमी आहे. होंडा कंपनी आपली सगळ्यात जास्त विकली जाणारी SUV एलिव्हेट नव्या रूपात घेऊन येत आहे. कंपनीने सांगितलं आहे की नवी होंडा एलिव्हेट 6 ऑक्टोबर 2026 ला भारतात लॉन्च होणार आहे. आणि सगळ्यात खास गोष्ट म्हणजे जगात सगळ्यात आधी भारतातच ही गाडी लॉन्च होणार आहे. यावरून कंपनीने भारतीय बाजाराला किती महत्व दिलंय हे कळतं. Honda Elevate Facelift

बुकिंग सुरु झाली, 21 हजार भरून बुक करा

गाडी अजून आली जरी नसली तरी कंपनीने तिचं बुकिंग सुरु केलं आहे. 1 ऑक्टोबरपासून तुम्ही ही गाडी बुक करू शकता. तुमच्या जवळच्या होंडा शोरूममध्ये जाऊन फक्त 21,000 रुपये भरून तुम्ही नवी एलिव्हेट बुक करू शकता. कंपनीने अजून किंमत किंवा कोणत्या व्हेरिएंटमध्ये काय फीचर्स असतील हे सांगितलं नाही. ते सगळं 6 ऑक्टोबरच्या लॉन्चच्या दिवशीच कळेल. पण कंपनी म्हणतेय की नवी एलिव्हेट आधीपेक्षा जास्त आकर्षक असेल, जास्त फीचर्स असतील आणि आतून पण जास्त प्रीमियम वाटेल.

बाहेरून काय बदल झाले?

होंडाने नवीन एलिव्हेटचे काही फोटो आणि टीझर दाखवले आहेत. त्यावरून कळतंय की गाडीच्या पुढच्या भागात खूप बदल केले आहेत. पुढे नवी ग्रिल डिझाईन दिली आहे आणि नवीन LED लाईट्स आहेत ज्या रात्री एकदम भारी दिसतात. होंडाचा लोगो आधी ग्रिलवर होता, आता तो बॉनेटवर म्हणजे वरच्या बाजूला लावला आहे. त्यामुळे गाडी जास्त मोठी आणि प्रीमियम वाटते. मागच्या बाजूला पण आता कनेक्टेड LED लाईट बार दिला आहे, जो आजकाल सगळ्या महागड्या गाड्यांमध्ये असतो. बंपर आणि बाकीच्या गोष्टींमध्ये पण थोडेफार बदल केले आहेत.

Best Turbo Petrol SUVs in India: टर्बो इंजिनची पॉवर, SUVचा दमदार अंदाज! भारतातल्या ‘या’ 5 गाड्या बजेटमध्ये भारी

आतमध्ये पण एकदम लग्झरी

बाहेरूनच नाही तर आतून पण गाडी पूर्णपणे बदलली आहे. टीझरमध्ये दिसतंय की आतमध्ये हलक्या रंगाचे सीट कव्हर दिले आहेत. डॅशबोर्डवर आणि दरवाज्यावर अँबियंट लाईटिंग दिली आहे, जी रात्री एकदम सुंदर दिसते. सगळ्यात मोठा बदल म्हणजे यात आता 360 डिग्री कॅमेरा येणार आहे. म्हणजे गाडी पार्क करताना चारही बाजू दिसतील. आणि पुढच्या सीटला व्हेंटिलेशन पण येणार आहे, म्हणजे उन्हाळ्यात सीट थंड राहील. हे दोन्ही फीचर्स आधीच्या एलिव्हेटमध्ये नव्हते.

याशिवाय आता 10.25 इंचाची मोठी टचस्क्रीन पण मिळणार आहे. पण हे सगळे फीचर्स सगळ्या व्हेरिएंटमध्ये असतील की फक्त टॉप मॉडेलमध्ये, हे अजून कंपनीने सांगितलं नाही.

इंजिन तेच राहणार

इंजिनमध्ये कंपनी जास्त बदल करणार नाहीये. जुन्या एलिव्हेटमध्येच जे 1.5 लिटरचं पेट्रोल इंजिन होतं तेच यात पण राहील. हे इंजिन चांगलं आहे, मायलेज पण बरं देतं. यात 6 स्पीड मॅन्युअल आणि CVT ऑटोमॅटिक असे दोन पर्याय मिळतील. म्हणजे या गाडीत मेन फोकस डिझाईन आणि फीचर्सवरच आहे.

Best Electric Scooters: ऑक्टोबरमध्ये Electric Scooter घ्यायचीये? ‘या’ 5 दमदार e-Scooters वर टाका नजर, किंमत-रेंज जाणून घ्या

कोणाशी स्पर्धा असेल?

नवी एलिव्हेट आली की तिची थेट स्पर्धा ह्युंदाई क्रेटा, किआ सेल्टोस, मारुती ग्रँड विटारा, टोयोटा हायरायडर, फोक्सवॅगन टायगुन, स्कोडा कुशाक आणि टाटा सिएरा सारख्या गाड्यांशी असेल. या सगळ्या गाड्या या सेगमेंटमध्ये खूप विकल्या जातात.

आता बघायचं आहे की होंडा या नव्या एलिव्हेटची किंमत किती ठेवते. जुन्या एलिव्हेटची किंमत 11 लाखापासून सुरु होते, तर नवी थोडी महाग असू शकते. सगळं काही 6 ऑक्टोबरला समजेलच.

Web Title: Honda elevate facelift 2026 launch booking new features rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2026 | 02:59 PM

Topics:  

  • best suv cars
  • Honda
  • Honda Car
  • SUV cars

संबंधित बातम्या

महिंद्राच्या या 3 इलेक्ट्रिक SUVची 1 लाखांहून जास्त विक्री; EV मार्केटमध्ये मोठा टप्पा!
1

महिंद्राच्या या 3 इलेक्ट्रिक SUVची 1 लाखांहून जास्त विक्री; EV मार्केटमध्ये मोठा टप्पा!

Honda Rebel 500 च्या 96 बाइक्स परत मागवल्या; स्टिअरिंगशी संबंधित पार्टमध्ये आढळला दोष!
2

Honda Rebel 500 च्या 96 बाइक्स परत मागवल्या; स्टिअरिंगशी संबंधित पार्टमध्ये आढळला दोष!

महिंद्राचा SUV मार्केटमध्ये दबदबा! सप्टेंबरमध्ये 64 हजारांहून जास्त गाड्यांची विक्री
3

महिंद्राचा SUV मार्केटमध्ये दबदबा! सप्टेंबरमध्ये 64 हजारांहून जास्त गाड्यांची विक्री

रेंज रोव्हर स्पोर्टचा इलेक्ट्रिक अवतार पाहिलात का? 609 km रेंज, 550 PS पॉवरसह जबरदस्त एन्ट्री
4

रेंज रोव्हर स्पोर्टचा इलेक्ट्रिक अवतार पाहिलात का? 609 km रेंज, 550 PS पॉवरसह जबरदस्त एन्ट्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.