Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Royal Enfield Hunter 350 vs Goan Classic 350: दोन्ही बाईकमध्ये एकच इंजिन मग फरक कशात?

भारतीय ऑटो बाजारात 350cc सेगमेंटमध्ये दमदार बाईक ऑफर होत असतात. अशाच दोन दमदार बाईक म्हणजे Royal Enfield Hunter 350 आणि Goan Classic 350.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 30, 2026 | 07:25 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Follow Us:
  • 350cc सेगमेंटमध्ये अनेक दमदार बाईक
  • Royal Enfield Hunter 350 आणि Goan Classic 350 ला दमदार मागणी
  • जाणून घ्या दोन्ही बाईक्समधील फरक
भारतीय दुचाकी मार्केटमध्ये Royal Enfield च्या बाईक्सची एक वेगळीच क्रेज पाहायला मिळते. विशेषकरून, 350cc सेगमेंटमध्ये कंपनीच्या बाईक्स विशेष लोकप्रिय ठरत आहेत. मात्र, अनेकदा कंपनीची कोणती 350cc बाईक चांगली? असा ग्राहकांना प्रश्न पडतो.

350cc सेगमेंटमध्ये Royal Enfield Hunter 350 आणि Goan Classic 350 या दोन्ही लोकप्रिय बाईक. एकीकडे शहरी-केंद्रित रोडस्टर आहे तर दुसरीकडे आरामदायी बॉबर आहे. चला दोन्ही बाईक्समधील बद्दल जाणून घेऊयात.

परदेशात नवीन युनिट्स येईना अन् भारतात ग्राहकच मिळेना! Maruti Suzuki च्या ‘या’ कारची बातच न्यारी

किंमत

दोन्ही बाईकच्या किमतीत लक्षणीय फरक आहे. हंटर 350 ही कंपनीची सर्वात परवडणारी बाईक आहे, जी विशेषतः नवीन रायडर्स आणि दैनंदिन शहरातील रायडर्सना लक्षात घेऊन डिझाइन केलेली आहे. तर, गोअन क्लासिक 350 ही रॉयल एनफील्डच्या 400 सीसी श्रेणीतील सर्वात प्रीमियम बाईक आहे. ही अशा ग्राहकांसाठी आहे ज्यांना बॉबर स्टाइल आणि दमदार फीचर्ससाठी अतिरिक्त पैसे देण्यास हरकत नाही.

डिझाइनमध्ये लक्षणीय फरक

Hunter 350 चा छोटा व्हीलबेस शहरातील ट्रॅफिकमध्ये या बाईकला अधिक चपळ बनवतो. कमी कर्ब वेटमुळे टाईट U-टर्न घेणे तसेच गर्दीच्या रस्त्यांवर बाईक सहज हाताळता येते. याचे ग्राउंड क्लीयरन्स शहरातील स्पीड ब्रेकर आणि दैनंदिन वापरासाठी पुरेशी आहे. राउंड हेडलॅम्प आणि मिरर्समुळे बाईकला रेट्रो टच मिळतो, तर कॉम्पॅक्ट बॉडी डिझाइनमुळे ती मॉडर्न लुक देते. ही बाईक फॅक्टरी ब्लॅक, डॅपर ग्रे, रिबेल ब्लू, लंडन रेड, टोकियो ब्लॅक आणि ग्रेफाइट ग्रे अशा रंग पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.

भारताचा मास्टरस्ट्रोक! ‘या’ Trade Deal मुळे BMW आणि Mercedes सर्वसामान्यांना परवडणार

Goan Classic 350 चे डिझाइन आणि एर्गोनॉमिक्स पूर्णपणे रिलॅक्स्ड राईडिंगवर आधारित आहेत. कमी सीट हाइट, मिनी एप-हॅंगर हँडलबार आणि पुढे सेट केलेले फुटपेग्स यामुळे ही बाईक अत्यंत आरामदायक बॉबर ठरते. जास्त ग्राउंड क्लीयरन्समुळे खराब किंवा तुटलेल्या रस्त्यांवरही अधिक आत्मविश्वास मिळतो. सिंगल-पीस सीट, स्लॅश-कट एक्झॉस्ट आणि छोटा रियर फेंडर हे क्लासिक बॉबर स्टाइलिंग अधोरेखित करतात. ही बाईक पर्पल हेज, शेक ब्लॅक, ट्रिप टील आणि रेव रेड रंगांमध्ये ऑफर केली जाते.

