फोटो सौजन्य: iStock
भारतात विविध सेगमेंटमध्ये मोठ्या प्रमाणात कार ऑफर केल्या जातात. यातही एसयूव्ही सेगमेंटमधील कार्सना चांगली मागणी पाहायला मिळते. ग्राहकांची हीच मागणी लक्षात घेत अनेक ऑटो कंपन्या मार्केटमध्ये दमदार एसयूव्ही लाँच करत असतात. आता तर इलेक्ट्रिक एसयूव्ही देखील मार्केटमध्ये लाँच होत आहे.
भारतात अनेक हाय परफॉर्मन्स एसयूव्ही पाहायला मिळतील. मात्र, Toyota Fortuner ची बातच काही और आहे. अनेक सेलिब्रेटी, राजकीय नेते आणि उद्योगपतींच्या कार कलेक्शनमध्ये ही एसयूव्ही पाहायला मिळते. अशातच जर तुम्ही बऱ्याच काळापासून टोयोटा फॉर्च्युनर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही योग्य वेळ आहे.
अलीकडेच सरकारने GST चा नवीन स्लॅब जाहीर केला आहे. या अंतर्गत, 1200 सीसीपेक्षा जास्त क्षमतेच्या पेट्रोल वाहनांवर आणि 1500 सीसीपेक्षा जास्त क्षमतेच्या डिझेल वाहनांवर आता 40% जीएसटी आकारला जाईल. पूर्वी, जीएसटीसोबतच, या कारवर 22% सेस देखील आकारला जात होता, परंतु आता हा सेस काढून टाकण्यात आला आहे. या बदलानंतर, फॉर्च्युनरसारख्या मोठ्या एसयूव्हीच्या किमती कमी होऊन ती अधिक बजेट-फ्रेंडली किमतीत खरेदी करता येईल.
इथे GST कमी झाला आणि तिथे Maruti Wagon R ची किंमत झटकन पडली, आता फक्त द्यावे लागेल…
टोयोटा फॉर्च्युनर ही भारतातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या प्रीमियम फुल-साईज एसयूव्हींपैकी एक आहे. याच्या 4X2 एटी (पेट्रोल) व्हेरिएंटची दिल्लीमध्ये एक्स-शोरूम किंमत 36.05 लाख रुपये आहे, तर ऑन-रोड किंमत 41.80 लाख रुपयांपर्यंत जाते. या कारवरील एकूण टॅक्स आणि शुल्क सध्या कारच्या किमतीच्या सुमारे 74% पर्यंत पोहोचतात. नवीन जीएसटी दर लागू झाल्यानंतर, एकूण टॅक्स फक्त 40% पर्यंत कमी होईल. याचा अर्थ असा की फॉर्च्युनर खरेदीदार सुमारे 2 लाख रुपये वाचवू शकतात.
Fortuner चे डिझाइन त्याला अधिक स्टायलिश आणि पॉवरफुल बनवते. ही एक 7-सीटर SUV असून ती 7 व्हेरिएंट्स आणि 2 इंजिन ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे. इंटिरिअरमध्ये मोठा टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टम देण्यात आला आहे, जो Android Auto आणि Apple CarPlay ला सपोर्ट करतो. याशिवाय यात 360-डिग्री पार्किंग कॅमेरा, वायरलेस चार्जिंग, किक-टू-ओपन पावर्ड टेलगेट आणि ॲम्बियंट लायटिंग सारखे आधुनिक फीचर्स दिले आहेत.
भारतामध्ये Toyota Fortuner प्रथमच 2009 मध्ये लाँच करण्यात आली होती. त्यानंतरपासून ही SUV सतत ग्राहकांमध्ये लोकप्रिय ठरत आहे. कंपनीने वेळोवेळी या मॉडेलला अपडेट केले असून अलीकडेच Fortuner GR Sport व्हेरिएंट सुद्धा बाजारात आणला आहे.