Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 15 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Renault Bridger & Renault Bigster: ऑटो एक्स्पो 2027 मध्ये रेनोल्टच्या 2 नवीन SUV दाखल होणार?

रेनोल्ट भारतात 2 नवीन SUV आणण्याच्या तयारीत आहे. Renault Bridger आणि Renault Bigster मध्ये सनरूफ, ADAS आणि हायब्रीड इंजिनसारखे फीचर्स मिळू शकतात. या गाड्यांची किंमत आणि लाँच टाइमलाइन काय असेल?

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Nov 15, 2026 | 07:27 PM
Renault Bridger and Bigster at Auto Expo 2027 (फोटो सौजन्य-AI एआय)

Renault Bridger and Bigster at Auto Expo 2027 (फोटो सौजन्य-AI एआय)

Follow Us
Follow Us:
  • रेनोल्ट ब्रिजर SUV मध्ये 1.2-लिटर टर्बो पेट्रोल आणि फॅक्टरी फिटेड CNG इंजिनचा ऑप्शन मिळण्याची शक्यता आहे.
  • रेनोल्ट बिगस्टरमध्ये 7 सीट्स, 1.8-लिटर स्ट्राँग हायब्रीड इंजिन आणि Level-2 ADAS मिळू शकते.
  • दोन्ही SUV ऑटो एक्स्पो 2027 मध्ये सादर होण्याची शक्यता असून किंमती 7.5 लाखांपासून सुरू होऊ शकतात.

भारतीय कार मार्केटमध्ये रेनोल्ट आपल्या SUV पोर्टफोलिओचा विस्तार करण्याच्या तयारीत आहे. कंपनी 2027 मध्ये Renault Bridger आणि Renault Bigster 7-Seater या 2 नवीन SUV भारतात सादर करण्याची शक्यता आहे. या दोन्ही गाड्यांचे प्रदर्शन Bharat Mobility Global Expo म्हणजेच Auto Expo 2027 मध्ये होऊ शकते. Renault India Upcoming Cars म्हणून या दोन्ही मॉडेल्सकडे पाहिले जात असून, नवीन डिझाइन, पेट्रोल, CNG आणि हायब्रीड इंजिनचे ऑप्शन मिळण्याची अपेक्षा आहे.

रेनोल्ट ब्रिजर SUV ची किंमत किती असेल?

रेनोल्ट ब्रिजर ही 4 मीटरपेक्षा छोटी SUV असेल. या गाडीचे डिझाइन भारतात विकसित करण्यात आले असून, देशांतर्गत आणि जागतिक मार्केटसाठी तिचे प्रोडक्शन केले जाणार आहे. या SUV मध्ये चौकोनी व्हील आर्च, जास्त ग्राउंड क्लिअरन्स आणि मागच्या दरवाजावर स्पेअर व्हील देण्यात येणार आहे. केबिनमध्ये मागच्या प्रवाशांसाठी 200 mm नी रूम आणि 400 लिटरची बूट स्पेस मिळण्याचा दावा आहे.

रेनॉल्ट डस्टर Strong Hybrid E-Tech 160 ची भारतात डिलिव्हरी सुरू! किंमत ₹16.99 लाखांपासून सुरु

फीचर्समध्ये पॅनोरॅमिक सनरूफ, व्हेंटिलेटेड आणि पॉवर अ‍ॅडजस्टेबल फ्रंट सीट्स, वायरलेस फोन चार्जिंग आणि ADAS सेफ्टी टेक्नोलॉजी मिळण्याची शक्यता आहे. इंजिनसाठी 1.2-लिटर टर्बो पेट्रोल आणि फॅक्टरी फिटेड CNG असे ऑप्शन असतील. 2028 पर्यंत या SUV चे स्ट्राँग हायब्रीड आणि इलेक्ट्रिक व्हर्जनही आणण्याची कंपनीची योजना आहे. तिची अंदाजे किंमत 7.5 लाख ते 14 लाख रुपये असू शकते. लाँच 2027 च्या तिसऱ्या तिमाहीत अपेक्षित आहे.

