Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mercedes Benz : लक्झरी आणि पॉवर! मर्सिडीजची ‘ही’ राजेशाही इलेक्ट्रिक कार, एका चार्जवर धावणार 700km; पाहा जबरदस्त फीचर्स

जर्मन लक्झरी कार निर्माता कंपनी मर्सिडीज-बेंझने ऑटोमोबाईल विश्वात पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. कंपनीने आपली नवीन 'VLE' सादर केली आहे. मोठ्या कुटुंबासाठी किंवा प्रीमियम शटल सेवेसाठी ही गाडी एक उत्तम पर्याय ठरणार आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 11, 2026 | 07:40 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:
  • मर्सिडीज-बेंझ कंपनीने आपली नवीन ‘VLE’ Electric Luxury People Mover सादर
  • आलिशान लिमोझिनचा अनुभव आता वॅनमध्ये
  • मर्सिडीजची नवीन कार कंपनीच्या स्वतःच्या ‘मर्सिडीज-बेंझ ऑपरेटिंग सिस्टम’ वर
Mercedes-Benz : जर्मन लक्झरी कार निर्माता कंपनी मर्सिडीज-बेंझने ऑटोमोबाईल विश्वात पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. कंपनीने आपली नवीन ‘VLE’ (Electric Luxury People Mover) सादर केली आहे. ही गाडी म्हणजे केवळ एक कार नसून रस्त्यावर धावणारा एक ‘राजमहाल’ आहे असे म्हटल्यास वावगं ठरणार नाही. मोठ्या कुटुंबासाठी किंवा प्रीमियम शटल सेवेसाठी ही गाडी एक उत्तम पर्याय ठरणार आहे.

आईशपथ, मार्केट हादरलं! सगळ्यांची हवा टाईट; Audi ने सुरू केले ‘या’ कारचे बुकिंग; केवळ…

आलिशान लिमोझिनचा अनुभव आता वॅनमध्ये

पारंपारिक MPV (Multi-Purpose Vehicle) गाड्यांपेक्षा मर्सिडीज VLE पूर्णपणे वेगळी आहे. या गाडीची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे की, प्रवाशांना एका हाय-एंड लिमोझिनमध्ये बसल्याचा अनुभव येईल. पण जागा मात्र एका मोठ्या वॅनसारखी मिळेल. याच्या केबिनमध्ये तीन रांगांमध्ये एकूण आठ जण आरामात बसू शकतात. विशेष म्हणजे, गरजेनुसार तुम्ही यातील सीटिंग लेआउट बदलू शकता.

बेस्ट तंत्रज्ञान

मर्सिडीजची ही नवीन कार कंपनीच्या स्वतःच्या ‘मर्सिडीज-बेंझ ऑपरेटिंग सिस्टम’ वर चालते. गाडी चालवताना मिळणाऱ्या मदतीपासून म्हणजेच Driver Assistance ते इंटरटेनमेंटपर्यंत सर्व गोष्टी ही सिस्टिम हाताळते. या गाडीचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे मागील सीटवर बसलेल्या प्रवाशांसाठी असलेला ३१.३ इंची पॅनोरामिक डिस्प्ले. हा डिस्प्ले छतामधून खाली येतो, ज्यावर तुम्ही मूव्ही स्ट्रीम करू शकता, गेम खेळू शकता किंवा व्हिडिओ मीटिंगही अटेंड करू शकता.

दमदार बॅटरी आणि 700 kmची रेंज

इलेक्ट्रिक गाड्यांच्या बाबतीत सर्वात महत्त्वाची असते ती म्हणजे ‘रेंज’. मर्सिडीज VLE मध्ये ११५ kWh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. ८०० व्होल्टच्या आधुनिक इलेक्ट्रिकल आर्किटेक्चरमुळे ही गाडी एका फुल चार्जवर ७०० किलोमीटरपेक्षा जास्त धावू शकते, असा मर्सिडीजचा दावा आहे.

सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे याची फास्ट चार्जिंग क्षमता. अवघ्या १५ मिनिटांच्या चार्जिंगवर ही गाडी ३५५ किलोमीटरपर्यंतची रेंज देऊ शकते. त्यामुळे लांबच्या प्रवासात चार्जिंगची चिंता आता उरणार नाही.

इंटीरियर आलिशान लाउंजसारखं

गाडीच्या आत शिरताच तुम्हाला लक्झरीची जाणीव होते. यात एक मोठी ‘स्काय व्ह्यू पॅनोरामिक ग्लास रूफ’ आहे, ज्यामुळे केबिनमध्ये नैसर्गिक प्रकाश येतो. तसेच, तिन्ही रांगांमध्ये असलेली ‘अॅम्बियंट लाइटिंग’ आणि लाउंजसारख्या आरामदायक सीट्स प्रवासाचा थकवा जाणवू देत नाहीत. ही गाडी ४०९ hp इतकी जबरदस्त ताकद निर्माण करते आणि यात ‘4MATIC’ ऑल-व्हील ड्राइव्हची सुविधाही मिळते.

Electric Car drives : टाकाऊ पासून टिकाऊ…! 500 जु्न्या बॅटरीच्या वापरातून चालवली Electric Cars

Web Title: Httpswwwnavarashtracomtopicelectric car

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2026 | 07:38 PM

Topics:  

  • auto mobile
  • auto mobile news
  • Mercedes
  • Mercedes car

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.