Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 11 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

SUV ची क्रेझ असतानाही भारतात MPV मार्केटची मोठी झेप! 4 वर्षांत विक्री जवळपास दुप्पट

भारतात SUV कारची क्रेझ वाढत असताना MPV मार्केटनेही मोठी बाजी मारली आहे. गेल्या 4 वर्षांत MPV विक्रीत तब्बल 88.5 टक्के वाढ झाली. या स्पर्धेत मारुती सुझुकी एर्टिगाने बाजी मारली असून टोयोटा आणि कियानेही मोठी विक्री नोंदवली आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Nov 11, 2026 | 06:23 PM
India's MPV Market Sales Nearly Double (फोटो सौजन्य-AI एआय)

India's MPV Market Sales Nearly Double (फोटो सौजन्य-AI एआय)

Follow Us
Follow Us:
  • भारतातील MPV विक्री FY22 मधील 2.6 लाखांवरून FY26 मध्ये 4.9 लाख युनिट्सवर पोहोचली.
  • H1 FY27 मध्ये मारुती सुझुकी, टोयोटा आणि कियाने मिळून 2.39 लाख MPV विकल्या.
  • मारुती सुझुकी एर्टिगा 1.13 लाख युनिट्सच्या विक्रीसह देशातील सर्वाधिक विक्री होणारी MPV ठरली.

भारतीय Automobile Market मध्ये SUV कारची लोकप्रियता वाढत असतानाच MPV Market नेही मोठी झेप घेतली आहे. गेल्या 4 वर्षांत भारतातील MPV विक्री जवळपास दुप्पट झाली आहे. विशेष म्हणजे, मारुती सुझुकी, टोयोटा आणि किया या 3 कंपन्यांनी या सेगमेंटवर आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. SIAM च्या आकडेवारीनुसार, एप्रिल ते सप्टेंबर 2026 या H1 FY27 कालावधीत या 3 कंपन्यांनी मिळून जवळपास 2.39 लाख MPV विकल्या आहेत. हा एकूण विक्रीचा जवळपास 89 टक्के वाटा आहे.

4 वर्षांत MPV विक्रीत 88.5 टक्के वाढ!

आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष 2022 मध्ये भारतात 2.6 लाख MPV विकल्या गेल्या होत्या. आर्थिक वर्ष 2026 मध्ये हा आकडा वाढून 4.9 लाख युनिट्सवर पोहोचला. म्हणजेच 4 वर्षांत 88.5 टक्क्यांची वाढ झाली. याच काळात संपूर्ण पॅसेंजर व्हेईकल मार्केटमध्ये 53.4 टक्के वाढ झाली. दुसरीकडे, SUV विक्रीत 117.1 टक्क्यांची वाढ झाली. MPV चा मार्केटमधील वाटा FY22 मधील 8.5 टक्क्यांवरून FY26 मध्ये 10.4 टक्क्यांवर पोहोचला आहे.

टीव्हीएस Apache RTR 125 LC vs हिरो Xtreme 125R vs बजाज पल्सर 125 vs होंडा CB125 Hornet; कोणती बाईक ठरतेय बेस्ट?

मारुती सुझुकीची एर्टिगा सर्वात पुढे

MPV सेगमेंटमध्ये मारुती सुझुकी एर्टिगा सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली आहे. H1 FY27 मध्ये एर्टिगाच्या जवळपास 1.13 लाख युनिट्सची विक्री झाली. कंपनीच्या एक्सएल6च्या 20,389 आणि इन्व्हिक्टोच्या 1,635 युनिट्सचीही विक्री झाली. या तिन्ही मॉडेल्सची एकत्रित विक्री जवळपास 1.35 लाख युनिट्सवर पोहोचली.

टोयोटाच्या इनोव्हा हायक्रॉस आणि इनोव्हा क्रिस्टा या मॉडेल्सनी मिळून 54,234 युनिट्सची विक्री केली. तर रुमियनच्या 14,589 आणि वेलफायरच्या 685 युनिट्सची विक्री झाली. किया कॅरेन्स रेंजमधील कॅरेन्स, कॅरेन्स क्लॅव्हिस आणि कॅरेन्स क्लॅव्हिस ईव्ही यांनी मिळून 34,284 युनिट्सची विक्री नोंदवली.

