फोटो सौजन्य: iStock
भारतीय ऑटो मार्केटसह जगभरात लक्झरी कार्सची एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळते. जगभरात अनेक लोकप्रिय लक्झरी कार उत्पादक कंपन्या आहेत. Rolls-Royce ही त्यातीलच एक. अनेक सेलिब्रेटी आणि मोठमोठ्या उद्योगपतींच्या कार कलेक्शनमध्ये हमखास या कार्स पाहायला मिळतात. उत्कृष्ट लक्झरी, पॉवरफुल परफॉर्मन्स, दमदार डिझाइन, फीचर्स, आणि अशा अनेक बाबींमुळे रोल्स रॉयसच्या कार लोकप्रिय आहेत.
Mercedes-Benz, BMW, Audi, Porsche आणि Volvo सारख्या लक्झरी कारचे खरेदीदार जास्त असले तरी, रोल्स-रॉइस अजूनही त्यांची ओळख टिकवून आहेत. तसेच रोल्स-रॉईस कार केवळ वाहनेच नव्हे तर स्टेटस सिम्बॉल मानल्या जातात. मात्र, या कार्स इतक्या महाग का असतात? चला याबद्दल जाणून घेऊयात.
Tata – Mahindra सुसाट! भारतीय मार्केट गाजवल्यानंतर आता ‘या’ देशात थाटणार बिझनेस
एक Rolls-Royce कार पूर्ण तयार होण्यासाठी किमान सहा महिने आणि शेकडो तासांची मेहनत लागते. हाताने शिवलेल्या लेदर सीट्स आणि हाताने पॉलिश केलेले लाकडी भाग या कारला अधिकच खास बनवतात. Rolls-Royce च्या सर्वात प्रसिद्ध डिझाइन फीचर्सपैकी एक म्हणजे Starlight Headliner, ज्यामध्ये कारच्या छतावर हाताने 1,600 पर्यंत फायबर ऑप्टिक लाईट्स बसवल्या जातात, ज्यातून ग्राहकाच्या आवडीप्रमाणे नक्षत्राची आकृती तयार केली जाते.
आणखी एक खास डिझाइन एलिमेंट म्हणजे Coachline Pinstripe, ज्याचे पेंटिंग एक अनुभवी कलाकार स्वतःच्या हाताने करतो. Rolls-Royce चे ग्राहक 44,000+ पेक्षा जास्त पेंट ऑप्शन्समधून निवड करू शकतात किंवा स्वतःचा पूर्णपणे अनोखा आणि वेगळा कलर तयार करून घेऊ शकतात. या पेंटिंग प्रक्रियेला सुमारे 10 आठवडे आणि 22 टप्पे लागतात, ज्यामुळे कारचा फिनिश परफेक्ट मिळतो. यासाठी लागणारे दुर्मिळ लाकूड आणि उत्कृष्ट दर्जाचे लेदर जगभरातून मागवले जाते. एकदंरीत प्रीमियम गोष्टींपासून बनलेली ही कार ग्राहकांना प्रीमियम फील प्रदान करते.
Shankar Mahadevan ने खरेदी केली 69.90 लाख रुपयांची ‘ही’ आलिशान कार, फीचर्स तर एकदमच भारी
रोल्स-रॉईस खरेदीदारांसाठी, ही कार केवळ एक वाहन नाही, तर प्रतिष्ठेचे प्रतीक आहे. कंपनी जाणीवपूर्वक या कारची किंमत जास्त ठेवते कारण त्यांना ही कार प्रीमियम दर्जा टिकवून ठेवायचा. खरं तर, हीच महागडी किंमत रोल्स रॉईस ओळखीचा एक भाग आहे, जी गर्दीतून वेगळे दिसू इच्छिणाऱ्या खरेदीदारांना आकर्षित करते.






