
दमदार SUV डिझाइनवर भर
ह्युंदाईच्या विकसित होत असलेल्या ‘Art of Steel’ डिझाइन तत्त्वज्ञानाची झलक BAYON मध्ये पाहायला मिळते. आकार, स्पष्ट कॅरेक्टर लाइन्स आणि मजबूत बॉडी प्रपोर्शन यामुळे कारला स्पोर्टी आणि आधुनिक लूक देण्यात आला आहे. पुढच्या भागात उंचावलेले आणि कार्विंग केल्यासारखे बोनट, उठावदार फेंडर्स तसेच खास H-Edge लाइटिंग दिसते. मजबूत लोअर बॉडी एलिमेंट्समुळे कारचा SUV अवतार आणखी ठळक होतो.
New Maruti Baleno vs Hyundai i20 vs TATA Altroz; तुमच्यासाठी कोणती हॅचबॅक कार ठरेल बेस्ट? जाणून घ्या
इंटीरियरमध्ये टेक्नोलॉजीचा अनुभव
कंपनीने शेअर केलेल्या इंटीरियर स्केचमध्ये आधुनिक आणि तंत्रज्ञानकेंद्रित केबिनची झलक मिळते. ह्युंदाईने BAYON च्या केबिनमध्ये प्रगत तंत्रज्ञान, कनेक्टिव्हिटी आणि सहज वापरता येणाऱ्या इंटरफेसवर भर दिल्याचे म्हटले आहे. त्यामुळे रोजच्या शहरी प्रवासात आरामासोबत डिजिटल अनुभव मिळण्याची अपेक्षा आहे. सध्या कंपनीने या कारच्या फीचर्सची संपूर्ण यादी जाहीर केलेली नाही.
हुंडाई क्रेटा, अल्कझार आणि क्रेटा EV चे ‘Lounge Editions’ लाँच; किंमत ₹19.21 लाखांपासून सुरु
शहरी ग्राहकांसाठी SUV अनुभव
BAYON ची संकल्पना अशा कस्टमर्सना लक्षात घेऊन करण्यात आली आहे, ज्यांना शहरातील दैनंदिन वापरासाठी कॉम्पॅक्ट आणि व्यावहारिक वाहन हवे आहे, पण त्यासोबत SUV सारखा दमदार लूकही हवा आहे. ठळक फेंडर्स, मजबूत स्टान्स आणि आधुनिक लाइटिंग यामुळे कारला वेगळी ओळख देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पुढील काळात ह्युंदाई या मॉडेलची अधिक तांत्रिक माहिती आणि लॉन्चशी संबंधित तपशील जाहीर करू शकते.