Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Honda Elevate New Version: होंडा एलिव्हेटचे नवीन व्हर्जन लवकरच होणार लाँच; पाहा काय-काय बदलणार!

होंडा एलिव्हेटचे फेसलिफ्ट व्हर्जन लवकरच भारतीय बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर २०२६ मध्ये येणाऱ्या या अपडेटमध्ये डिझाईनसोबत मोठ्या स्क्रीनपासून लेव्हल-२ ADASपर्यंत कोणते बदल मिळणार, याबद्दल माहिती घेऊयात.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Sep 06, 2026 | 03:14 PM
Honda Elevate New Version: होंडा एलिव्हेटचे नवीन व्हर्जन लवकरच होणार लाँच; पाहा काय-काय बदलणार!
Follow Us
Follow Us:
  • होंडा एलिव्हेट फेसलिफ्ट ऑक्टोबर २०२६ मध्ये भारतीय बाजारात लाँच होण्याची शक्यता आहे.
  • नव्या एलिव्हेटमध्ये मोठी स्क्रीन, ३६० डिग्री कॅमेरा आणि लेव्हल-२ ADAS मिळण्याची शक्यता आहे.
  • फेसलिफ्टमध्ये सध्याचे १.५-लिटर पेट्रोल इंजिन आणि मॅन्युअल, CVT पर्याय कायम राहणार आहेत.
होंडा कार्स इंडिया आपल्या लोकप्रिय मिड-साईज SUV ‘एलिव्हेट’चे पहिले मोठे अपडेटेड व्हर्जन भारतीय मार्केटमध्ये आणण्याच्या तयारीत आहे. माहितीनुसार, ही नवी ‘होंडा एलिव्हेट फेसलिफ्ट’ ऑक्टोबर २०२६ मध्ये लाँच केली जाण्याची शक्यता आहे. मिड-साईज SUV सेगमेंटमध्ये वाढत्या स्पर्धेला टक्कर देण्यासाठी होंडाने हा निर्णय घेतला आहे.

एक्सटेरियर डिझाईनमध्ये काय बदलतील?

गाडीच्या एकूण आकारात कोणताही मोठा बदल होणार नाही, मात्र डिझाईन ताजेतवाने ठेवण्यासाठी काही सूक्ष्म बदल केले जातील. नवे फ्रंट आणि रिअर बंपर, तसेच होंडाच्या नवीन जागतिक डिझाईन लँग्वेजवर आधारित ग्रिल. टेल-लॅम्प्सच्या लाईटिंग ग्राफिक्समध्ये बदल आणि नवीन डिझाईनचे प्रिसिजन-कट अलाय व्हील्स मिळण्याची शक्यता आहे.

Honda August 2026 Sales: ऑगस्ट २०२६ मध्ये होंडा टू-व्हीलर्सचा जलवा! विक्रीत ८% वाढ, एकूण ५.७९ लाख गाड्यांची विक्री

केबिन आणि हाय-टेक फीचर्स

इंटिरियरमध्ये ग्राहकांना अधिक सोयीस्कर आणि आधुनिक फीचर्स पाहायला मिळतील. होंडा सिटीप्रमाणे यात १०.२५-इंचाची मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम दिली जाऊ शकते. सध्या ॲक्सेसरी म्हणून मिळणारे ३६०-डिग्री कॅमेरा आणि व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स आता फॅक्टरी-फिटेड (इन-बिल्ट) फीचर्स म्हणून दिले जातील. नवीन अपहोल्स्ट्री आणि प्रीमियम केबिन ट्रिम्समुळे आतील लुक जास्त आकर्षक होईल.

प्रगत सुरक्षा आणि ADAS अपडेट

होंडाच्या सध्याच्या एलिव्हेटमध्ये ‘Honda Sensing’ अंतर्गत ॲडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, लेन-कीप असिस्ट आणि इमर्जन्सी ब्रेकिंग सारखे फीचर्स मिळतात. मात्र, नवीन फेसलिफ्ट मॉडेलमध्ये होंडा सिटीप्रमाणे अधिक प्रगत ‘लेव्हल-२ ADAS’ सेफ्टी पॅकेज दिले जाण्याची दाट शक्यता आहे.

Honda UC3 VS TVS iQube: बजेट आणि रेंजच्या खेळात कोणती ई-स्कूटर ठरेल सर्वोत्तम? पाह इन डिटेल तुलना

इंजिन आणि परफॉर्मन्स

इंजिनमध्ये कोणताही बदल केला जाणार नाही. यात पूर्वीप्रमाणेच १.५-लिटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन मिळेल, जे १२१ hp पॉवर जनरेट करते. हे इंजिन ६-स्पीड मॅन्युअल आणि CVT ऑटोमॅटिक गिअरबॉक्स पर्यायांसह येईल. यामध्ये हायब्रिड इंजिनचा पर्याय दिला जाणार नाही.

किंमत आणि स्पर्धा

नवीन होंडा एलिव्हेट फेसलिफ्टची संभाव्य किंमत रु. ११ लाख ते १७ लाखांच्या (एक्स-शोरूम) दरम्यान असण्याचा अंदाज आहे. मार्केटमध्ये तिची थेट स्पर्धा ह्युंदाई क्रेटा, किया सेल्टॉस, मारुती ग्रँड व्हिटारा, टोयोटा हायरायडर, मारुती व्हिक्टोरिस आणि स्कोडा कुशाक यांसारख्या गाड्यांशी असेल.

Web Title: Honda elevate facelift launch october 2026 expected changes auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2026 | 03:14 PM

Topics:  

  • automobile
  • best suv cars
  • cars
  • honda cars

संबंधित बातम्या

गणेशोत्सवात कार खरेदीची सुवर्णसंधी! मारुती सुझुकीकडून  या सप्टेंबरमध्ये गाड्यांवर १.३५ लाखांपर्यंत बंपर डिस्काउंट!
1

गणेशोत्सवात कार खरेदीची सुवर्णसंधी! मारुती सुझुकीकडून  या सप्टेंबरमध्ये गाड्यांवर १.३५ लाखांपर्यंत बंपर डिस्काउंट!

सहा आठवड्यांत ६० हजार गाड्यांची बुकिंग! ‘न्यू मारुती ब्रेझा’ची मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री!
2

सहा आठवड्यांत ६० हजार गाड्यांची बुकिंग! ‘न्यू मारुती ब्रेझा’ची मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री!

Jawa All Stars 42 Bobber Launched: जावा ऑल स्टार्स ४२ बॉबर मार्केटमध्ये लाँच!  किंमत २.०८ लाख रुपयांपासून सुरु
3

Jawa All Stars 42 Bobber Launched: जावा ऑल स्टार्स ४२ बॉबर मार्केटमध्ये लाँच!  किंमत २.०८ लाख रुपयांपासून सुरु

Maruti Suzuki New Baleno Launched: सुझुकीची नवी बलेनो ६.०९ लाखांमध्ये लाँच; पाहा फीचर्स आणि बरंच काही
4

Maruti Suzuki New Baleno Launched: सुझुकीची नवी बलेनो ६.०९ लाखांमध्ये लाँच; पाहा फीचर्स आणि बरंच काही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.