
फोटो सौजन्य: X.com
भारतीय मार्केटमध्ये अनेक ऑटो कंपन्या आहेत, ज्या बेस्ट कार ऑफर करत असतात. तसेच या कंपन्या नवनवीन कार्स सुद्धा ऑफर करत असतात. मात्र, काही कार अशा असतात ज्या इतक्या लोकप्रिय ठरतात की पुढे कंपनी त्या कारचे अपडेटेड व्हर्जन लाँच करत असतात. आता लवकरच ह्युंदाई व्हेन्यूचा अपडेटेड मॉडेल लाँच होणार आहे.
Hyundai भारतीय बाजारपेठेत अनेक सेगमेंटमध्ये कार्स ऑफर करते. आता कंपनी लवकरच कॉम्पॅक्ट एसयूव्ही विभागात नवीन जनरेशनची व्हेन्यू लाँच करणार आहे. कंपनी या एसयूव्हीमध्ये कोणते बदल करणार आहे? सध्याच्या मॉडेलच्या तुलनेत यात कोणते नवीन फीचर्स असतील? भारतात ही कार कधी लाँच होईल? याची किंमत काय असू शकते? या सर्व गोष्टींबद्दल जाणून घेऊयात.
पुढील काही महिन्यात ‘या’ SUVs मार्केटमध्ये धुमाकूळ घालणार! जाणून घ्या किंमत
ह्युंदाई भारतीय बाजारपेठेत नवीन व्हेन्यू लाँच करण्याची तयारी करत आहे. कंपनी या एसयूव्हीमध्ये अनेक बदल करेल, ज्यामुळे ती सध्याच्या मॉडेलपेक्षा लक्षणीयरीत्या वेगळी असेल.
कंपनीच्या माहितीनुसार,नव्या जनरेशन Hyundai Venue मध्ये 12.3 इंचाचा इंफोटेनमेंट सिस्टीम दिला जाणार आहे. यासोबतच 12.3 इंचाचा डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देखील मिळेल, जो कर्व्ह्ड डिझाइनमध्ये असेल. त्यामुळे ही व्हेन्यू सध्याच्या जनरेशनपेक्षा अधिक आकर्षक आणि आधुनिक दिसेल.
नव्या जनरेशन Venue च्या इंटिरिअरमध्येही बदल करण्यात आले आहेत. यात ड्युअल-टोन इंटिरिअर आणि D-cut स्टिअरिंग व्हील दिले जाणार आहे, ज्यामुळे केबिनला अधिक प्रीमियम लुक मिळेल.
2 लाखांच्या डाउन पेमेंटनंतर Tata Tigor चा EMI फक्त असेल ‘इतकाच’, असा असेल फायनान्स प्लॅन
नव्या Venue चे डिझाइन सध्याच्या मॉडेलच्या तुलनेत सुधारित करण्यात आला आहे. त्यामुळे ती दिसायला थोडी मोठी आणि अधिक दमदार वाटेल. यामध्ये कनेक्टेड टेल लाइट्स, वर्टिकल LED DRL, आणि क्वाड बीम LED हेडलाइट्स असे नवे एलिमेंट्स दिले जातील.
नव्या जनरेशन Hyundai Venue ला सध्याच्या मॉडेलच्या तुलनेत अधिक उंच आणि रुंद बनविण्यात आले आहे. तसेच याचा व्हीलबेसही 20 mm ने वाढविण्यात आला आहे, ज्यामुळे राइड क्वालिटी आणि केबिन स्पेस दोन्ही सुधारतील.
कंपनीच्या माहितीनुसार, नवीन जनरेशन Hyundai Venue चे भारतात औपचारिक लाँच 4 नोव्हेंबरला होणार आहे. या SUV च्या किंमतीत थोडासा बदल केला जाण्याची शक्यता आहे.