रेनोल्ट बिगस्टरमध्ये 7 सीट्स मिळणार

दुसरीकडे, रेनोल्ट बिगस्टर किंवा बोरेल नावाने ओळखली जाणारी नवीन 7-सीटर SUV भारतात दाखल होऊ शकते. या गाडीची लांबी सुमारे 4.6 मीटर आणि व्हीलबेस 2,702 mm असण्याची शक्यता आहे. तिसऱ्या रांगेतील प्रवाशांसाठी AC व्हेंट्स आणि चार्जिंग पोर्ट्स दिले जाऊ शकतात.

रेनॉल्ट डस्टर हायब्रिडचं मायलेज 29 kmpl? किंमत 16.99 लाखांपासून होतेय सुरु; खरेदीपूर्वी जाणून घ्या या महत्त्वाच्या गोष्टी

या SUV मध्ये ड्युअल स्क्रीन डिजिटल कॉकपिट, पॅनोरॅमिक सनरूफ, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, पॉवर टेलगेट आणि Level-2 ADAS मिळण्याची अपेक्षा आहे. इंजिनमध्ये 1.3-लिटर टर्बो पेट्रोलसह मॅन्युअल आणि 6-स्पीड DCT गिअरबॉक्स मिळू शकतो. यासोबत 1.8-लिटर स्ट्राँग हायब्रीड इंजिनचा ऑप्शनही असेल. अंदाजे किंमत 13 लाख ते 25 लाख रुपये असू शकते.

कोणत्या गाड्यांशी स्पर्धा होणार?

रेनोल्ट ब्रिजरची टक्कर किया सोनेट, टाटा नेक्सॉन, मारुती ब्रेझा आणि महिंद्रा व्हिजन S सोबत होऊ शकते. तर बिगस्टरचा सामना महिंद्रा XUV 7XO आणि टाटा सफारीशी होईल. या दोन्ही SUV च्या किंमती आणि इंजिनचे तपशील समोर आल्यानंतर भारतीय मार्केटमधील त्यांची जागा स्पष्ट होईल.

 

Web Title: Renault bridger bigster suv india launch auto expo 2027 auto news marathi ar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2026 | 07:27 PM

Topics:  

  • automobile
  • Renault
  • SUV cars

संबंधित बातम्या

Ashok Leyland Q2 Results: अशोक लेलँडच्या नफ्यात 13% वाढ! दुसऱ्या तिमाहीत 869 कोटींची कमाई
1

Ashok Leyland Q2 Results: अशोक लेलँडच्या नफ्यात 13% वाढ! दुसऱ्या तिमाहीत 869 कोटींची कमाई

Hero VIDA UBX Electric Motorcycle: हिरोची नवीन इलेक्ट्रिक बाईक भारतात टेस्टिंगदरम्यान दिसली; 2027 मध्ये लाँच होण्याची शक्यता
2

Hero VIDA UBX Electric Motorcycle: हिरोची नवीन इलेक्ट्रिक बाईक भारतात टेस्टिंगदरम्यान दिसली; 2027 मध्ये लाँच होण्याची शक्यता

Hero Xpulse 450 vs Himalayan 450 vs KTM 390 Adventure R; कोणती अ‍ॅडव्हेंचर बाईक ठरणार बेस्ट?
3

Hero Xpulse 450 vs Himalayan 450 vs KTM 390 Adventure R; कोणती अ‍ॅडव्हेंचर बाईक ठरणार बेस्ट?

टाटा मोटर्सची मोठी झेप! कार विक्रीत 40% वाढ, इलेक्ट्रिक वाहनांना ग्राहकांची पसंती
4

टाटा मोटर्सची मोठी झेप! कार विक्रीत 40% वाढ, इलेक्ट्रिक वाहनांना ग्राहकांची पसंती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.