
Honda सोडून 'या' कंपनीच्या Scooter मागे ग्राहकांची धावपळ!
भारतीय दुचाकी बाजारात अनेक उत्तम बाईक आणि स्कूटर ऑफर होत असतात. यातही बाईकच्या तुलनेत स्कूटरला जास्त मागणी मिळते. यामागील कारण म्हणजे बाईकच्या तुलनेत स्कूटर चालवणे सोपे आणि सोयीस्कर असते. म्हणूनच शहरी भागांसह ग्रामीण भागात सुद्धा स्कूटरचा वापर वाढताना दिसत आहे.
भारतीय ग्राहक नेहमीच Honda च्या स्कूटरला जास्त प्राधान्य देत असतात. मात्र आता हे चित्र बदलताना दिसत आहे. भारतीय स्कूटर उद्योगात होंडाने बऱ्याच काळापासून बाजारपेठेवर वर्चस्व गाजवले होते, परंतु FY2026 च्या पहिल्या सहामाहीतील आकडेवारीवरून असे दिसून येते की TVS आता होंडासोबत चांगली स्पर्धा करत आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
श्रीमंतांनाही घाम फोडणारी Rolls-Royce इतकी महाग का? एकच कार बनवायला लागतात ‘इतके’ दिवस!
भारतीय स्कूटर उद्योगाने FY2025 मध्ये 68.5 लाख युनिट्सची विक्रमी विक्री केली होती. आता FY2026 मध्ये पहिल्यांदाच 70 लाखांचा टप्पा पार करण्याच्या दिशेने उद्योग वेगाने वाटचाल करत आहे. H1 FY2026 (एप्रिल–सप्टेंबर 2025) दरम्यान स्कूटर उत्पादका कंपन्यांनी एकूण 37.21 लाख युनिट्सची विक्री केली, जी मागील वर्षाच्या तुलनेत 6.42% जास्त आहे. GST 2.0 अंतर्गत पेट्रोल इंजिन स्कूटर्सच्या किंमतींमध्ये झालेल्या कपातीमुळे सप्टेंबर 2025 मध्ये विक्रमी 7,33,391 युनिट्सची विक्री झाली. हा आतापर्यंतचा सर्वात उत्तम मासिक आकडा ठरला.
बाजारात सर्वात मोठा बदल Honda Motorcycle & Scooter India (HMSI) आणि TVS Motor Company यांच्या कामगिरीत दिसून आला आहे.
बाजारातील लीडर असलेल्या Honda ने मागील सहा महिन्यांत 14.3 लाख स्कूटर्सची विक्री केली, मात्र ही विक्री मागील वर्षीच्या (H1 FY2025) तुलनेत सुमारे 9 टक्क्याने कमी आहे. या घसरणीमुळे Honda ची बाजारातील मार्केट शेअर 45% वरून 39% वर आली आहे. यावरून स्पष्ट होते की कंपनीला आपल्या लोकप्रिय Activa आणि Dio मॉडेल्समध्ये इतर ब्रँड्सकडून कठीण स्पर्धा मिळत आहे.
Toyota ने सादर केलेली बेबी Land Cruiser भारतात देखील लाँच होणार का?
टीव्हीएस मोटर्सने या कालावधीत 10.8 लाख स्कूटर विकून सर्वांना आश्चर्यचकित केले. मागील वर्षाच्या तुलनेत ही 27% ची मोठी वाढ दर्शवते, ज्यामुळे कंपनीचा मार्केट शेअर 24% वरून 29% पर्यंत वाढला. ही प्रभावी कामगिरी त्यांच्या पेट्रोल स्कूटर (Jupiter, NTorq, Zest) तसेच त्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटर iQube मुळे झाली, ज्याने वर्षानुवर्षे 20% वाढ नोंदवली.