फोटो सौजन्य: Social Media
भारतीय ऑटो बाजारात विविध सेगमेंट कार ऑफर केल्या जातात, ज्या ग्राहक आपापल्या मागणी आणि बजेटनुसार खरेदी करत असतात. यातही मिड साइज एसयूव्ही सेगमेंटच्या कार्सना चांगली मागणी मिळते. याच मागणीकडे लक्ष देत अनेक ऑटो कंपन्यांनी मार्केटमध्ये दमदार कार ऑफर केल्या आहेत.
होंडाने मिड साइज एसयूव्ही सेगमेंटमध्ये एलिव्हेट ऑफर केली आहे तर मारुती सुझुकीने देखील त्याच सेगमेंटमध्ये विटारा ऑफर केली आहे. इंजिन, फीचर्स आणि किंमतीच्या बाबतीत, या दोन्ही एसयूव्हीपैकी कोणती कार खरेदी करणे बेस्ट आहे? चला याबद्दल जाणून घेऊयात.
फुल्ल टॅंकवर 1200 KM ची रेंज! Maruti Grand Vitara खरेदी करण्यासाठी किती असावा पगार?
होंडा एलिव्हेटमध्ये एलईडी प्रोजेक्टर हेडलाइट्स, एलईडी डीआरएल, एलईडी टेल लॅम्प, फ्रंट आणि रियर बंपरवर सिल्व्हर स्क्विड गार्निश, 16 आणि 17 इंच व्हील्स, शार्क फिन अँटेना, बॉडी कलर डोअर मिरर, सिंगल पेन सनरूफ, बेज आणि ब्लॅक इंटिरिअर, स्टीअरिंग माउंटेड ऑडिओ कंट्रोल्स, स्मार्ट की, कीलेस एंट्री, पुश बटण स्टार्ट/स्टॉप, पिंच गार्ड ड्रायव्हर पॉवर विंडो, पॉवर ॲडजस्टेबल मिरर, मॅक्स कूल मोड, पूर्णपणे ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, रिअर एसी व्हेंट, पीएम 2.5 केबिन एअर प्युरिफायर, ऑटो डोअर लॉक-अनलॉक, टेलिस्कोपिक आणि टिल्ट स्टीअरिंग व्हील, ड्रायव्हर सीट हाइट ॲडजस्टर, 60-40 स्प्लिट सीट, 10.25 इंच इन्फोटेनमेंट सिस्टम, अँबियंट लाइट्स, फोल्डेबल ग्रॅब हँडल अशा अनेक फीचर्सचा समावेश आहे.
तर दुसरीकडे, मारुती ग्रँड विटारामध्ये शार्क फिन अँटेना, अँबियंट लाईट, एलईडी लाईट्स, पॅनोरॅमिक सनरूफ, व्हेंटिलेटेड सीट, हेड-अप डिस्प्ले, वायरलेस चार्जर, पॅडल शिफ्टर, क्रूझ कंट्रोल, पुश बटण स्टार्ट/स्टॉप, रियर एसी व्हेंट, आर्किमिडीज साउंड सिस्टम, सुझुकी कनेक्ट अशी फीचर्स आहेत.
Toyota त्यांची पहिली वाहिली EV लाँच करण्याच्या तयारीत, रेंज 500 किमीपेक्षा जास्त
होंडा Elevate SUV मध्ये कंपनीकडून 1.5 लिटर क्षमतेचे पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 121 पीएसची पॉवर आणि 145 एनएम टॉर्क निर्माण करते. या एसयूव्हीसोबत 6-स्पीड मॅन्युअल आणि सीव्हीटी ट्रान्समिशनचे पर्याय उपलब्ध आहेत. कंपनीच्या दाव्यानुसार, मॅन्युअल ट्रान्समिशन व्हेरिएंट 1 लिटर पेट्रोलमध्ये सुमारे 15.31 किमी मायलेज देते, तर सीव्हीटी व्हेरिएंटचे मायलेज 16.92 किमी प्रति लिटरपर्यंत मिळते.
तर मारुती ग्रँड विटारा कार पेट्रोल सीएनजी आणि हायब्रिड तंत्रज्ञानाच्या पर्यायांसह उपलब्ध आहे. त्यात 1.5 लिटर क्षमतेचे नॅचरली एस्पिरेटेड इंजिन दिले आहे. यामुळे ही कार 92.45 पीएस ते 103.06 पीएस पर्यंत पॉवर आणि 122 ते 136.08 न्यूटन मीटर टॉर्क देते. ही कार मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह आणली आहे आणि एका लिटरमध्ये ही 19.38 किमी ते 27.97 किमी पर्यंत चालवता येते.
होंडा एलिव्हेट एसयूव्हीची एक्स-शोरूम किंमत 11.91 लाखांपासून सुरू होते आणि याच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 15.41 लाखांपर्यंत जाते. तर मारुती ग्रँड व्हिटाराची एक्स-शोरूम किंमत 11.42 लाखांपासून ते 20.68 लाखांपर्यंत जाते.