यावर्षीच्या भारतातील टॉप 10 EV Brands!  टाटा पहिल्या क्रमांकावर, महिंद्राची मोठी झेप; MGला टाकले मागे!

कुटुंबांसाठी MPV कारची वाढती पसंती

MPV कारमध्ये 6 ते 7 जणांना आरामात प्रवास करता येतो. मोठी जागा, आरामदायी सीट्स आणि सामान ठेवण्यासाठी मिळणारी जागा यामुळे कुटुंबांची या कारना पसंती मिळत आहे. मारुती एर्टिगामधील CNG ऑप्शनमुळेही तिची मागणी वाढली आहे. रेनॉ ट्रायबरने 10,719 तर निसान ग्रॅव्हाइटने 8,765 युनिट्सची विक्री केली. त्यामुळे SUV ची क्रेझ कायम असली तरी भारतीय कुटुंबांमध्ये MPV कारची मागणीही वेगाने वाढत असल्याचे दिसते.

💡

Frequently Asked Questions

  • Que: भारतातील MPV मार्केटमध्ये गेल्या 4 वर्षांत किती वाढ झाली?

    Ans: आर्थिक वर्ष 2022 मध्ये भारतात 2.6 लाख MPV विकल्या गेल्या होत्या. आर्थिक वर्ष 2026 मध्ये हा आकडा 4.9 लाखांवर पोहोचला. यामध्ये 88.5 टक्क्यांची वाढ झाली.

  • Que: भारतात सर्वाधिक विक्री होणारी MPV कार कोणती आहे?

    Ans: मारुती सुझुकी एर्टिगा ही भारतातील सर्वाधिक विक्री होणारी MPV आहे. H1 FY27 मध्ये तिच्या जवळपास 1.13 लाख युनिट्सची विक्री झाली.

  • Que: H1 FY27 मध्ये कोणत्या 3 कंपन्यांचा MPV मार्केटमध्ये सर्वात मोठा वाटा होता?

    Ans: मारुती सुझुकी, टोयोटा आणि किया या कंपन्यांनी मिळून जवळपास 2.39 लाख MPV विकल्या. हा या सेगमेंटच्या एकूण विक्रीचा जवळपास 89 टक्के वाटा होता.

Web Title: India mpv market doubles four years maruti toyota kia auto news marathi ar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2026 | 06:23 PM

Topics:  

  • automobile
  • Maruti Suzuki
  • SUV cars

संबंधित बातम्या

टीव्हीएस Apache RTR 125 LC vs हिरो Xtreme 125R vs बजाज पल्सर 125 vs होंडा CB125 Hornet; कोणती बाईक ठरतेय बेस्ट?
1

टीव्हीएस Apache RTR 125 LC vs हिरो Xtreme 125R vs बजाज पल्सर 125 vs होंडा CB125 Hornet; कोणती बाईक ठरतेय बेस्ट?

यावर्षीच्या भारतातील टॉप 10 EV Brands!  टाटा पहिल्या क्रमांकावर, महिंद्राची मोठी झेप; MGला टाकले मागे!
2

यावर्षीच्या भारतातील टॉप 10 EV Brands!  टाटा पहिल्या क्रमांकावर, महिंद्राची मोठी झेप; MGला टाकले मागे!

टीव्हीएस अपाचे RR 310 ची इटलीत ऐतिहासिक एन्ट्री! मिसानो रेसिंग ट्रॅकवर भारतीय रायडर्सचा जलवा
3

टीव्हीएस अपाचे RR 310 ची इटलीत ऐतिहासिक एन्ट्री! मिसानो रेसिंग ट्रॅकवर भारतीय रायडर्सचा जलवा

एथर इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री 3 लाखांच्या पार! 2026 मध्ये 67% वाढ, मार्केट शेअरही विक्रमी पातळीवर
4

एथर इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री 3 लाखांच्या पार! 2026 मध्ये 67% वाढ, मार्केट शेअरही विक्रमी पातळीवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.