
फोटो सौजन्य: Pinterest
MG Hector च्या बेस व्हेरिएंट Style ची एक्स-शोरूम किंमत 11.99 लाख रुपये आहे. ही कार खरेदी केल्यास याची ऑन-रोड किंमत सुमारे 13.87 लाख रुपये इतकी होते. यामध्ये अंदाजे 1.20 लाख रुपये RTO शुल्क, सुमारे 57 हजार रुपये इन्शुरन्स आणि जवळपास 12 हजार रुपये TCS शुल्क समाविष्ट आहेत.
जर तुम्ही MG Hector Style व्हेरिएंट 2 लाख रुपये डाउन पेमेंट देऊन खरेदी केला, तर उर्वरित सुमारे 11.87 लाख रुपयांचे कर्ज घ्यावे लागेल. साधारणपणे बँका एक्स-शोरूम किमतीवरच कर्ज मंजूर करतात. बँकेकडून 9 टक्के वार्षिक व्याजदराने 7 वर्षांसाठी कर्ज मिळाल्यास, दरमहा सुमारे 19,110 रुपयांचा EMI भरावा लागेल.
7 वर्षे दरमहा 19,110 रुपयांचा EMI भरल्यास, तुम्हाला सुमारे एकूण 4.17 लाख रुपये फक्त व्याज म्हणून द्यावे लागतील. म्हणजेच MG Hector साठी एक्स-शोरूम किंमत, ऑन-रोड खर्च आणि व्याज यांची बेरीज केली तर एकूण खर्च जवळपास 18.05 लाख रुपये इतका होऊ शकतो. मात्र, व्याजदर आणि कर्ज कालावधी बदलल्यास ही रक्कम कमी-अधिक होऊ शकते.
‘या’ खास फीचर्समुळेच तर New Renault Duster ठरू शकते इतर कारपेक्षा वरचढ
MG Hector ही मिड-साइज SUV सेगमेंटमधील कार असून, बाजारात तिला अनेक कारकडून कडवी स्पर्धा मिळते. Tata Safari, Tata Harrier, Mahindra Scorpio आणि Mahindra XUV700 या दमदार SUVs शी तिचा थेट मुकाबला आहे. फीचर्स, जागा आणि आरामाच्या बाबतीत MG Hector या सर्व कार्सना चांगली टक्कर देते. फीचर-लोडेड आणि विश्वासार्ह SUV हवी असल्यास MG Hector चा बेस व्हेरिएंट हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. फक्त 2 लाख रुपये डाउन पेमेंट आणि सुमारे 19 हजार रुपये EMI मध्ये ही SUV तुम्ही आपल्या घरी आणू शकता.