फीचर्समध्ये वेगळी ओळख

दोन्ही बाईक्समध्ये सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आला असला तरी त्यांची मांडणी वेगळी आहे. USB चार्जिंग, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, कॉल-SMS अलर्ट आणि Tripper नेव्हिगेशन हे फीचर्स दोन्हीमध्ये स्टँडर्ड आहेत.

Hunter 350 चा स्पीडोमीटर अधिक शार्प आणि मॉडर्न दिसतो. त्याची रेड नीडल तेज उन्हातही स्पष्ट दिसते, तर LCD डिस्प्ले लेआउट बाईकला युथफुल फील देतो.

Goan Classic 350 चा इन्स्ट्रुमेंट क्लस्टर अधिक पारंपरिक शैलीचा असून त्यात क्लासिक ॲनालॉग स्पीडोमीटर आणि खाली स्वतंत्र LCD स्क्रीन देण्यात आली आहे, जी त्याच्या बॉबर कॅरेक्टरशी सुसंगत आहे.

परफॉर्मन्समध्ये समान ताकद

Royal Enfield Hunter 350 आणि Royal Enfield Goan Classic 350 या दोन्ही बाईक्समध्ये कंपनीचा प्रसिद्ध J-सीरिज इंजिन देण्यात आला आहे, जो लो आणि मिड-रेंज टॉर्कसाठी ओळखला जातो. शहरातील वापरात तिसऱ्या किंवा चौथ्या गिअरमध्येही बाईक स्मूदपणे चालते. दोन्ही मॉडेल्समध्ये स्लिप-अँड-असिस्ट क्लच स्टँडर्ड देण्यात आला असून, त्यामुळे ट्रॅफिकमध्ये क्लच ऑपरेशन हलके आणि कमी थकवणारे ठरते.

Web Title: Difference between royal enfield hunter 350 and goan classic 350

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 30, 2026 | 07:25 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • bike
  • royal enfield

संबंधित बातम्या

RC बुकवरील ‘इंजिन नंबर’ आणि ‘चेसिस नंबर’ का महत्त्वाचे आहेत? सविस्तरपाने जाणून घ्या
1

RC बुकवरील ‘इंजिन नंबर’ आणि ‘चेसिस नंबर’ का महत्त्वाचे आहेत? सविस्तरपाने जाणून घ्या

RC बुक हरवले तर काय करावे? ‘डुप्लिकेट RC’ मिळवण्याची ऑनलाईन व ऑफलाईन सोपी प्रक्रिया काय आहे?
2

RC बुक हरवले तर काय करावे? ‘डुप्लिकेट RC’ मिळवण्याची ऑनलाईन व ऑफलाईन सोपी प्रक्रिया काय आहे?

किया इंडियाने लाँच केले सेल्टोसचे २ नवीन व्हेरिएंट्स; २१.५६ लाख रुपयांपासून किंमत सुरू!
3

किया इंडियाने लाँच केले सेल्टोसचे २ नवीन व्हेरिएंट्स; २१.५६ लाख रुपयांपासून किंमत सुरू!

CNG वाहनधारकांसाठी महत्त्वाचे! दर तीन वर्षांनी CNG सिलेंडरची ‘हायड्रो-टेस्टिंग’ करणे अनिर्वार्य! ‘हे’ चुकवले तर बेतू शकते जीवावर
4

CNG वाहनधारकांसाठी महत्त्वाचे! दर तीन वर्षांनी CNG सिलेंडरची ‘हायड्रो-टेस्टिंग’ करणे अनिर्वार्य! ‘हे’ चुकवले तर बेतू शकते जीवावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.