फोटो सौजन्य: Pinterest
राज्यात वाहनांच्या चोरीच्या घटनेत सातत्याने वाढ होत आहे. हीच चोरीची घटना कमी करण्यासाठी राज्य सरकारने एक महत्वाचा निणर्य घेतला. तो म्हणजे HSRP Number Plate अनिवार्य करण्याचा. अर्थातच जेव्हा हा निर्णय घेण्यात आला तेव्हा नागरिक अचानक गोंधळून गेले. यानंतर सरकारने काही वेळा मुदतवाढ करत हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवण्याची अंतिम तारीख 15 ऑगस्ट केली. आता पुन्हा एका सरकारने ही नंबर प्लेट बसवण्याची मुदत वाढवली आहे.
1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट (HSRP) बसविण्यासाठी 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानंतर 1 डिसेंबर 2025 पासून हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट (HSRP) न बसविणाऱ्या वाहनांवर वायुवेग पथकाद्वारे कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे यांनी दिला आहे.
केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ च्या नियम ५० अन्वये शासनाने सर्व वाहनांना एचएसआरपी बसविण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. ही नंबर प्लेट न बसविणाऱ्या वाहन मालकांचे वाहन हस्तांतरण, कर्जबोजा चढविणे, कर्जबोजा उतरविणे इत्यादी कामांवर आधीच निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यापुढे अशा वाहन मालकांच्या वाहनांची पुननोंदणी, वाहनात बदल करणे, परवाना नूतनीकरण इत्यादी सर्व कामे (योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण वगळून) थांबविण्यात येतील. वायुवेग पथकामार्फत वाहन तपासणीमध्ये जप्त केलेल्या वाहनांना एचएसआरपी लावल्याशिवाय सोडण्यात येणार नाही. याची सर्व वाहनधारकांनी नोंद घ्यावी.
आता Mahindra Bolero Neo मिळेल खिश्याला परवडणाऱ्या किमतीत, जाणून घ्या फीचर्स
एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत वाहनांसाठी आता एचएसआरपी (HSRP) क्रमांक प्लेट अनिवार्य ठरणार आहे. म्हणजेच एप्रिल २०१९ नंतर खरेदी केलेल्या वाहनांना या नियमाचा परिणाम होणार नाही. तरीदेखील, संबंधित वाहनधारकांनी शक्य तितक्या लवकर ही प्लेट बसवणे गरजेचे आहे. अन्यथा १० हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जाईल.