Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

BMW New Logo: बीएमडब्ल्यूचा लोगो झाला अपडेट! ‘या’ महिन्यांपासून नवीन लोगो दिसणार कंपनीच्या प्रत्येक कारवर

BMW या लक्झरी वाहन उत्पादक कंपनीने त्यांचा लोगो अपडेट केला आहे. विशेष म्हणजे कंपनीने हा लोगो कोणत्याही अधिकृत घोषणा न करता केला आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 30, 2026 | 09:12 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Follow Us:
  • BMW कंपनीचा लोगो झाला अपडेट
  • फेब्रुवारी 2026 पासून कंपनीच्या सर्व कारवर दिसणार नवीन लोगो
  • हा लोगो पहिल्यांदा सप्टेंबर 2025 मध्ये iX3 मॉडेलवर दिसले होते
भारतात पूर्वीपासूनच ग्राहकांना लक्झरी कार आणि बाईकबद्दल कुतुहूल वाटत आले आहे. यातही मार्केटमध्ये काही असे ऑटो ब्रँड्स आहेत, ज्या त्यांच्या लक्झरी वाहनासाठीच ओळखल्या जातात. अशीच एक लोकप्रिय लक्झरी वाहन उत्पादक कंपनी म्हणजे BMW.

अनेक सेलिब्रेटी आणि उद्योगपतींच्या कार कलेक्शनमध्ये आपल्याला बीएमडब्ल्यूच्या कार्स पाहायला मिळतात. नुकतेच BMW ने त्यांचा लोगो कोणतीही मोठी घोषणा न करता अपडेट केला आहे.

Royal Enfield Hunter 350 vs Goan Classic 350: दोन्ही बाईकमध्ये एकच इंजिन मग फरक कशात?

बीएमडब्ल्यूने कोणतीही अधिकृत घोषणा न करता शांतपणे त्यांचा गोलाकार लोगो अपडेट केला आहे. हा नवीन लोगो पहिल्यांदा सप्टेंबर 2025 मध्ये iX3 मॉडेलवर सादर करण्यात आला होता. आता, ब्रँड फेब्रुवारीपासून त्यांच्या सर्व कारवर कंपनी हा नवीन लोगो वापरणार आहे. हे बदल खूपच किरकोळ आहेत, रंग आणि टेक्सचरमध्ये छोटेसे बदल करण्यात आले आहेत.

नवीन BMW लोगोमध्ये निळ्या आणि पांढऱ्या भागांना वेगळे करणाऱ्या हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल क्रोम बार आता काढून टाकण्यात आले आहेत. अपडेटेड लोगोमध्ये उरलेला क्रोम भाग आता स्मोक्ड (धूसर) लुकमध्ये दिसतो, ज्यामुळे त्याचा मॉडर्न लुक अधिक ठळक होतो. तसेच ‘BMW’ मधील स्वतंत्र अक्षरे आता अधिक स्लिम करण्यात आली असून, काळ्या भागावर आधीप्रमाणे ग्लॉसी फिनिशऐवजी सॅटिन किंवा मॅट फिनिश देण्यात आला आहे.

BMW च्या ब्लॉगमध्ये ब्रँडचे डिझाइन हेड ओलिव्हर हीलमर यांच्या हवाल्याने सांगण्यात आले आहे, “आम्हाला वारसा जंपन्यासोबतच लोगो अधिक अचूक आणि सुस्पष्ट करायचा होता. क्रोम अजूनही आहे, मात्र अक्षरांमध्ये चमकदार पॅटर्न जोडण्यात आला आहे, जो सहसा घड्याळांमध्ये पाहायला मिळतो. पांढरे भाग आता बाहेरील रिंगच्या अधिक जवळ आहेत. लोगो फ्लॅट दिसतो, मात्र स्पर्श केल्यावर त्यातील उभार जाणवतो.”

परदेशात नवीन युनिट्स येईना अन् भारतात ग्राहकच मिळेना! Maruti Suzuki च्या ‘या’ कारची बातच न्यारी

नवीन लोगो सध्या काही युरोपीय डीलरशिप्समध्ये उपलब्ध झाला असून, तो सध्याच्या मॉडेल्सशी पूर्णपणे जुळेलच असे नाही. BMW ने स्पष्ट केले आहे की हा नवीन गोल लोगो हुडवर लावण्यात येईल, मात्र ट्रंक/टेलगेट, व्हील सेंटर कॅप किंवा स्टीयरिंग व्हीलवर तो वापरला जाईल की नाही, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

BMW आपल्या M परफॉर्मन्स लोगोमध्येही बदल करण्याच्या तयारीत असून, हा अपडेट फेब्रुवारीपासून वाहनांवर दिसू लागेल. कंपनीकडून इतर काही बदलांबाबत सध्या तपशील जाहीर करण्यात आलेले नसले तरी, नवीन लोगो पाहता हा देखील एक सूक्ष्म डिझाइन अपडेट असण्याची शक्यता आहे. उल्लेखनीय म्हणजे, 2020 मध्ये BMW ने नवीन लोगो सादर केला होता, जो 1997 पासून वापरात असलेल्या लोगोसोबत समांतरपणे वापरला जात होता. तसेच 2017 मध्ये ब्रँडने आपल्या प्रीमियम मॉडेल्ससाठी ब्लॅक-अँड-व्हाइट लोगोही सादर केला होता.

Web Title: Luxury auto company bmw updated their logo

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 30, 2026 | 09:12 PM

Topics:  

  • automobile
  • BMW
  • bmw bikes

संबंधित बातम्या

Car Headlight Cleaning Tips: हेडलाइट्सवर धुकं साचतंय? फॉलो करा ‘या’ भन्नाट टिप्स
1

Car Headlight Cleaning Tips: हेडलाइट्सवर धुकं साचतंय? फॉलो करा ‘या’ भन्नाट टिप्स

कॉफी, शॉवर, डान्स आणि शेवटी चोरी! चोराने ४.७१ लाखांची KTM बाईक लंपास करण्यापूर्वी केला भन्नाट ‘VIP ड्रामा’
2

कॉफी, शॉवर, डान्स आणि शेवटी चोरी! चोराने ४.७१ लाखांची KTM बाईक लंपास करण्यापूर्वी केला भन्नाट ‘VIP ड्रामा’

भारतीय बाजारात लाँच होण्यापूर्वी Jetour T2 Plug-In Hybrid SUV ला परदेशात मिळाला मोठा अपडेट! जाणून घ्या माहिती
3

भारतीय बाजारात लाँच होण्यापूर्वी Jetour T2 Plug-In Hybrid SUV ला परदेशात मिळाला मोठा अपडेट! जाणून घ्या माहिती

Volkswagen  India: १० लाखांपेक्षा कमी किमतीत येतेय फोक्सवॅगनची नवीन कॉम्पॅक्ट SUV! पाहा काय असतील फीचर्स
4

Volkswagen  India: १० लाखांपेक्षा कमी किमतीत येतेय फोक्सवॅगनची नवीन कॉम्पॅक्ट SUV! पाहा काय असतील फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.