फोटो सौजन्य: @ArdorHyundai/x.com
भारतात विविध ऑटो कंपन्या आहेत, ज्या नेहमीच ग्राहकांना बेस्ट कार ऑफर करत असतात. यात विदेशी ऑटो कंपन्यांचा सुद्धा समावेश आहे. अशीच एक कंपनी म्हणजे साऊथ कोरियन वाहन निर्माता ह्युंदाई, जिने विविध सेगमेंटमध्ये दमदार कार ऑफर केल्या आहेत. कंपनीच्या अनेक कार भारतीय बाजारात लोकप्रिय आहेत. अशीच एक कार म्हणजे Hyundai Aura. नुकतेच या कारमध्ये नवीन फीचर्स समाविष्ट करण्यात आले आहे.
ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडने त्यांच्या कॉम्पॅक्ट सेडान ह्युंदाई ऑराच्या SX व्हेरिएंटला नवीन फीचर्ससह अपडेट केले आहे. हा SX व्हेरिएंट टॉप-स्पेक Aura SX(O) च्या खाली देण्यात आला आहे. आता तो पूर्वीपेक्षा अधिक फीचर्सपूर्ण झाला आहे. आता तो प्रोजेक्टर हेडलॅम्प आणि पूर्णपणे ऑटोमॅटिक टेम्परेचर कंट्रोल सिस्टमसह इतर अनेक फीचर्ससह सुसज्ज आहे. चला जाणून घेऊया ह्युंदाई ऑरामध्ये इतर कोणते फीचर्स आहेत आणि याची नवी किंमत काय असेल?
आता Fortuner खरेदी करण्याचे स्वप्न होईल पूर्ण! GST कपातीनंतर एसयूव्हीवर होईल भरभरून होईल बचत
ह्युंदाईने आपल्या लोकप्रिय कारच्या नव्या व्हेरिएंट्सच्या किंमती जाहीर केल्या आहेत. पेट्रोल-MT मध्ये E व्हेरिएंटची किंमत 6.54 लाख रुपये, तर S व्हेरिएंट 7.38 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. याच S व्हेरिएंटचा पेट्रोल-AMT 8.08 लाख आणि CNG-MT 8.37 लाख रुपये इतका आहे. कॉर्पोरेट व्हेरिएंटची किंमत पेट्रोल-MT मध्ये 7.48 लाख, तर CNG मध्ये 8.47 लाख रुपये आहे. नव्याने सादर केलेला SX व्हेरिएंट 8.23 लाख (पेट्रोल-MT) आणि 9.20 लाख रुपये (CNG-MT) मध्ये उपलब्ध आहे. SX+ व्हेरिएंट फक्त पेट्रोल-AMT मध्ये 8.95 लाख रुपये ठेवण्यात आला आहे. तर SX(O) व्हेरिएंटची किंमत 8.74 लाख रुपये आहे.
ऑराला नवे फीचर्स देतानाच SX व्हेरिएंटच्या किमतींमध्ये 9,000 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. आता Aura SX 1.2 पेट्रोल MT ची नवी किंमत 8.24 लाख रुपये, तर Aura SX 1.2 CNG MT ची किंमत 9.20 लाख रुपये झाली आहे. यापूर्वी प्रोजेक्टर हेडलॅम्प आणि ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल हे फीचर्स फक्त SX(O) आणि SX+ AMT ट्रिम्समध्येच उपलब्ध होते. मात्र आता हे फीचर्स SX ट्रिममध्येही समाविष्ट करण्यात आले आहेत.
इथे GST कमी झाला आणि तिथे Maruti Wagon R ची किंमत झटकन पडली, आता फक्त द्यावे लागेल…
ऑरा एसएक्स व्हेरिएंटमध्ये प्रोजेक्टर हेडलॅम्प आणि ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोलची फीचर्स आहेत. या फीचर्सव्यतिरिक्त, त्यात आधीच 20.25 सेमी (8-इंच) टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, रिअर कॅमेरा, पुश-बटण स्टार्ट/स्टॉपसह स्मार्ट की, 15-इंच डायमंड-कट अलॉय व्हील्स आहेत.
Aura SX मध्ये आधीप्रमाणेच 1.2-लीटर, 4-सिलेंडर नैचरल अॅस्पिरेटेड पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे, जे 83hp पॉवर आणि 114Nm टॉर्क निर्माण करते. त्याच इंजिनसह याचा CNG ऑप्शनही उपलब्ध असून तो 69hp पॉवर आणि 95Nm टॉर्क जनरेट करतो. हे दोन्ही इंजिन्स 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससोबत येतात. तर SX+ AMT व्हेरिएंट ऑटोमॅटिक ऑप्शनमध्ये दिला जातो.